आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बिअर हे आजच्या तरुणांचं आवडतं पेय आहे. एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की, बिअर हे चहा-कॉफी-पाणी नंतर सर्वात जास्त विकल्या जाणारं पेय आहे. अल्कोहोल चं प्रमाण असणाऱ्या पेयांमध्ये वाईन सुद्धा मोठ्या प्रमाणावर भारतात विकली जाते. पण, बिअरचा खप हा वाईन पेक्षा ही जास्त होतो हे काही वर्षांपासून आकडे सांगत आहेत.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘बिअर कॅफे’ सारखे आउटलेट्स सुरू झाल्यापासून बिअर ही एखाद्या कॉफी च्या हॉटेल सारखी सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणून समोर येत आहे. भारतीय बाजारात कार्ल्सबर्ग, ट्यूबॉर्ग, फॉस्टर्स सारख्या विदेशी बिअर चा बोलबाला असतांना किंगफिशर, हेवर्ड्स ५००० सारखे भारतीय ब्रँड या मार्केट मध्ये आपलं स्थान टिकवून आहे. किंगफिशर ही भारतातील सर्वात जास्त विकणारी बिअर म्हणून आजही लोकप्रिय आहे.
भारतीय बिअर मार्केट मध्ये ‘बिरा ९१’ ही अजून एक बिअर सध्या लोकांच्या पसंतीस पडत आहे. अंकुर जैन या भारतीय ‘कम्प्युटर इंजिनियर’ ने २०१५ मध्ये सुरू केलेला हा ब्रँड अल्पावधीतच आपलं ‘मार्केट शेअर’वाढवण्यात यशस्वी होत आहे.
‘बिरा’ या शब्दाचा अर्थ पंजाबी मध्ये ‘मित्र’ असा होतो आणि ‘९१’ हा भारताचा ‘फोन कोड’ म्हणून हे नाव ठेवण्यात आल्याचं एका मुलाखतीत अंकुर जैन यांनी सांगितलं आहे. उलट्या आकारात लिहिलेलं B आणि माकडाचं चित्र हे आजच्या तरुणाईला बिअर कडे आणि ‘बिरा ९१’ च्या टी शर्ट्स, ग्लोव्हज्, बॅगकडे चांगलंच आकर्षित करत आहे.
–
हे ही वाचा – भारतीय नसूनही भारतीय वाटणाऱ्या या चपलांशिवाय भारतीयांचं एकही पाऊल पडत नाही
–
अमेरिकेत सॉफ्टवेअर मध्ये नोकरी करणाऱ्या, मध्यमवर्गीय कुटुंबातील ‘अंकुर जैन’ ला भारतात परत येऊन बिअर चा व्यवसाय सुरू करावा असं का वाटलं असेल ? जाणून घेऊयात.
अंकुर जैन ने १९९८ मध्ये शिकागो येथून आपलं कम्प्युटर इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. करिअर ची सुरुवात मोटारोला सारख्या ब्रँड सोबत केल्यानंतर आरोग्य सेवा देणारी एक स्टार्टअप कंपनीअंकुर जैन यांनी सुरू केली. अमेरिकेतील कामाच्या पद्धतीनुसार दर शुक्रवारी संध्याकाळी ते आपल्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचे.
बिअर च्या विविध प्रकारांची त्यांनी चव घेतली होती. तरुण मुलं हे नवीन बिअर घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात हे त्यांच्या तेव्हा लक्षात आलं. वस्तू पण अशी आहे जी जास्त वेळ शेल्फ मध्ये राहू शकते आणि बाराही महिने बिअर ला जगभरातून मागणी असते. “आपण बिअर च्या बिजनेस मध्ये जायचं” हे त्यांनी मनाशी ठरवलं.
२००८ मध्ये अंकुर जैन हे भारतात परतले. आपल्या भारतात परतण्याचं ‘हे’ कारण त्यांनी पालकांना सांगितलं नव्हतं. वडील आर्किटेक्ट आणि आई इंटेरिअर डिझाईनर असलेल्या घरात जेव्हा “मला बिअरची विक्री सुरू करायची आहे” हे अंकुरने सांगितलं तेव्हा अर्थातच विरोध झाला होता.
