आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजच्या काळात सर्वांनाच आर्थिकरित्या मजबूत राहणे खूप आवश्यक आहे. स्वतःचा खर्च स्वतः करण्यासाठी आणि स्वावलंबी राहण्यासाठी प्रत्येक स्त्री पुरुषाने स्वतःच्या पायावर उभे राहणे खूप गरजेचं आहे. सर्वच पुरुष बिजनेस, नोकरी करत स्वतःच्या पायावर उभे असतात. मात्र स्त्रियांना याबाबत अनेक मर्यादा असतात.
लग्नानंतर आपले शहर सोडून दुसरीकडे जाणे, काही सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे देखील स्त्रियांना त्यांच्या नोकरीवर पाणी सोडावे लागते. मग अशा वेळेस काही महिला त्यांना मिळणारा फावला वेळ त्यांचे छंद जोपासण्यासाठी देतात.
आजच्या काळात तंत्रज्ञानाने आणि सोशल मीडियाने अनेक विविध दरवाजे लोकांना उघडून दिले आहेत, ज्याचा योग्य वापर करून आपण आपल्या छंदालाच आपल्या उपजीविकेचे साधन बनवू शकतो.
आज आम्ही या लेखातून तुम्हाला अशाच काही छंदांची माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्ही घरीबसुनच चांगले पैसे मिळवू शकतात.
लिखाण
जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुम्ही चांगले लिहू शकत असला तर हा पर्याय तुमच्यासाठी खूप योग्य आणि चांगला आहे. तुम्ही तुमच्या या आवडीलाच तुमचा इन्कम सोर्स बनवू शकता.
तुम्ही तुमच्या सोयीने आवडत्या विषयांवर ब्लॉग्स लिहू शकतात, कथा लिहू शकतात, तुमचे अनुभव लिहू शकतात.
हे लिखाण तुम्ही सोशल मीडियावर टाकून त्यातून एक चांगला पैसा मिळवू शकतात. सोबतच तुमच्यासोबत अनेक लोकं देखील जोडले जातात. फक्त यात तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काही काळ वाट बघावी लागते.
एकदा लोकांना तुमचे लिखाण आवडू लागले की तुम्हाला पैसा मिळायला सुरुवात होते.
त्यासह काही पब्लिकेशन्स, संस्था यांसाठी कन्टेन्ट लिखाण, स्क्रिप्ट रायटिंग असे पर्यायही तुम्हाला घरबसल्या खुले होतात.
ग्राफिक डिझायनिंग
आजकाल अनेक लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी आमंत्रण पत्रिका तयार करणे, सोशल मीडियासाठी विविध ग्राफिक्स करणे, वेबसाईट डिझाइन करणे, लोगो करणे आदी अनेक काम ग्राफिक डिझायनर करतात.
जर तुमचा देखील एखादा ग्राफिक कोर्स झाला असेल किंवा तुम्हाला असे काही काम करता येत असतील तर तुम्ही बिनधास्त ही कामे घरी बसून सुरु करू शकतात. याबद्दल तुम्ही सोशल मीडियावरही माहिती किंवा जाहिरात देऊन ही कामे मिळवू शकता.
जसंजसे तुमचे काम वाढेल तसतसा तुमचं इन्कम देखील वाढेल, यात एक गोष्ट नक्की करत जा तुम्ही आधी केलेल्या कामाची माहिती, फोटो देखील लोकांना माहितीसाठी म्हणून द्या. जेणेकरून तुमचे काम त्यांना नीट समजेल.
–
हे ही वाचा – “रसौडे मे कौन था”ला व्हायरल करणारा जिंगलस्टार सोशल मीडियाचा ‘वापर’ शिकवतोय!
–
विनोदी लिखाण
तुमची विनोदबुद्धी जर बेफाम असेल आणि तुम्हाला नेहमी वेगवेगळी गंमतीशीर वाक्ये किंवा दूर काही सुचत असेल तर तुम्ही तुमच्या विनोदबुद्धीच्या जोरावरही पैसा कमवू शकता.
सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर मिम्स, अनेक कॉमेडी व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात. जर तुमच्याकडे अशा प्रकारची प्रतिभा असेल तर तुम्ही देखील अशा मजेदार मिम्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून ते व्हायरल करू शकतात.
एकदा तुम्हाला तुमचे प्रेक्षक सापडले की, तुम्ही तुमच्या या व्हिडिओ किंवा फोटोंसाठी विविध स्पॉन्सर, जाहिराती घेऊ शकतात. यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.
कुकिंग
पोट भरण्यासाठी केला जाणारा स्वयंपाक आज उत्पनाचे अतिशय उत्तम आणि चांगले, सोपे माध्यम बनला आहे.
आपण सोशल मीडियावर अनेक खाद्यपदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ सर्रास बघतो. तुम्ही देखील घरीच बसून रोज तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांचा व्हिडिओ किंवा फावल्या वेळेत तुमच्या खास रेसिपींचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड करू शकतात.
तुमच्या या व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद पाहून तुम्ही वेगवेगळ्या उत्पादनाच्या जाहिराती करू शकतात. यातून चांगला पैसा नक्कीच कमवू शकतात.
