परंपरा म्हणून घातला जाणारा हा दागिना आहे आरोग्याचं वरदान…! विज्ञान काय सांगतं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या हिंदू चालीरीती आणि परंपरांना हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे. आजच्या २१ व्या शतकात अनेकांना या चालीरीती आणि परंपरा जुनाट वाटतात. आजच्या काळात महिलांना, मंगळसूत्र घालणे स्टाइल किंवा फॅशन स्टेटमेंट नाही असा विचार रुजत असल्याने स्त्रिया मंगळसूत्र घालण्याचे टाळतात.
मात्र तुम्हाला माहित आहे का? आपल्या या सर्व जुन्या आणि मागासलेल्या परंपरा चालीरीतींना वैदिकदृष्ट्या तर महत्व आहेच आहे, सोबतच शास्त्रीयदृष्ट्या देखील महत्व आहे. चाल तर मग जाणून घेऊया मंगळसूत्र घालण्याचे वैदिक आणि शास्त्रीय महत्व!
सौभाग्याचे प्रतीक :
इतर कोणत्याही दागिन्यांपेक्षा मंगळसूत्राला आपल्याकडे सर्वात जास्त महत्व आहे. आपल्याकडे मुलीचे लग्न होताना तिला तिच्या पतीकडून मंगळसूत्र घातले जाते. हे मंगळसूत्र घातल्यानंतर ती मुलगी कुमारी न राहता एक विवाहित स्त्री होते.
मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे. स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिले की, ती विवाहित असल्याचे समोरच्याच्या लक्षात येते.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी
असे म्हणतात की मंगळसूत्र घातल्यामुळे पतीचे आयुर्मान वाढते. शिवाय यामुळे पती आणि पत्नीतील प्रेम आणि बांधिलकी राखली जाते. यासाठीच मंगळसुत्र घालण्याचा आग्रह घरातील थोरामोठ्यांकडून केला जातो. हिंदू शास्त्रामध्ये मंगळसूत्र हे केवळ पतीच्या मृत्यू नंतरच काढले जाते.
संरक्षक कवच
मंगळसूत्र हे काळे मणी माळून तयार केले असते. मंगळसूत्र हे काळे मणी आणि सोन्यामध्ये तयार केलेले असते.
आख्यायिकांनूसार काळा रंग हा वाईट आणि दुष्ट शक्तीपासून संरक्षण करतो.
–
हे ही वाचा – कुंकू किंवा टिकली हा गावठीपणा नसून, त्यातून महिलांना होणारे लाभ ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
–
मंगळसूत्र शिव-पार्वती यांचे प्रतीक
असे म्हणतात की, मंगळसूत्रातील काळा भाग म्हणजे शंकर आणि पिवळा भाग म्हणजे पार्वती असे मानले जाते.
शंकरांच्या आशीर्वादामुळे पती पत्नीला दीर्घायू मिळते तर पार्वतीमुळे वैवाहिक जीवन सुखकर होते.
निरोगी हृदय ठेवण्यास आवश्यक
मंगळसूत्र हे सोने किंवा चांदी या धातूंपासून तयार केले जाते. या दोन्ही धातूंमुळे स्त्रियांचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते, सोबतच रक्तदाबाचा आजार होत नाही आणि असला तर तो नियंत्रणात राहतो.
अर्थात यासाठी मंगळसुत्राचे स्थानही महत्वाचे असते. हे मंगळसुत्र गळ्यात का घातले जाते? असा प्रश्न पडला असेल तर मंगळसुत्रातील धातु हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
मंगळसुत्राची माळ तसेच त्यामधील सोन्याच्या वाट्या या स्त्रिच्या ह्रदयाजवळ असतात. वैज्ञानिकदृष्ट्या या धातुंचा वापर हा सकारात्मकतेसह ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असतो.
आत्मिक शांती
लांब मंगळसूत्र पोटवर ज्या ठिकाणी येते तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी संबंधित असते. मंगळसुत्रातील दोन वाट्यामधून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढून मन शांत राहते आणि स्त्रियांची आत्मिक शक्ती वाढते.
सकारात्मकता आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते
मंगळसूत्र घातल्याने स्त्रियांमधील रोगप्रतिकारकशक्ती वाढून महिलांमध्ये सकारात्मकता वाढते.
घरातली स्त्री आनंद, निरोगी आणि सकारात्मक असली तर संपूर्ण घर आनंदी राहते.
–
हे ही वाचा – हिंदु संस्कृतीतील “नथ” फक्त “नखरा” नसून आहे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची!
–
वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्रे
आजच्या काळात महिलांना वेगवेगळ्या कपड्यांसोबत मंगळसूत्र चांगले दिसावे यासाठी बाजारात अतिशय वेगवेगळ्या आणि हटके सुंदर पद्धतीच्या मंगळसूत्रांची चलती आहे.
तुम्ही अशी हटके मंगळसूत्रे घालून परंपरेसोबतच स्टाइल आणि फॅशन देखील जपू शकतात.
काळानुरूप बदल
सध्या काळ बदलला आहे अनेक कार्यालयांमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मंगळसूत्र घालणे चालत नाही. अशा वेळीस तुम्ही नाही घातले तरी चालते मात्र आपले सणवार आणि घरातील सोहळ्यादरम्यान तुम्ही घालू शकतात.
अर्थात यातही अनेकजणींनी मंगळसूत्र बॅंड हा पर्याय शोधून काढला असून यालाही मोठी पसंती मिळते.
अर्थात मंगळसूर्तव घालावे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे. त्याबद्दल कुणीही सक्ती करणे योग्य नाही. मात्र केवळ परंपरा म्हणून नव्हे तर स्त्रिच्या आरोग्यासाठी हा अलंकार किती उपयुक्त आहे याची माहिती घेतली तर पंरपरेचे वैज्ञाानिक महत्वही लक्षात येते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.