सलाम! पुण्यातला खास कॅफे – जिथे प्रत्येक काम करणारा आहे मुकबधीर…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
म्हणतात ना, ‘पुणे तिथे काय उणे’ आज ही ओळ अतिशय सार्थ झाल्याचे सर्वाना नक्कीच जाणवणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पुण्यातल्या एका अतिशय आगळ्या वेगळ्या हॉटेलबद्दल!
खरंतर जरी आज आपण सर्व आधुनिक युगात वावरत असलो, तरी दिव्यांग लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पाहिजे तितका बदलला नाहीये. काही अपवाद सोडले तर आजही आपण दिव्यांग लोकांना सामान वागणूक कधीच देत नाही. एक सहानुभूतीपूर्ण कटाक्ष त्यांच्याकडे टाकून पुढे चालायला लागतो.
मात्र आपल्या याच समाजात काही पठडीबाहेरील विचारसरणीचे लोकं देखील आहे, जे स्वतःसाठी जगत असतांनाच इतरांचा देखील विचार करतात. यातल्याच एक म्हणजे डॉ. सोनम कापसे. डॉ कापसे यांनी पुण्यामध्ये मूकबधिर हॉटेल सुरु केले आहे.
पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अशा फर्ग्युसन कॉलेज रोडवर कापसे यांनी ‘टेरासीन’ नावाचे हॉटेल सुरु केले आहे.
या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करणारा जवळपास सर्वच स्टाफ आहे मूकबधिर आहे. अतिशय विचारकरून आणि कल्पकतेने कापसे यांनी या हॉटेलवर काम केले आहे.
नुकतेच सुरु झालेले हे हॉटेल सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या हॉटेलमध्ये आल्यावर काही दिव्यांग मुलं अतिशय प्रेमाने आणि आपलेपणाने हसून तुमचे स्वागत करतात.
‘टेरासीन’ हॉटेलमध्ये स्टाफला आणि ग्राहकांना देखील लक्षात येईल अशा सोप्या आणि सुटसुटीत मार्गांचा वापर केला जातो. इथल्या मेन्यूमध्ये प्रत्येक पदार्थासमोर काही विशिष्ट सांकेतिक भाषेची चित्रे आणि खुणा दिल्या आहेत. त्या पाहून ग्राहक कर्मचाऱ्याला ऑर्डर देतात.
कर्मचारी देखील त्यांच्या भाषेत ही ऑर्डर लिहून घेत त्यांना पाहिजे तो मेनू त्यांच्यासमोर सादर करतात. हा मेनू पाहून कोणीही अगदी सहज आपली ऑर्डर देऊ शकेल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. काहीही ऐकू तसेच बोलता येत नसताना सुद्धा इथे काम करणारे सर्व कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देतात.
हे हॉटेल ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे, त्या सोनम कापसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी हे पाऊल उचल्याचे सांगितले आहे.
त्या स्वतः वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी संबंधित असल्याने त्यांनी या अशा मूकबधिर मुलांना खूप जवळून अनुभवले असल्याने त्यांच्या समस्या सोनम यांच्या लक्षात आल्या या मुलांसाठी काहीतरी करण्याचे त्यांनी ठरवले. याच विचारातून हे हॉटेल सुरु झाल्याचे सोनम यांनी काही माध्यमांना सांगितले.
–
हे ही वाचा – हे ७ कॅफेज फक्त खाबूगिरीसाठीच नव्हे, तर नेत्रसुखासाठीही आहेत प्रसिद्ध!
–
यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांना देखील आपल्या हॉटेलमधून कसा फायदा मिळू शकता याच विचार केला. आज त्यांच्या सोबत पुण्यातील आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपास २५० शेतकरी जोडले गेले असून, त्या शेतकऱ्यांकडून हॉटेलसाठी लागणाऱ्या भाज्यांची खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होतो.
या हॉटेलमध्ये सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नियम आणि अटींचे पालन करून काम केले जाते. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक देखील एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव घेत असल्याने ते देखील खुश आहे.
तर मग पुणेकरांनो नक्की या हॉटेलला भेट द्या आणि या सगळ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला विसरू नका.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.