नेपाळमधे “Energy Emergency” – भारत भागवणार नेपाळची विजेची अर्धी गरज
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
नेपाळमधे वीज टंचाई निर्माण झाली आहे. इतकी – की रोज 13 तासांचं भार नियमन (लोडशेडिंग) करावं लागत आहे. परिणामस्वरूप – नेपाळमधे उर्जा-आणीबाणी, Energy Emergency, लागू करण्यात आली आहे.
नेपाळचे ऊर्जामंत्री टोपबहादुर रायमाझी म्हणाले आहेत :
“ऊर्जा टंचाईवर मात करण्यासाठी ही आणीबाणी लागू करण्यात आली आहे.”
गेल्या 8 वर्षात ऊर्जा आणीबाणी लागू करण्याची ही तिसरी वेळ आहे.
ह्यावर तातडीने उपाय म्हणून नेपाळ सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यातील एक आहे – भारताकडून गरजेच्या ५०% वीज आयात करणे.
नेपाळ प्रशासनाच्या आखणीनुसार येत्या दोन वर्षात सौर आणि पवन ऊर्जेच्या स्त्रोतांद्वारे ऊर्जेची टंचाई संपवण्यात येणार आहे. त्याच बरोबर जल-विद्युतद्वारे वीज निर्मितीत भर घालण्यात येणार आहे.
ह्याच plan नुसार, गरजेच्या 50% वीज भारताकडून आयात करून येत्या वर्षभराची विजेची भूक भागवण्यात येणार आहे. नेपाळी सरकारनुसार पुढील 2 वर्षात नेपाळ भार नियमनापासून पूर्णपणे मुक्त होणार आहे.
सध्या नेपाळला 1400 MW इतकी विजेची गरज आहे. त्यांची जल-विद्युत निर्मिती फक्त 300 MW आहे – परंतु तब्बल 83,000 MW एवढी जलविद्युत निर्मिती करण्याची नेपाळची क्षमता आहे.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi