' सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!! – InMarathi

सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात, सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, तर ते म्हणजे आपले आरोग्य. आजच्या काळात अनेकजण फिटनेस फ्रिक झालेले पाहायला मिळतात. डाएट आणि वर्कआऊट या गोष्टींकडे बरेच जण लक्ष देऊ लागले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जिम असो किंवा मॉर्निंग वॉक व्यायाम करणं ही लोकांची आवड बनली आहे. या व्यायामात आणखी एक महत्त्वाचा पर्याय निवडला जातो आणि तो म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.

 

cycling inmarathi

 

तुम्ही जर व्यायाम म्हणून सायकलिंग करत असाल, तर त्याचे फायदे ठाऊक असणं गरजेचं आहे. वजन कमी करणं, हा फायदा तर आपल्यापैकी अनेकजण जाणून असतील. मात्र याशिवाय सुद्धा सायकलिंगचे अनेक फायदे आहेत. आज असेच काही फायदे जाणून घेऊया.

१. मानसिक आरोग्य सुधारणे

इतर अनेक व्यायामांचा जसा मानसिक आरोग्यावर उत्तम परिणाम होतो, तसाच सायकलिंग हा सुद्धा त्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. डिप्रेशन, ताणतणाव आणि चिंता या मानसिक त्रासांपासून दूर व्हायचं असेल, तर सायकल चालवण्याचा पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता.

 

mental health issue inmarathi

 

सायकल चालवणं ही जर तुमची आवड असेल, तर मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी अधिक मदत होईल यात शंकाच नाही.

२. मधुमेहावरील उपाय

मधुमेह अर्थातच डायबेटीस हा आजच्या काळातील अगदी नियमित असा आजार झालेला आहे. हालचाल आणि व्यायामाचा अभाव हे याचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.

 

diabetes inmarathi

 

योग्य व्यायामासाठी सायकलिंग हादेखील चांगला पर्याय ठरतो आणि हा व्यायाम डायबेटिसवरील चांगला उपाय सुद्धा ठरतो. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की रोज किमान अर्धा तास सायकलिंग केल्यास मधुमेहाचा धोका जवळपास ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

===

हे ही वाचा – कुणीही करू शकेल इतके सोपे ८ व्यायामप्रकार मधूमेहापासून १००% दूर ठेवतात…

===

३. हृदयाच्या आजारांपासून दूर ठेवते सायकल

हार्ट अॅटॅक, ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक सारखे आजार हृदयावर ताण आल्यामुळे घडू शकतात. हृदय जपणं हे किती गरजेचं आहे, हे आपल्यापैकी कुणालाही सांगायची गरज नाही.

 

heart-attack-inmarathi

 

सायकलिंगमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात, रक्तातील फॅट्स कमी होण्यास मदत होते. याशिवाय श्वासोच्छवासावर उत्तम नियंत्रण मिळवण्यासाठी फायदा होतो. पर्यायाने, हृदय अधिक सुदृढ होण्यास मदत होते.

४. रोगप्रतिकार शक्ती वाढवते

व्यायाम आणि वाढणारी रोगप्रतिकारशक्ती हे समीकरण आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असतं. हृदय सुदृढ करू शकणारं सायकलिंग यात मागे असेल, हे होणं शक्य नाहीच.

 

immune system inmarathi

 

आठवड्यातून किमान ३ ते ५ दिवस सायकलिंग करणं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल.

===

हे ही वाचा – नुसतं दूध नव्हे तर दुधात ‘हे’ १० पदार्थ घालून प्याल तर “इम्युनीटी” कित्येक पटींनी वाढेल!

===

५. संधिवातासारखे हाडांचे आजार

 

knee pain inmarathi

 

सायकलिंगमुळे स्नायू आणि हाडांची ताकद वाढते. अवयवांची सुसूत्रता वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीर सुदृढ होते. हाडं मजबूत झाल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी होते.

थोडक्यात काय, तर संधिवातासारख्या आजारांवर सायकलिंग हा उत्तम आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.

६. कॅन्सरपासून सुद्धा वाचवते

काही संशोधनांमधून अशी माहिती सुद्धा मिळाली आहे, की नियमित सायकलिंग केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. नियमितपणे सायकलिंग केल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.

 

breast cancer inmarathi

 

याशिवाय आतड्यांचा कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा सायकलिंग करणे फायदेशीर ठरते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – खरं वाटणार नाही पण, कोणतेही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?