आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आयफोन म्हणजे क्लास! आयफोन घेणे आणि वापरणे हे अनेकांचं स्वप्न असतं. लेटेस्ट आयफोन वापरणं हा एक स्टेटस सिम्बॉल समजला जातो. आपण आयफोन वापरतोय हे लोकांना दाखवण्यासाठी काही हौशी लोक त्यांचा फोन सतत खिशाबाहेर किंवा पर्सबाहेर काढून कारण नसताना चेक करत असतात.
आयफोन इतका महाग असून सुद्धा लोक तो घेण्याची इच्छा बाळगतात ह्यातच सर्व आलं. ह्या आयफोनच्या किंमतीवरून सुद्धा अनेक विनोद व्हायरल झाले आहेत. लोकांना इतकी आयफोनची क्रेझ आहे की बाजारात नवीन मॉडेल यायच्या आधीच लोक त्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवतात.
एक वेळ लोक स्वतःची किंवा दुसऱ्याची किडनी विकतील पण आयफोन वापरायचं स्वप्न पूर्ण करतील असे आयफोन बाबतीत जोक येत असतात.
तर हे आयफोनचे डाय हार्ड फॅन्स त्याच्या प्रत्येक फिचर आणि ऍप्लिकेशन बद्दल घडा घडा माहिती सांगतील. पण आयफोनच्या मागच्या बाजूच्या ज्या लाईन्स असतात त्या कशासाठी असतात हे मात्र सर्वांनाच माहिती असेल असे नाही.
अनेक लोक असेही आहेत जे म्हणतात की, ह्या लाईन्स मुळे आयफोनचा aesthetic लूक जातो.
तर हे लक्षात घ्या की,
ह्या लाईन्स नुसत्या शोभेसाठी नाहीत. तुमचा आयफोन नीट चालण्यासाठी त्याचा खूप महत्वाचा रोल आहे.
ह्या व्हाईट लाईन्स फक्त आयफोनच्या स्टाईल स्टेटमेंटचं प्रतिक नसून ह्या लाईन्स म्हणजे तुमच्या फोनचे अँटेना म्हणून काम करतात. ह्या लाईन्स तुमच्या फोनमध्ये सिग्नल पकडायचे काम करतात.
आयफोनचे जे जुने मॉडेल होते त्यामध्ये लोकांना कधी कधी सिग्नलचा प्रॉब्लेम व्हायचा. सिग्नल नीट यायचा नाही. लोकांचा हाच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अँपल कंपनीने त्यांच्या जुन्या मॉडेलमध्ये काही सुधारणा करून आयफोन 7 लाँच केला आहे. ज्यात सिग्नल स्ट्रेन्थ चांगली राहील ह्याची अँपलने काळजी घेतली आहे.
आता समजलं ना या लाईन्स मागचं कारण? अहो मग हा लेख शेअर करा आणि इतरांनाही सांगा की!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.