३५ वर्ष सरकारी नोकरी मध्ये काम करणाऱ्या अंकुर च्या वडिलांनी तर ही कल्पना ऐकून अंकुर सोबत बोलणंच सोडून दिलं होतं. थोडे दिवस नाही, तब्बल ५ वर्ष. आपल्या बिझनेस मॉडेल वर ठाम असलेल्या अंकुर यांनी सुरुवातीला काही परदेशातील ब्रँड च्या बिअरची भारतात ‘डिस्ट्रिब्युशन एजन्सी’ घ्यायचं ठरवलं.
डुवेल, ब्रुक्लीन सारख्या युरोपियन ब्रॅण्ड ला भारतात विक्री करण्यास अंकुर यांनी सुरुवात केली. भारतात येईपर्यंत या बिअरची विक्री किंमत ५००-६०० रुपये इतकी होऊ लागली. भारतीय लोकांपुढे इतर स्वस्त पर्याय उपलब्ध असल्याने अंकुर यांनी आयात केलेल्या बिअरला मागणी येत नव्हती.
२०१५ पर्यंत मार्केट चा अभ्यास करणाऱ्या अंकुर जैन यांनी B9 बेवरजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी ची बेलजीयम मध्ये स्थापना केली. ७% अल्कोहोल चं प्रमाण असलेली ही बिअर लोकांच्या पसंतीस पडली होती.
न्यूयॉर्क येथील ‘ट्रीबेका फिल्म फेस्टिवल’ मध्ये अंकुर यांनी बिअर ही ‘प्रमुख प्रायोजक’ झाली आणि तिथून आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये ‘बिरा ९१’ ची ओळख निर्माण झाली.
भारतात ‘B9 बेवरजेस प्रायव्हेट लिमिटेड’ चा दुसरा प्लँट सुरू करण्यात आला. उपलब्ध असलेल्या बिअर पेक्षा स्ट्रॉंग आणि कडवटपणा कमी हे डोळ्यासमोर ठेवून लाँच झालेली ‘बिरा ९१’ ची पदार्पणातच खूप मागणी वाढली होती. भारतीय मार्केटिंग पद्धतींचा योग्य वेळी वापर करून घेत B9 बेवरजेस ने ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिवल’ चं प्रायोजकत्व स्वीकारलं.
१ एप्रिल २०१८ रोजी अंकुर यांच्या कंपनीने नवी दिल्ली मध्ये ‘एप्रिल फुल’ फेस्टिवल चं आयोजन केलं. नवीन वर्षातील ९१ वा दिवस म्हणून सुद्धा हा दिवस निवडल्याचं अंकुर यांनी जमलेल्या लोकांना सांगितलं होतं.
‘बिरा ९१’ हा ब्रँड तेव्हा अजून मोठा झाला जेव्हा त्यांनी क्रिकेट विश्वचषकाचं प्रायोजकत्व स्वीकारली आणि त्यासोबतच कित्येक क्रिकेट स्पर्धांमध्ये जाहिरात करण्यास सुरुवात केली.
मार्केटिंग साठी पैसे कसे उभे केले?
अंकुर जैन यांच्या B9 बेवरजेस प्रायव्हेट लिमिटेड ला पहिली आर्थिक मदत झाली जानेवारी २०१६ मध्ये त्याच्या जवळच्या मित्रांकडून. त्यानंतर ‘सिक्युरा कॅपिटल’ या कंपनीने B9 मध्ये गुंतवणूक करण्यास होकार दिला. त्यासोबतच भारतातील उद्योजक रोहित बन्सल (स्नॅपडील), आशिष धवन (क्रिज कॅपिटल) यांनी अंकुर जैन यांच्या बिजनेस मॉडेल वर विश्वास ठेवून त्यामध्ये आर्थिक गुंतवणूक केली.
