आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
४जी नेटवर्कला जगातील दुसरे फास्टेस्ट नेटवर्क म्हणून मान्यता मिळाली आहे. पहिल्या क्रमांकावर अजूनही बायकांचं नेटवर्क आहे.
असे विनोद कमी नाहीत. बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाहीत ह्यावर अनेक लोक हिरीरीने बोलताना आढळतील. आता ह्याला बायकांचा गुण म्हणावे की अवगुण?
काहीही असले तरी ह्यात बिचाऱ्या बायकांची काहीच चूक नाही. त्यांना तसा शापच मिळाला आहे तो ही प्रत्यक्ष धर्मराज युधिष्ठिराकडून! आश्चर्य वाटले ना? आणि महाभारताच्या अभ्यासकांच्या मते हे सत्य आहे.
असं आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की रामायण काय किंवा महाभारत काय याच मुळ कारण हे ‘बाई’ हेच होतं, कितीही झालं तरी सत्य नाकारता येऊ शकत नाही! तसेच अशाच या दोन्ही धर्मग्रंथात अनेक आख्यायिका आहेत ज्या आपण कधीना कधी वाचल्या जरूर असतीलच!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण जर या आख्यायिकांकडे गंमतीचा भाग म्हणून न बघता त्यातलं तथ्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर एक वेगळंच महाभारत आपल्यासमोर उभं राहील!
महाभारतामध्ये अनेक रंजक कथा आहेत. त्यातल्या काही खऱ्या तर काही दंतकथा आहेत. असं म्हणतात,
धर्मराज म्हणजेच युधिष्ठिराने कुंतीला शाप दिला की महिलांच्या पोटात एकही गोष्ट फारवेळ पचणार नाही.
युधिष्ठिराने आपल्याच आईला असा शाप का दिला असावा ह्या मागे एक रंजक कथा आहे.
सर्वांनाच माहिती आहे की कुंतीला पाच मुलं होती. (३ स्वतःची आणि २ माद्रीची)- युधिष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पाच पांडव मानले जातात.
पण एक सत्य हे देखील आहे की पराक्रमी कर्ण हा कुंतीचा ज्येष्ठ पुत्र होता ज्याला तिने त्याच्या जन्मानंतर लगेच सोडून दिले होते. तिने असे का केले ह्या मागे सुद्धा एक कथा आहे.
कुंती एक धर्माचरण करणारी राजकन्या होती. ती सतत ऋषींची सेवा आणि पुण्यकर्म करीत असे. एकदा तिने दुर्वास मुनींची अतिशय भक्तिभावाने सेवा केली. ह्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी कुंतीला संतानप्राप्तीसाठी एक मंत्र दिला.
ह्या मंत्राद्वारे कुंती कुठल्याही देवतेकडून संतान प्राप्त करू शकत होती. परंतू दुर्वासांनी तिला ह्या मंत्राचा विवाहा आधी उपयोग करू नकोस असे बजावले होते. पण तरीही तिच्या मनात त्या मंत्राचा एकदा प्रयोग करून बघायची इच्छा झाली आणि कुंतीने त्या मंत्राद्वारे सूर्यदेवाला आवाहन केले.
आणि त्या मंत्राचा परिणाम म्हणून कुंतीला एक मुलगा झाला तोच कर्ण होय. अविवाहित कन्येस पुत्रप्राप्ती हे त्या काळी सुद्धा निषिद्ध होते. आता ह्या मुलाला आपल्यासोबत कसे ठेवणार ह्या कल्पनेने भावनेने ती घाबरली.
लोक ह्या मुलालाही नीट जगू देणार नाहीत आणि आपल्या चारित्र्याविषयी सुद्धा नको नको ते प्रश्न उभे करतील ह्याचे तिला भय वाटू लागले. म्हणूनच मनावर दगड ठेवून तिने कर्णाला स्वत:पासून दूर केले.
काही वर्षानंतर कर्ण आणि बाकी पांडव मोठे झाले. कर्णाची मैत्री दुर्योधनाशी झाली आणि महाभारताच्या युद्धात कर्ण आपल्या मित्राच्या बाजूने म्हणजेच दुर्योधनाच्या बाजूने लढण्यास सज्ज झाला.
त्याने आपल्याच लहान भावंडांशी युद्ध केले. तरीही कुंती हे सत्य आपल्या पुत्रांना सांगू शकली नाही. पांडवांना कर्ण हा आपला मोठा भाऊ आहे हे माहित नसल्याने ते त्याला शत्रू मानून त्याच्याशी लढले आणि अखेर अर्जुनाच्या हस्ते कर्णाचा मृत्यू झाला.
कर्णाच्या मृत्यूची बातमी ऐकून व्यथित झालेली कुंती रणांगणावर आली आणि तिने युधिष्ठिराला कर्णाचे अंत्यविधी करण्यास सांगितले. युधिष्ठिराने कुंतीला ह्याचे कारण विचारले. तेव्हा कुंतीने सर्व पांडवांना कर्णाविषयी सगळे सत्य सांगितले.
सत्य माहित नसल्याने आपल्याच भावाचा आपल्या हातून मृत्यू झाला ह्या कारणाने दु:खी होऊन युधिष्ठिराने कुंतीला शाप दिला की यापुढे कुठलीही स्त्री जास्त काळ एखादे सत्य आपल्या मनात ठेवू शकणार नाही.
असे म्हणतात की तेव्हापासून स्त्रिया एखादी गोष्ट वा सत्य फार काळ आपल्याकडे लपवून ठेवू शकत नाहीत.
पण ह्यातलं खरं किती हे माहित नाही! कथा मात्र असे सांगते की लोकलज्जेस्तव कुंतीने सत्य लपवून ठेवले आणि त्यामुळे तिच्या एका मुलाने दुसऱ्याचा वध केला.
महाभारतात अशा बऱ्याच रोचक कथा आहेत ज्यांचा संदर्भ अनेक लोक समाजातील वृत्तींशी जोडत असतात. महाभारतामध्ये सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि प्रकृतींचे वर्णन आहे जे आजच्या काळातही अगदी चपखल बसते.
हे देखील वाचा: (कर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग)
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.