पेंटिंग
हो, चित्रकला किंवा पेंटिंग देखील पैसे कमवायचा एक उत्तम मार्ग आहे. अनेकांना चित्र काढायला खूप आवडते. हीच कला किंवा हाच छंद तुम्हाला एक स्थिर उत्पन्न मिळवून देईल.
पेंटिंग काढताना आपण आपल्या भावना, विचार, आजूबाजूची परिस्थिती यांचा आधार घेत साकारतो. तुम्ही जर उत्तम चित्रकार असाल, तर तुम्ही तुमची चित्रे अनेक माध्यमांच्या साहाय्याने विकीसाठी काढू शकतात. यात सोशल मीडियाचा देखील खूप चांगला फायदा तुम्हाला होईल.
योगा
आजच्या जीवन शैलीत स्वतःला फिट आणि आरोग्यदायी ठेवणे खूप आवश्यक आहे. यासाठी सर्वजण वेगवेगळ्या व्यायामांचा आधार घेतात.
जर तुम्ही योगामध्ये तज्ञ असाल तर तुम्ही तुमचे योगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू शकतात. यातून देखील तुम्ही पुढे जाऊन जाहिरातींच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते.
त्यासह योगाचे क्लासेसही सुरु करू शकता.
फोटोग्राफी
अनेकांना फोटो काढायला खूप आवडते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढण्यासाठी हे लोक सदैव तयार असतात.
आज जरी तंत्रज्ञान वाढले असले, तरी फोटोना तेवढेच किंबहुना अधिक महत्व मिळाले आहे. लग्नाआधी प्रीवेडिंग फोटोग्राफी सोबतच मॅटर्निटी फोटोग्राफी, बेबी शूट आदी अनेक वेगवेगळे गोष्टींसाठी पोटोशूट करण्याचा ट्रेंड सध्या जोरदार चालू आहे.
त्यासाठी जर तुम्हाला फोटोग्राफी मध्ये रस असेल तर तुम्ही काही दिवस एखाद्या मोठ्या एजेन्सीमध्ये काम करून अनुभव मिळवू शकतात. त्यानंतर स्वतःच सेटअप टाकू शकता.
फोटोग्राफीचा सेटअप जरा खर्चिक असल्यामुळे आधी कामाचा अनुभव मिळवून मग स्वतःचा सेटअप सुरु करता येऊ शकतो.
–
हे ही वाचा – नकळत तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारा छंद – फोटोग्राफी!
–
शिवणकाम
जर तुम्ही शिवणकाम करण्यामध्ये माहीर असाल तर तुम्ही स्वतःचे शिवणक्लास सुरु करू शकतात.
शिवाय वेगवगेळ्या नवनवीन डिझायनिंग, शिवणकामाचे व्हिडिओ तयार करून त्या देखील सोशल मीडियावर टाकू शकतात. तुमच्या पेजला किंवा चॅनेलला भरपूर प्रेक्षक मिळाले की यातूनही पैसे मिळायला सुरुवात होते.
नृत्य
जर तुम्ही उत्तम डान्सर असाल तर सुरुवातीच्या काळात तुम्ही तुमचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू शकता. जर तुम्हाला एकापेक्षा अधिक डान्सचे प्रकार येत असतील तर अजूनच चांगले!
सोशल मीडियावर तुम्हाला चांगले प्रेक्षक मिळाले आणि तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही तुमचे नृत्याचे क्लासेस सुरु करू शकता. आणि जर जागा नसेल ही तर आता डान्स शिकण्यासाठी ऑनलाइन डान्स क्लास हा देखील एक उत्तम मार्ग आहे.
डान्स हा छंद असण्यासोबतच शरीरासाठी एक चांगला व्यायाम सुद्धा आहे. त्यामुळे सध्या डान्सला सुगीचे दिवस आले आहे. यातून देखील चांगले उत्पन्न मिळू शकते.
आर्ट अँड क्राफ्ट
सध्या आर्ट आणि क्राफ्ट या व्हिडिओंना सोशल मीडियावर खूप मागणी आहे. टाकाऊतून टिकाऊ, घर सजवण्याच्या, गिफ्ट्स आदी असंख्य गोष्टींच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर प्रचंड मागणी आहे.
त्यामुळे जर तुमच्यातही अशी काही कला असेल तर नक्कीच तुम्ही चांगला पैसा या कलेतून मिळवू शकतात.
सोशल मीडिया हँडलिंग
कलाकारांपासून मोठमोठ्या लोकांपर्यंत सर्वानाच आजच्या काळात सोशल मीडियावर चर्चेत राहावे लागते. त्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे देखील खूप महत्वाचे असते. मात्र अशा मोठ्या लोकांना सोशल मीडिया सांभाळण्यासाठी वेळ नसल्याने ते काही टीम तयार करतात ज्या त्यांचे सोशल मीडिया सांभाळतात.
तुम्हाला जर सर्व सोशल मीडियाचे उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही नक्कीच असे काम घरी बसून करू शकतात. यासाठी काही कोर्स देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.