' लाकूड कारखान्यात शिपाई ते करोडोंच्या कंपनीचे मालक; प्रवास “फेविकॉल-मॅन” चा! – InMarathi

लाकूड कारखान्यात शिपाई ते करोडोंच्या कंपनीचे मालक; प्रवास “फेविकॉल-मॅन” चा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही उत्पादनं ही केवळ ब्रॅण्ड नेम न राहता ती त्या उत्पादनाचं पर्यायी नावच बनतात. असंच एक उत्पादन म्हणजे फेविकॉल… adhesive च्या जगात भारतातल्या सामान्य जनतेला केवळ फेविकॉल माहित आहे. आज भारत का मजबूत जोड बनलेला फेविकॉल बलवंत पारेख या व्यक्तीने बनवला त्याला साठ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

 

fevicol inmarathi

 

काही काही ब्रॅण्डची नावं ही उत्पादनाची पर्यायी नावंच बनून जातात. फोटो कॉपीला आपण सर्रासपणे झेरॉक्स म्हणतो. पूर्वी कोणत्याही टुथपेस्टला कोलगेट म्ह्टलं जायचं. आजही खेड्यापाड्यात डिटर्जंट पावडरचं नाव निरमाच असतं. भलेही व्हिलचा पुडा हातात असेल पण त्याला निरमाच म्हटलं जातं.

 

 

असाच आणखी एक ब्रॅण्ड आहे फेविकॉल… हा ब्रॅण्ड इतका परिचयाचा झाला आहे, की कोणत्याही कंपनीचं adhesive हे फेविकॉल म्हणूनच ओळखलं जातं.

भारतात तरी फेविकॉलला पर्याय नाही. आज सहा दशकांहून अधिक काळ फेविकॉलची मक्तेदारी आहे. मात्र हा प्रवास सुरू कसा झाला याची कथा इतर यशोगाथांप्रमाणेच सुरस आहे.

===

हे ही वाचा – छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

===

 

fevicol advertisements inmarathi

 

गुजरातमधील महुआ या छोट्याश्या गावात जन्म झालेले बलवंत पारेख यांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना. खरं तर बलवंत वकिली शिकत होते मात्र शिक्षणात त्यांच मन रमत नव्हतं. वकिलीचं शिक्षण त्यांनी कसं बसं पूर्ण केलं मात्र प्रॅक्टिसमधे ते अजिबातच रमले नाहीत याचं कारण हा पेशाच त्यांना खोटारडा वाटत असे. खोट्याला खर्‍याचा मुलामा देणं त्यांना जमतच नसे.

वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून ते मुंबईत आले आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय झाले. घरातले आधीच यांच्या शिक्षणातल्या अनुत्साहामुळे चिंतेत होतेच त्यात आता या आंदोलनाची भर पडली.

शिक्षणाचा बोर्‍या वाजणार हे दिसू लागताच कुटुंबियांनी शिक्षण पूर्ण करण्याचा दबाव आणला. घरच्यांच्या कटकटीला कंटाळून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. मात्र वकिली करायची नाही यावर ते ठाम होते.

 

law suit inmarathi 1

 

===

हे ही वाचा – परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणाऱ्या ‘बालाजी वेफर्स’चा कुरकुरीत इतिहास! वाचा

===

उत्पन्नाचा मार्ग नाकारल्यावर मुंबईसारख्या शहरात जगायचं कसं? हा प्रश्न होताच. पोट भरण्यासाठी त्यांनी मग अनेक लहान सहान नोकर्‍या केल्या. कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. उलट या छोट्या छोट्या नोकर्‍यांमुळेच ते अनुभव संपन्न होत गेले आणि त्यांचा जनसंपर्कही तगडा बनला.

ते वकिल बनले नाहीत तरीही वकिलीचा एक नैसर्गिक गुण त्यांच्याकडे होताच, तो म्हणजे, ‘मिठी वाणी’. बोलायला अतिशय गोड असणार्‍या बलवंत यांचा जनसंपर्क तगडा असण्याचं हेच कारण होतं.

