Site icon InMarathi

बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य तर उलगडलं, पण या जागांवरूनही विमान उडवलं जात नाही…!!

bermuda triangle inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हवेतून प्रवास करणारं विमान अचानक गायब होतं. त्याचा नंतर कसून शोध घेऊनही पत्ता लागत नाही. असं काय घडतं ढगांच्या आत की ही विमानं गायब होतात? जगभरात अशी काही कुप्रसिध्द ठिकाणं आहेत, ज्यावरून विमान उडवायला कोणीही वैमानिक तयार होत नाही? का? असं काय रहस्य आहे या ठिकाणांवर?

एअर मलेशियाचं विमान हवेत उडाल्यानंतर गायब झालं होतं. अनेक दिवसांच्या शोधानंतरही हे विमान नेमकं कुठे गेलं, त्याचं काय झालं? हे कळू शकलं नाही.

 

 

आज तंत्रज्ञान खरंतर इतकं अत्याधुनिक झालेलं आहे, की जगाच्या पाठीवर पडलेली सुईदेखील शोधता येणं शक्य आहे. मात्र तेच तंत्रज्ञान अख्खं विमान शोधू शकलं नाही हे दुर्दैवी वास्तव आहे.

काही दशकांपूर्वी बर्म्युडा ट्रॅन्गलची अशीच दहशत होती. बर्म्युडा ट्रॅन्गल एक अशी काल्पनिक भौगोलिक त्रिकोणी स्थिती आहे ज्या ठिकाणाहून जहाजं आणि हवेतून उडणारी विमानं अक्षरश: गायब होतात.

त्यांचं पुढे काय झालं काहीही कळत नाही. ना विमानांचे सांगाडे मिळतात ना जहाजांचे अवशेष. जसं काही हे काही कधीच अस्तित्वात नव्हतं असं सगळं गायब होतं.

 

 

अभ्यासकांनी अखेर एक सुरस अख्यायिका असणार्‍या बर्म्युडा ट्रॅन्गलचा अभ्यास करायला सुरवात केली. पृथ्वीच्या या भागात असं नेमकं काय गौडबंगाल दडलेलं आहे की अशा घटना घडतात? याचा शोध घेत गेलं असता अनेक शास्त्रीय गुपितांची उकल झाली.

===

हे ही वाचा – बर्म्युडा ट्रँगलचं गुपित उलगडलं असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! वाचा ‘खरं’ रहस्य…

===

पूर्वी सुरसकथांचा विषय असणारा बर्म्युडा ट्रॅन्गल अखेर निसर्गाचा एक अनोखा चमत्कार असल्याची उकल झाली. आता या मार्गावरुन प्रवास टाळले जाऊ लागले आहेत.

बर्म्युडा ट्रॅन्गलच नव्हे तर जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे हमखास अशा दुर्दैवी घटना घडतात. भौगोलिक परिस्थितीमुळे वैमानिक या मार्गांवरून विमान नेणं टाळतात. कोणती आहेत अशी ठिकाणं?

माऊंट एव्हरेस्ट

तुम्हाला माहितच आहे, की माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच गिरी शिखर आहे. प्रवासी विमानं साधारणपणे ३० हजार फ़ुटांवरून प्रवास करतात मात्र एव्हरेस्टची उंचीच ३० हजार फुटांना गाठणारी असल्यानं या पर्वतराजींवरून विमान उडणं कठीण जातं.

 

 

पर्वतराजीच्या आजूबाजूला वार्‍याचा जोर जास्त असतो. यामुळे हवेतून जाणार्‍या विमानाचं संतुलन राखणं कठीण होऊन बसतं. यामुळेच जगभरातल्या विमान कंपन्या आणि वैमानिक या मार्गावरून उड्डाण करणं टाळतात, नव्हे करतच नाहीत.

जर हिमालयाची उंची टाळायची तर विमानांना आणखी उंच जात उडवावं लागेल. इथे प्राणवायू विरळ असल्यानं प्रवाशांसाठी हे घातक ठरू शकतं.

