Site icon InMarathi

यशस्वी लोकांमध्ये हमखास आढळतात या सवयी, तुमच्यात यापैकी किती आहेत?

success inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

यशस्वी लोकांमध्ये हमखास आढळतात या १५ सवयी, तुमच्यात यापैकी किती सवयी आहेत, तपासा

मनुष्याला त्याच्या कामात व्यवसायात यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष आणि अतूट मेहनत करावी लागते. जीवनात यश मिळवणे हे काही सोपे काम नाही. अनेक अपयशाचा सामना केल्यानंतर यशाची अंधुक किनार आपल्याला दिसू लागते.

यश मिळवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे, कामात अतिशय चोख आणि शिस्तप्रिय राहणे खूपच आवश्यक असते. अढळ यश मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील काही महत्वाच्या गोष्टी उपयुक्त ठरतील.

 

वाचन :

आपण जो व्यवसाय किंवा उद्योग करत आहोत त्या क्षेत्राबद्दल आणि इतरही सर्व क्षेत्रांबद्दल नवनवीन माहिती अपडेट मिळवण्यासाठी वाचन खूप महत्वाचे आहे. वाचनामुळे तुम्हाला तुमच्या आणि इतर क्षेतारील व्ययसायात होणारे बदल नवीन येणारे तंत्रज्ञान याबद्दल माहिती मिळेल.

वाचन म्हणजे पुस्तकं वाचणे असे नाही तर, वृत्तपत्र, मेल, ब्लॉग आदी देखील वाचून स्वतःला जागरूक ठेऊ शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काय बदल करावे लागतील? व्यवसाय कसा मोठा करता येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

 

 

नोंदी ठेवणे :

आपण आपल्याजवळ एक डायरी एक वही बाळगली पाहिजे. व्यवसाय किंवा उद्योग करणाऱ्या अनेक व्यक्ती स्वतःजवळ डायरी बाळगण्याची सवय ठेवतात. अनेक लोक या डायरीमध्ये फक्त कार्यक्रमांच्या नोंदी ठेवण्यासाठी त्याचा वापर करतात. असे न करता तुम्ही तुमच्या कामासंदर्भातल्या अनेक गोष्टी, तुमचे विशिष्ट कालावधीसाठी असलेले कामाचे टार्गेट, ध्येय, स्वप्न, उद्दिष्ट, इतर महत्वाच्या नोंदी ठेऊ शकता.

जेव्हा तुम्ही स्वहस्ताक्षरात या सर्व गोष्टी लिहून काढाल तेव्हा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल. शिवाय ती डायरी तुम्हाला वेळोवेळी तुमच्या टार्गेटची आठवण करून देईल.

 

हे ही वाचा – बिझनेसमन किंवा नोकरदार: छ. शिवाजी महाराजांचे हे १५ गुण अंगी नक्की बाळगा

सुदृढ शरीर सुदृढ विचार :

उत्तम उद्योजक होण्यासाठी तुम्हाला उत्तम आणि शार्प मेंदू सोबतच सुदृढ शरीर देखील खूप आवश्यक आहे. कारण जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी सशक्त शरीर खूप गरजेचे आहे. शरीराची साथ नसेल तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी खूप मर्यादा येतात. त्यासाठी दररोज योग्य व्यायाम आणि उत्तम पौष्टिक आहार जरुरी आहे. यासाठी तुम्ही जिम, योगा क्लासचा देखील आधार घेऊ शकता.

 

 

डिजिटल जगापासून थोडावेळ दूर राहा :

प्रवाहाप्रमाणे पोहणे खूप आवश्यक असते. यासाठी स्वतःमध्ये कालानुरूप बदल करणे देखील गरजेचे. यासाठी आपल्याजवळील गॅजेटपासून दररोज काही काळ तरी स्वतःला दूर ठेवा.

 

 

या वेळेत स्वतःचा आपल्या उद्योगाचा विचार करा जेणेकरून आपल्या विचारणा आणि आपल्या विवेक बुद्धीला वेळ मिळेल यासाठी तुम्ही काही काळ वॉक करू शकता. यावेळच्या आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करा.

कधीही हार मानू नका :

तुम्ही एक व्हिडिओ नक्कीच पहिला असेल ज्यात काही पक्षी पायऱ्यांवरून चढत वर जातात. मात्र त्यातील काही लहान पक्ष्यांना वर चढता येत नाही, अशा वेळी ते सतत प्रयत्न करतात. पडले तरी पुन्हा उठून चढायचा प्रयत्न करतात, मात्र हार मानत नाही.

 

 

हाच नियम इथे देखील लागू होतो. तुम्हाला अपयश मिळाले तरी हार मानायची नाहीये. आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. हार मिळाली तरी खचून न जाता, आपल्या चुकांमधून शिकत पुन्हा उभे राहायचे आणि जिंकायचे. यश नक्कीच मिळणार.

सकारात्मक लोकांमध्ये राहा :

आजकाल सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि निगेटिव्ह कमेंट्सचा पाऊस पडत असतो. त्यासाठी स्वतःला शंका तेवढे सोशल मीडियापासून लांब ठेवणे गरजेचे आहे. नकारात्मक लोकं आणि नकारात्मक वातावरण यांपासून लांब राहणे महत्वाचे आहे. कारण नकारात्मकतेमुळे अपयश येण्याचे प्रमाण अधिक वाढते आणि आपले मनोबल देखील कमी होते.