कामाच्या गरजेपोटी त्यांनी एकदा चक्क लाकूड व्यापार्‍याकडे शिपायाची नोकरीही केली. पत्नीसोबत गोदामात कामं केली. पडेल ते काम करणं चालू असतानाच नशिबानं काही सोन्यासारख्या संधीही त्यांच्यासमोर ठेवल्या आणि या सगळ्या संधींचं सोनं त्यांनी केलं.

 

balvant parekh inmarathi

 

अशीच एक संधी त्यांच्याकडे चालून आली आणि ती म्हणजे जर्मनीत जाण्याची. जर्मनीत त्यांनी भरपूर ज्ञान मिळवलं. तिकडच्या ज्ञानाचा इकडे आल्यावर वापर करून घ्यायचा त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार इकडे परतल्यावर धाकट्या भावासोबत एक डाय आणि केमिकल फॅक्टरी सुरू केली.

या कारखान्यात ॲक्रेलिक बेस्ड रंग बनविला जात असे. यासाठी एक घटक वापरावा लागत असे, ग्लू. या ग्लूचं नाव त्यांनी ‘फेविकॉल’ ठेवलं. ग्लूला जर्मनीत ’कॉल’ म्हणत असत. अशाच एका जर्मन उत्पादनाचं नाव होतं, ‘मेविकॉल’. यावरूनच फेविकॉलचा जन्म झाला.

खरं तर या कंपनी अंतर्गत एक दोन नाही तर तब्बल २०० हून जास्त उत्पादनं बनतात, मात्र सगळ्यात जास्त लोकप्रिय उत्पादन आहे फेविकॉल. किंबहुना बलवंत पारेख यांची ओळख भारताचे ‘फेविकॉल मॅन’ अशीच आहे.

खरंतर हे एक साधं उत्पादन, पण पारेख यांनी अतिशय कल्पक जाहिराती बनवून तो लोकांच्या कुतुहलाचा आणि आवडीचा विषय बनवून टाकला. आजही फेविकॉलच्या पंचलाईन लोकांना तोंडपाठ आहेत.

 

fevicol advertisement inmarathi

 

१९९० मधे पिडिलाईटची स्थापना करण्यात आली आणि अल्पावधीतच त्याचा उत्तम प्रसार झाला. १९९३ मध्ये त्याचे शेअर्सही काढण्यात आले, १९९७ पर्यंत फेविकॉल टॉप १५ ब्रॅण्डमधे गणला जाऊ लागला.

२००० साली त्यांनी आणखी एक जबरदस्त उत्पादन बाजारात आणलं, ’एमसील’. अक्षरश: काहीही जोडणारं एमसील घरा घरातली अत्यावश्यक गोष्ट बनलं. तुटलेलं चप्पल असो की तुटलेलं फर्निचर सगळं काही एमसील जोडू लागलं.

२००६ पर्यंत फेविकॉल देशाबाहेरही अमेरिका, थायलंड, दुबई, इजिप्त आणि बांग्लादेश या देशांत मागणीत आलं. कंपनीनं सिंगापूरमधे स्वत:चं संशोधन केंद्र उभारलं.

आपण ज्या मातीत जन्मलो तिचं ऋण आपल्यावर असतं या भावनेतून त्यांनी त्यांच्या जन्मगावी दोन शाळा, एक महाविद्यालय आणि एक हॉस्पिटल उभारलं. याशिवाय दर्शक फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापनाही केली. गुजरातचा सांस्कृतिक इतिहास या संस्थेतर्फे अभ्यासला जातो. याव्यतिरिक्त भावनगरच्या सायन्ससिटीसाठी त्यांनी दोन कोटींची घसघशीत मदतही केलेली आहे.

आपल्या कष्टानं नशीब पालटवून टाकून भारताच्या इतिहासात फेविकॉल नावाचा इतिहास रचणारे बलवंत पारेख वयाच्या ८८ व्या वर्षी मरण पावले. मात्र फेविकॉल आजही त्यांच्या कष्टांचं नाव राखत उभा आहे.

 

fevicol types inmarathi

 

मरावे परी कीर्तीरूपी उरावे ही उक्ती त्यांनी खर्‍या अर्थानं सार्थ केलेली आहे.

===

हे ही वाचा – जंगलातील लाकूडतोड्या ते सर्वात मोठी फर्निचर कंपनी! वाचा IKEA चा भन्नाट प्रवास…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?