असं म्हणतात की विमानांचे मार्ग हे curved routes असतात, जेणेकरून इमर्जन्सी लॅण्डिग करावं लागलं तर जमीन उपलब्ध असेल. हिमायलात मनुष्य वस्ती विरळ असणं, रडार यंत्रणेचा अभाव असल्यानं जर विमान दुर्घटनाग्रस्त झालं तर वैमानिक याठिकाणांहून संपर्क शाधू शकणार नाहीत. म्हणून या मार्गावरून विमानं उडत नाहीत.

===

हे ही वाचा – विमानातील विष्ठा नेमकी जाते कुठे? प्रत्येकाला भेडसावणा-या या प्रश्नाचं शास्त्रिय उत्तर

===

तिबेट

तिबेटला जगाचं छप्पर म्हटलं जातं. उंच उंच पर्वतराजींनी वेढलेला हा प्रदेशही हवाई उड्डाणासाठी टाळला जातो. हवेचं असंतुलन हा मोठा घटक याला कारणीभूत आहे.

दुसरी गोष्ट अशी, की जर काही तांत्रिक बिघाड झाला तर पाण्यावर विमान उतरवणं सोपं असतं, मात्र पर्वतराजींवर विमानाचं इमर्जन्सी लॅण्डीग करणं धोकादायक असतं. याच कारणामुळे खबरदारी म्हणून तिबेटचा हवाई मार्ग टाळण्याकडे वैमानिकांचा कल असतो.

 

 

एव्हरेस्ट प्रमाणेच ३० हजार फुटांवरून उडणार्‍या विमानांना जमिनीवरची ३० हजार फुटांच्या जवळपास असणारी पर्वतराजी त्रास देते. सुरक्षेसाठी विमानांना आणखी वर जावं लागतं जिथे प्राणवायू विरळ होतो, एअर टर्ब्युलन्स जास्त असतो यामुळे प्रवाशांना अस्वस्थ वाटू शकतं. हा प्रवास सुखकर होऊ शकत नाही.

जर इथून प्रवास करायचा तर प्रवाशांना दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजन पुरवावा लागेल आणि विमानात केवळ २० मिनिटं पुरू शकेल इतपतच ऑक्सिजनचा पुरवठा असतो.

माऊंट एव्हरेस्ट बगलेत घेऊन विसावलेलं तिबेटचं हवामान हवाई उड्डाणासाठी अगदी प्रतिकूल मानलं जातं. इथे वार्‍याचा वेग इतका भयानक आहे, की इथून विमान उडवणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण आहे.

तिबेटमधेही विमानतळ आहे. जिथे विमानं उतरतात, मात्र ही धावपट्टी इतकी अरूंद आहे की इथे विमान उतरवणं हे ‘खतरों के खिलाडी’सारखं काम ठरू शकतं.

प्रशांत महासागर

जसं हिमालयाच्या पर्वतशिखरांवरुन विमानं उडत नाहीत, तशीच ती प्रशांत महासागरावरूनही उडत नाहीत. याचं कारण म्हणजे प्रशांत महासागराचं क्षेत्रफळ!

 

 

दीर्घकाळ विमान जमिनीच्या संपर्कक्षेत्राशिवाय उडणं कधीही धोकादायकच असतं. म्हणून विस्तीर्ण पसरलेल्या प्रशांत महासागारावरूनही विमानं उडवली जात नाहीत. जेणेकरून काही दुर्घटना घडलीच, तर लँडिंग सोपं व्हावं.

ही सगळी उकल अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर झालेली आहे. पूर्वी याची कल्पना नसल्याने या मार्गांवरून उडणारी विमानं गायब झाली की ती रहस्यमयी घटना वाटत असे.

===

हे ही वाचा – या महासागरात ५ महीने अडकलेल्या होत्या २ तरुणी – वाचा एक चित्तथरारक अनुभव

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version