Site icon InMarathi

लालू प्रसाद फ्लर्ट करत पाकिस्तानी अँकरला चक्क “आती क्या घुमने?” म्हणाले होते…

navajish and lalu inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लालू प्रसाद हे राजकारणातील बडं प्रस्थ! अर्थात केवळ राजकारणी म्हणूनच नव्हे तर एकंदरित लालूचं व्यक्तीमत्व, राबडी- लालू यांची जोडी, खास युपी शैलीतील त्यांची भाषणं हे सगळंच कायम हिट ठरलं.

 

 

‘युपी आणि लालू’ हे समीकरण तर इतकं पक्कं की “जब तक रहेगा समोसे मे आलू, तब तक रहेगा बिहार मे लालू” अशा मिम्सनाही लालूंची भुरळ पडली होती.

सध्या लालूंची तितकीशी हवा नसली तरी एकेकाळी लालू नावाचं वादळ वारंवार घोंगावताना दिसायचं. कधी राजकारण, कधी वादग्रस्त मुद्दे तर कधी आपली विनोदी शैली, हम भी किसीसे कम नही हे सिद्ध करण्यासाठी लालू नेमकं काय करतील याचा अंदाज नसायचा.

लालूंचा चाहतावर्ग केवळ युपीतच नव्हे तर देशभर पसरलेला होता, इतकं नव्हे तर थेट पाकिस्तानातही लालूंचे फॅन्स होते.

लालूंची हटके स्टाईल फॉलो करण्याचाही प्रयत्न पाकिस्तानाही तरुणांकडून होत होता. हेच चित्र पाहून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांनी म्हटलं होतं की, लालू यांनी पाकिस्तानातही निवडणूक लढली तर ते निवडून येतील. आता की भिती होती की टोमणा, याचा मात्र त्यांनी खुलासा केला नव्हता.

 

हे ही वाचा – कोण म्हणतं राजकारणी रोमँटिक नसतात? वाचा राजकारण्यांच्या ८ सदाबहार प्रेमकहाण्या

तर झालं असं, की लालूंबाबत पाकिस्तानातील जनतेची वाढती क्रेझ लक्षात घेत, पाकिस्तानी मिडीयालाही लालूंची भुरळ पडली. पाकिस्तानी प्रेक्षकांसाठी लालूंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घ्यावी यासाठी हालचाली सुरु झाल्या.

पाकिस्तानची प्रसिद्ध अँकर बेगम नवाजिश अली हिच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे परवानग्या, वेळापत्रक असे सोपस्कार पूर्ण करत २००८ मध्ये नवाजिश पाकिस्तानहून दिल्लीत दाखल झाली.

मुळातच दिसायल्या देखण्या असलेल्या हुशार नवाजिशचेही अनेक चाहते होते, तिची बोलण्याची लकब, खास पाकिस्तानी सौंदर्य, कुशाग्र बुद्धीमत्ता यांमुळे ‘लेट नाईट विथ नवाजिश अली’  हा तिचा शो चांगलाच गाजला होता. या शो मध्ये आपल्या लाडीक बोलण्याने ती स्टुडिओत येणाऱ्या पाहुण्यांचं मन जिंकायची.

 

 

एकंदरित हा शो आणि त्यातील नवाजिशचे नखरे यांची पुर्वकल्पना असल्याने “असे कोणतेही विचित्र कृत्य, अथवा संभाषण तिने लालूंसोबत करू नये” अशी खास ताकीद तिला देण्यात आली होती. त्यानूसार सावधानता बाळगून नवाजिश लालूंना प्रश्न विचारत होती.

सुरुवातीचे औपचारिक संभाषण झाल्यानंतर प्रत्यक्ष लालूचं आपल्याशी फ्लर्ट करत असल्याचा तिला संशय आला, मात्र त्याकडे दूर्लक्ष करत तिने मुलाखत सुरु ठेवली.

त्यानंतरही लालूंचे काही प्रतिसाद पाहता ते फ्लर्ट करत असल्याचा तिचा संशय बळावला, मात्र कदाचित त्यांनी आपल्या शो चे काही भाग पाहिले असल्याने ते याप्रमाणे वागत असतील अशी तिने समजूत करून घेतली.

 

 

मात्र त्यानंतर लालूंची हिंमत वाढली, ते नवाजिशला म्हणाले, “खरं तर केवळ तुमचं नाव ऐकून मी मुलाखतीसाठी तयार झालो, अन्यथा कोणत्याही पाकिस्तानी मिडीयाला मुलाखत देण्यास मी तयार नव्हतो.

यावर हसून प्रतिक्रिया देणा-या नवाजिशला शॉक लागला तो लालूंच्या पुढच्या वाक्याने. ते म्हणाले, “आपण आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटलो आहोत, तुम्ही आता भारतात आला आहातच, तर माझ्यासोबत फिरायला चला, मी तुम्हाला संपूर्ण भारत फिरवून आणेन, इथल्या अनेक रस्त्यांवर ब्लॅक अण्ड व्हाईट फिल्म्स दाखवेन”.

 

 

पुढील जुजबी प्रश्नांनंतर तिने मुलाखत संपवली आणि लालूंचा निरोप घेतला. या घटनेनंतर लालूंची तिची पुन्हा भेट झाली नाही. मात्र भारतातील एका खाजगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नवाजिशने या प्रसंगाचा खुलासा केला होता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version