आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पाकिस्तान हा जरी मुस्लीम देश असला तरी असा विचार करण्याचे काही कारण नाही की तेथे हिंदू धर्मीय नाहीत! पाकिस्तान मध्ये आजही हिंदू धर्मीय बऱ्याच प्रमाणात आढळून येतात.
आता हिंदू धर्म पाकिस्तानामध्ये अस्तित्वात आहे म्हणजे हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे असायलाच हवीत आणि हो खरंच तेथे हिंदू मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर म्हणजे बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज मातेचे मंदिर!
बलुचिस्तान प्रांतात मकरान कोस्टल हायवे वर एक साईन बोर्ड अनेक वर्षांपासून ठाण मांडून उभा आहे आणि तेथून जाणाऱ्या प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीचे तो लगेच लक्ष वेधून घेतो. हा साईन बोर्ड पाहताच पाहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर देखील कुतुहलाचे भाव उमटल्याशिवाय राहत नाहीत.
कारण हा तोच साईन बोर्ड आहे जो मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता दर्शवतो आणि आपसूकच भाविकांची पाऊले परमुलखातील हिंगलाज मातेच्या मंदिराकडे वळतात.
बलुचिस्तान प्रांतामध्ये अल्पसंख्याक हिंदू आहेत आणि त्यांची या मंदिरावर अपार श्रद्धा आहे.
हिंगलाज भवानी शक्तीपिठ ५१ शक्तीपिठांपैकी एक मानले जाते. जे मंदिर सती मातेशी निगडीत आहे. सती माता भगवान शंकरांची पहिली पत्नी होय. अग्नीत प्रवेश केल्याने जळालेल्या सतीच्या शरीराला घेऊन व्याकूळ भगवान शंकराने तांडव नृत्य सुरु केले तेव्हा भगवान विष्णूने जगाचा विनाश रोखण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यास सुरुवात केली. सती मातेच्या शरीराचे हे अंश जेथे जेथे पडले ती ठिकाणे शक्तीपिठे म्हणून उदयास आली.
सती मातेच्या शरीराचे काही अंश बलुचिस्तान मधील ठिकाणी पडल्याचे सांगण्यात येते, म्हणूनच येथील हिंदू लोकांच्या दृष्टीने या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आजही येथील हिंदू धर्मीय मोठ्या भक्तिभावाने मंदिराची देखभाल करतात, त्यामुळेच हे मंदिर इतक्या वर्षानंतरही येथे टिकून आहे. स्थानिक लोक या मंदिराला ‘नानी का मंदिर’ म्हणून ओळखतात.
केवळ बलुचिस्तान मधील हिंदू धर्मीयच नाही तर मुस्लीम धर्माच्या स्थानिक लोकांना देखील या मंदिराबद्दल आस्था आहे आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्या देखील मंदिर आणि त्याच्याशी निगडीत परंपरा टिकवून ठेवतील अशी त्यांना खात्री आहे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.