२०१५ मध्ये दिल्ली मधून ५० लाखांच्या गुंतवणुकीवर सुरू झालेला ‘बिरा ९१’ चा प्रवास आज ७०० करोड च्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचला आहे. भारतात ६० आउटलेट्स पासून झालेली सुरुवात आज ३०,००० आउटलेट्स पर्यंत पोहोचली आहे. भारत आणि युरोपियन देशाला समोर ठेवून लाँच करण्यात आलेली ‘बिरा ९१’ ही आज जगभरात १६ देशांमध्ये विकली जात आहे.
दिल्ली आणि बँगलोर या दोन प्रमुख शहरातून विक्री सुरू झालेल्या ‘बिरा ९१’ चं माकड हे भारतात आणि देशाबाहेर सध्या चांगल्याच उडया मारत आहे. आज भारतातील टॉप ५ विक्री होणाऱ्या बिअर मध्ये स्थान मिळवल्या नंतर आता कंपनी टॉप ३ मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. “आमचं रोज तरुण होणं हेच प्रस्थापित लोकांना आव्हान देत आहे” असं अंकुर यांनी एका मुलाखतीत मध्यंतरी म्हंटलं आहे.
विविध फ्लेवर्स मध्ये बिअर ला लाँच करून B9 बेवरजेस हे लोकांच्या पसंतीस पडत आहे. ‘बिअर कॅफे’ चे मालक राहुल सिंघ यांनी सुद्धा ‘बिरा ९१’ च्या स्ट्रॉंग असण्याने लोकांकडून मागणी वाढत असल्याचं सांगितलं आहे. २.७% इतकं मार्केट शेअर असलेल्या ‘बिरा ९१’ च्या ६ वर्षातील प्रवासाबद्दल सर्व गुंतवणूक हे आनंदी आहेत.
आज B9 बेवरजेस चे भारतात एकूण ४ प्लँट आहेत. आपल्या प्रवासातील एक चूक सांगायची तर, “दिल्ली, बँगलोर आणि मुंबई च्या पलीकडे मार्केटचा अंदाज न येणे आणि त्यामुळे टियर ३ शहरात बिरा तिथे उशिरा पोहोचली” हे अंकुर जैन सांगतात.
नवीन उद्योजकांना यशस्वी होण्यासाठी या टिप्स अंकुर जैन हे सांगू इच्छितात :
१. थोडं अनभिज्ञ सुद्धा रहा:
आपली कंपनी सुरू केल्यानंतर काही वर्ष जगात काय चाललंय ? या प्रत्येक गोष्टीची माहिती न ठेवता केवळ आपल्या ब्रँड वर लक्ष केंद्रित करा.
२. चांगले मित्र जपा:
मित्र हेच तुम्हाला ओळखून असतात, त्यांना नेहमीच जपणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्या उद्योजक मित्रांमुळेच आज मी हे यश कमावू शकलो आहे, असं अंकुर जैन नेहमी सांगत असतात.
३. ‘ग्राहक प्रथम’ ह्या तत्वावर काम करा:
प्रत्येक ग्राहकाला तुमचा जवळचा मित्र समजा आणि त्याची सोय करण्यास नेहमीच प्राधान्य द्या. बारीक गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका.
४. व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करा:
तुमच्या वस्तू किंवा सेवांवरच काम न करता एकूण व्यवसाय कसा वाढवता, मोठा करता येईल यावर लक्ष केंद्रित करा.
बिअर चांगली की वाईट ? यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. पण, या व्यवसायात उतरून प्रस्थापितांना आव्हान देणं हे सोपं नाहीये हे कोणीही मान्य करेल. अंकुर जैन यांचं त्यांच्या कल्पकते बद्दल आणि मेहनती बद्दल आपण नक्कीच अभिनंदन करू शकतो.
===
हे ही वाचा – मराठी भावांची ‘किमया’! आता आंबा, कोकमापासून बनवली जातीये झक्कास बिअर
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.