 

 

शिकण्यासाठी ऐकणे जरुरी:

नवनवीन गोष्टी शिकणे हे आपल्या उद्योग आणि व्यवसायासाठी खूप आवश्यक आहे. शिकण्यासाठी ऐकणे गरजेचे आहे. आपले सहकारी, कर्मचारी, ग्राहक आणि आपल्यापेक्षा लहान व्यक्तींकडून देखील शिकण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी पाहिजे. शिवाय आपले कान देखील खूप शार्प पाहिजे कानावर पडणाऱ्या चांगल्या गोष्टी ऐकून त्यातून चांगले काही तरी नक्की होते.

 

 

कृतज्ञता पूर्ण राहा :

आज संपूर्ण दिवसात किंवा संपूर्ण आयुष्यात जे मिळाले नाही त्यावर चर्चा करण्यापेक्षा आणि दुखी होण्यापेक्षा आपल्याला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.रोज रात्री झोपताना दिवसभरात घडलेल्या तीन कृतज्ञता व्यक्त करता येणाऱ्या गोष्टी लिहून काढा. यांमुळे तुमच्या विचारांना नवीन दिशा आणि चालना मिळेल.

 

परिस्थितीशी जुळवून घ्या :

एखाद्या अनपेक्षित घटनेत देखील कधी कधी संधी लपलेली असते. फक्त त्यासाठी नजर असणे आवश्यक आहे. अनपेक्षित घटनांना देखील घैर्याने सामोरे जाणे जरुरी आहे. आलेल्या परिसथितीशी जुळवून घेताना सकारत्मक आणि त्यातूनही काहीतरी नवीन होईल ही भावना ठेवणे आवश्यक आहे.

 

प्राधान्यक्रम ठरवा :

व्यवसाय आणि उद्योग करताना एकापेक्षा अधिक गोष्टी करण्याची खूप गरज असते. मात्र आधी कोणते काम करावे हे ठरवा आणि रोज सकाळी उठल्यावर आपल्याला कराव्या लागणाऱ्या अनेक कामांपैकी कोणत्याही तीन महत्वाच्या कामांची निवड करा.

 

 

ती तीन कामे लिहून काढा आणि त्यावर काम करा. यांमुळे तुमचा वेळ वाचून आधी अति महत्वाची कामे पूर्ण होण्यास मदत करतील.

 

रविवारचा योग्य वापर :

आजच्या अतिफास्ट आणि हायपेट्राक्टिव्ह जगात वावरताना तुम्हाला सतत काम करणे गरजेचे आहे. आपले आयुष्य खूप अघटित आहे त्यामुळे आपण दूरचे प्लानिंग करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक आठवड्याचा शेवट असणाऱ्या रविवारचा दिवस येणाऱ्या आठवड्याचे प्लँनिंग आणि कॅलेन्डर करण्यासाठी वापरा. यात आठवडाभराचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार तुम्ही चालू शकता.

हे ही वाचा – प्रत्येक यशस्वी माणसाला ही सवय असतेच, या सवयीचे आहेत १० आश्चर्यकारक फायदे!

फोनवर बोलताना चला :

सतत येणारे फोन उचलत त्यावर बसून बोलण्यापेक्षा फोनवर बोलताना चला. यामुळे तुमचा व्यायाम होते ते सर्व ठीक आहे, मात्र चालण्यामुळे विचारणा प्रेरणा मिळते. एका सर्वेनुसार अनेक मोठ्या उद्योजकांना काही महत्वाचे विचार आणि कल्पना फोनवर बोलत चालताना सुचत असल्याचे समोर आले आहे.

 

 

रोज सकाळी चांगला निश्चय करून सुरुवात करा :

रोज सकाळी उठल्यावर आज दिवसभरात एकतरी चांगली गोष्ट नक्की होईल हा विश्वास बाळगा. भलेही ती चांगली गोष्ट तुम्ही ठरवलेल्या गोष्टींपैकी नसली तरी अनपेक्षित काहीतरी चांगले होणार आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाला नक्की फायदा होणार हा विश्वास बाळगा.

 

 

ग्राहकांच्या बाजूने विचार करा :

कोणताही निर्णय घेताना तुम्ही ग्राहक आहेत असा विचार करून मगच निर्णय घ्या. ग्राहक हा राजा आहे, त्यामुळे आपल्याला ग्राहकांना खुश करायचे असेल तर त्यांच्या बाजूने विचारणे करणे अनिवार्य आहे. ग्राहक कसा आणि कोणता विचार करू शकता, त्यांना कोणते प्रश्न पडू शकता? यांवर ग्राहकांच्या बाजूने विचार करा.

 

 

संगीत थेरपी :

कोणत्याही मुद्यांसाठी संगीत हा खूप चांगला आणि उत्तम मार्ग आहे. कारमध्ये ऑफिसमध्ये थोडावेळ किंवा जेव्हा तुम्हाला नकारत्मक वाटत असेल, मड खराब असेल तेव्हा तुम्ही नक्कीच संगीत थेरपीचा विचार करू शकतात.

 

===

हे ही वाचा – या ४ सवयींमुळेच बिल गेट्स जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवू शकले

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version