शरद पवारांची “ही” इकोसिस्टिम भाजपला कधीच उभारता येणार नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : प्रसाद राऊत
===
पवारांची महाराष्ट्रातील इको सिस्टिम जबरदस्त स्ट्रॉंग आहे. ही इको सिस्टिम त्यांना ते सत्तेत असताना आणि नसतानाही जनमानस त्यांच्या विरोधात जाऊ नये यासाठी कायम प्रयत्नशील असते.
पवारांची ही इको सिस्टिम प्रत्येक क्षेत्रात आहे. पण आपल्या विषयासाठी मी इथे तीचे दोन भागात वर्गीकरण करतोय.
पहिली बुद्धिजीवी इको सिस्टिम.
यात विचारवंत म्हणवले जाणारे पुरोगामी, तथाकथित किंवा बरेचदा स्वयंघोषित इतिहासकार, इतिहास अभ्यासक व इतिहास संशोधक, समाजकारणात सक्रिय सामाजिक कार्यकर्ते व शेवटी येतात आपले मराठी पत्रकार.
===
हे ही वाचा : जेव्हा शरद पवारांनी १९९३ मधील १३ वा बॉम्बस्फोट शोधून काढला…!!
===
हे लोक त्यांची बुद्धी पणाला लावून पवार कसे ग्रेट आहेत ते सांगत असतात. बदल्यात पवार यांच्या पोटापाण्याची सोय म्हणून एखादी समिती, एखादं महामंडळ, एखादी सरकारी संस्था इथे या लोकांची वर्णी लावून देतात. हे लोक स्वतःची बुद्धी पवारांसाठी वापरून त्यावरच उपजीविका करत असल्याने यांना बुद्धिजीवी म्हणतात! हे लोक कधीही उलटे फिरू शकतात.
उदाहरण द्यायचंच झाल्यास बिग्रेडच्या खेडेकर आणि कोकाटे यांचं उदाहरण घ्या.
फडणवीस यांनी सिंदखेडच्या जिजाऊ सृष्टी प्रकल्पाचं अध्यक्षपद दिल्यावर कट्टर ब्राम्हणद्वेषी खेडेकर शांत झाले. त्यातून बिग्रेडमध्ये खेडेकर आणि कोकाटे अशी उभी फूट पडली.
त्यामुळे यांना काऊंटर करायचं असेल तर भाजप आणि हिंदुत्ववाद्याना स्वतःची बुद्धिजीवी अशी इको सिस्टिम तयार करावी लागेल.
दुसरी इको सिस्टिम आहे ती श्रमजीवी लोकांची.
यात कलाकारांपासून ते बाजारसमितीमधले अडते, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी सगळे…. म्हणजे सहकार ते खाजगी अशा सर्व क्षेत्रातले लोक येतात.
हे लोक पक्के असतात. कारण यांची निष्ठा आतून म्हणजे पोटातून आलेली असते. अडीअडचणीला हेच लोक पवारांच्या मागे उभे राहतात. पवारांसाठी त्यांच्या विरोधकांना घेरतात.
या इको सिस्टिमबद्दल पवार आणि फॅमिली खूप जागरूक असते. दिवसभरात त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची मदत करण्याच्या माध्यमातून पवारांच्या नकळतही बरेचदा ही सिस्टिम उभी राहते. आणि यात जास्त काही कष्टसुद्धा लागत नाहीत. फक्त योग्य व्यक्तीच्या मागे उभं राहण्याची गरज असते.
यातून आपोआप समर्थक तयार होत जातात.
एक हल्लीचंच उदाहरण देतो.
===
हे ही वाचा : शरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही… हे मान्य करा!
===
दिल्ली सीमेवर सुधारित कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु असताना महाराष्ट्रात नाशिक की नगरजवळ एका तरुणाने सुरु केलेल्या ऍग्रो फर्मला सुप्रियाताई सुळे यांनी व्हिजिट केली होती. त्यावेळी भक्तमंडळी ‘बघा पवारांचा दुटप्पीपणा’ म्हणून तो फोटो शेयर करत होते. आणि त्याचवेळी मी हा विचार करत होतो की ‘तो तरुण आता पवार फॅमिलीचा कायमचा मतदार झाला.’
कारण कष्ट करण्यासाठी तो तयार होता. सुप्रिया ताईंची पाठीवर पडणारी कौतुकाची थाप त्या तरुणाचं मनोबळ वाढवून गेली असेल. कधीही अडचण आल्यास तो पहिल्यांदा सुप्रिया ताईंकडे मदत मागेल. आणि ताई ती मदत करतीलच. त्या भेटीत ताईंनी त्याला तसं आश्वासन नक्कीच दिलं असणार.
यात ताईंना पदरचे पैसे खर्च करावे लागले नाहीत की कुठे अजून त्या तरुणासाठी शब्द टाकावा लागला नाहीये. पण ती एक भेट त्याच्यासारख्या कित्येक महत्वाकांक्षी तरुणांना सुप्रिया ताईंचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा मतदार बनवून गेलीय.
प्रत्येक क्षेत्रात पवार फॅमिलीचे असे हक्काचे समर्थक आहेत. हेच अडीअडचणीला त्यांच्या पाठीशी उभे राहतात.
हे सध्याची महाराष्ट्र भाजप करत नाहीच. वर त्यांचे युवा पदाधिकारी तर…काही बोलायलाच नको त्यांच्याबद्दल.
जर भाजप हा विशाल वटवृक्ष असेल तर महाराष्ट्र भाजप आणि भाजपा युवा मोर्चा त्यावरचं बांडगूळ आहे.
त्यांना शरद पवारांसारखी इकोसिस्टिम महाराष्ट्रात रुजवता येणारच नाही.
===
हे ही वाचा : …आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय?’ हे दाखवून दिले
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.