आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण आपल्यासोबत अतिशय जुन्या रूढी, परंपरा घेऊन चालत असतो. या सर्वच परंपरा आजच्या काळात लागू पडतातच असे नाही, मात्र त्यातल्या काही तर आपण पाळतो म्हणजे पाळतोच.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
यातलीच एक महत्वाची परंपरा म्हणजे बाळाला काजळ लावणे. आपल्याकडे लहान बाळांना डोळ्यात काजळ घातले जाते. ही खूपच जुनी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोष्ट आहे.
मात्र काजळ घालणे हे योग्य आणि सुरक्षित आहे का? जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
काजळ म्हणजे काय?
काजळ म्हणजे काय तर दिव्यावर आलेली काळ्या रंगाची काजळी. दिवा लावल्यानंतर जेव्हा तो जाळल्यानंतर विझतो, तेव्हा त्या दिव्याच्या वातीवर राहते ती काळी काजळी. हीच काजळी आपण काजळ म्हणून वापरतो.
काजळाबद्दल असलेले दुमत
आजच्या २१ व्या शतकात डॉक्टर किंवा आजचे पालक यांना काजळ घालणे आवडते का? किंवा डॉक्टर काजळ घालण्याचा सल्ला देतात का? खरंच बाळांसाठी काजळ घालणे चांगले आणि सुरक्षित आहे का?
आता काही घरातली वयस्कर मंडळींचा मोठा आग्रह असतो की बाळाला काजळ लावले जावे. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा त्यांना अशीच पुढेही चालू ठेवायची असते. अर्थात त्यामागे त्यांचा हेतू नक्कीच वाईट नसतो. ही मंडळी घरी केलेले काजळ बाळासाठी वापरावे असे सांगतात.
सोबतच बाहेरचे काजळ बाळांना लावू नये असा सल्ला सुद्धा देतात. अशा वेळी अनेक माता गोंधळून जातात की काजळ लावावे की नाही. आणि लावायचे झाले तर घरचे लावावे की बाहेरचे लावावे?
चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
घरी बनवलेले काजळ बाळासाठी योग्य आहे का?
लहान मुलांना काजळ लावणे हे डॉक्टरांच्या दृष्टीने अयोग्य आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, तेल संपूर्ण जळून गेल्यानंतर राहिलेल्या काजळीमध्ये कार्बनचे प्रमाण खूप जास्त असते. या काजळीला आपण काजळ म्हणून लहान मुलांच्या डोळ्यात घालत असतो. ही कार्बनयुक्त काजळी बाळांच्या नाजूक डोळ्यांसाठी अजिबात चांगली नाही.
बाहेरील काजळ चांगले आहे का?
आजकाल अनेक बेबी प्रोडक्ट्समध्ये काजळाचा देखील समावेश केला गेला आहे. मात्र बाहेरच्या काजळामध्ये शिसे या धातूचे प्रमाण खूप जास्त आहे. असे काजळ बाळांच्या डोळ्यांमध्ये घातले तर त्यांचे डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे आदी त्रास जाणवू शकतो.
शिवाय शिसे युक्त काजळाची वापरामुळे बाळांच्या मेंदूवर, मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
–
हे ही वाचा – मधुमेह असलेल्या आईने, बाळाला दूध पाजणे कितपत योग्य आहे? वाचा खरे उत्तर!
–
काजळ घालताना होणारे इतर त्रास
बाळांना काजळ घालताना मातांचे हात स्वच्छ नसतील तर काजळासोबत अस्वच्छ हातातून देखील त्यांना त्रास होण्याची भीती असते. घरी तयार केलेल्या काजळामध्ये कार्बन जास्त असल्याने ते देखील खूप हानीकारक आहे.
काजळ घातलेल्या बाळाला अंघोळ घालताना त्या काजळावर पाणी पडते आणि ते काजळयुक्त पाणी बाळाच्या शरीरावरुन वाहत त्याच्या कानात, नाकात, तोंडात जाते असे शिसे किंवा कार्बनमिश्रित पाणी बाळाच्या शरीरामध्ये गेल्यास ते देखील घटक ठरू शकते.
काजळ घालण्याची कारणे :
काजळ घालण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. जसे बाळांचे डोळे मोठे आणि आकर्षक दिसावे, बाळांना डोळ्यांचा त्रास होऊ नये, डोळ्यांना थंडावा मिळवा, त्यांची नजर तीक्ष्ण व्हावी, इतरांच्या वाईट नजेरेपासून रक्षण करण्यासाठी बाळाला काजळ घातले जाते.
काजळ लावायचे झाले तर कुठे लावावे :
जर तुम्हाला बाळाला काजळ लावायचे असेलच तर तुम्ही बाळाच्या कानामागे, कपाळाजवळ केसांमध्ये किंवा तळपायावर काजळ लावू शकता. शक्यतो डोळ्यांमध्ये काळज लावायचा हट्ट टाळावा.
बदामापासून काजळ तयार करण्याची पद्धत :
यासाठी जी सामग्री लागते, ती सर्वांच्याच घरात अगदी सहजच उपलब्ध असते. त्यासाठी खूप खर्चिक वस्तूंची गरज नाही.
साहित्य : दोन बदाम, एक फोर्क, तूप, दिवा, वात आणि एक चमचा
कृती : प्रथम एक तुपाचा दिवा लावा. आता एका फोर्क मध्ये बदाम घेऊन ते जळणाऱ्या वातीवर धरा. सोबतच बदामच्या वर एक चमचा लावा त्यामुळे बदाम झाकला जाऊन चमचा बादमवर आवरणासारखे काम करेल. वातीमुळे बदाम जाळला जाईल. जसे बदाम जळतील तसे चमच्यावर काजळ जमा होईल. शेवटी हे सर्व काजळ चमच्यामधून बाजूला करून डब्ब्यामध्ये भरून ठेऊन पाहिजे तेव्हा वापरू शकता.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – पालकांनो, मुलांच्या आरोग्याशी निगडित या ८ गोष्टी दुर्लक्षिल्यास परिणाम गंभीर होतील!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.