' वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांना धूळ चारणारा असाही अफाट योद्धा! – InMarathi

वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांना धूळ चारणारा असाही अफाट योद्धा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं’ अशा आवेशानं भारतीयांनी ब्रिटिशांविरुध्दच्या पहिल्या सशस्त्र स्वातंत्र्य संग्रामाचं रणशिंग फुंकलं. देशभरातून या स्वातंत्र्य संग्रामात अनेक लहान थोरांनी उड्या घेतल्या.

मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करायचं या एकमेव ध्येयानं भारून जाऊन अनेकांनी यात सहभाग घेतला.

तरूण तर यात अग्रेसर होतेच, मात्र वयानं थोर असणारेही यात सहभागी झाले. यातलंच एक नाव म्हणजे, वीर बाबू कुंवर सिंह!

 

babu kunwar singh inmarthi

 

१७७७ साली बिहार येथील शाहाबाद (भोजपूर) जिल्ह्यातील प्रसिध्द भोज शासक वंशात त्यांचा जन्म झाला. शाहाबादच्या संपन्न जहागिरींचे मालक असणारे वीर बाबू कुंवरसिंह सह्रदयी म्हणून परिचित होते.

जनतेचा त्यांच्यावर लोभ होताच शिवाय ब्रिटिश अधिकार्‍यांसोबतही त्यांचे चांगले संबंध होते. मात्र संबंध चांगले होते, मैत्रीपूर्ण संबंध होते याचा अर्थ असा नाही की ते ब्रिटिशांचे अंकीत बनले.

एक सीमा रेषा त्यांनी कायम पाळली. ब्रिटिश अधिकार्‍यांनाही पूर्ण कल्पना होती की वेळ आली तर बाबू कुंवर सिंह आपल्या समोर उभे ठाकतील. घडलंही तसंच.

===

हे ही वाचा स्वत:चे शीर हातात घेऊन, मातृभुमीसाठी अहोरात्र लढणारा महान शीख योद्धा!

===

कुंवरसिंहांना आपल्या समोर विरोधात उभं बघून ब्रिटिशांनी त्यांची आवडती निती अवलंबायला सुरवात केली. फोडा आणि तोडा. भारतीय सैनिकांना पैशाची लालूच दाखवत त्यांनी कुंवरसिंहाकडून न लढण्याचं वचन घेतलं.

कुंवरसिहांची कुमक तुलनेनं लहान असली तरीही प्रयेक जीव लाखजणांना हरवेल अशा त्वेषात होता. कुंवरसिंर युध्दनितीत कुशल होते. ते प्रत्येक लढाईच्यावेळेस नीती बदलत असत. या बदलत्या नितीनं ब्रिटिश गोंधळून जात असत आणि रणनीती बनवेपर्यंत कुंवरसिंहांकडून हरलेल असत.

१८५७ साल उजाडलं आणि मंगल पांडे नावाच्या योध्यानं संग्रामाचं रणशिंग फ़ुंकलं. बघता बघता संपूर्ण देश धडाडीनं त्यांच्या पाठीशी उभा राहिला.

 

mangal pandey inmarathi

 

बाबू कुंवरसिंह यांनी भारतीय सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व केलं. २७ एप्रिल १८५७ या दिवशी दानापूर शिपाई तुकडी, भोजपूरी जवान आणि इतर साथीदारांसोबत त्यांनी आरा नगरावर चाल करून त्यावर कब्जा मिळवला.

आरा जेल तोडून तिथल्या कैद्यांची मुक्तता करून त्यांनी त्यांच्या या संग्रामातील सहभागाला दणदणीत सुरवात केली. कुंवरसिंह यांचं यानंतरचं लक्ष्य होतं, बीबीगंज.

२ ऑगस्ट १८५७ या दिवशी बीबीगंजवर चालून जात त्यांनी ब्रिटिशांचं धाबं दणाणून सोडलं. त्यांना सळो की पळो करून सोडत त्यांनी बीबीगंजवर ताबा मिळवला. बीबीगंज आणि बिहियाच्या जंगलात ब्रिटिशांविरूध्द घमासान युध्द झालं.

बीबीगंज फत्ते करून पुढे ते त्याच आवेशात जगदीशपूरकडे निघाले. याठिकाणी ब्रिटिशांनी चांगली कुमक ठेवली होती. ब्रिटिशांनी जगदीशपूरमधे तुफान गोळीबार केला.

 

babu veer singh inmarathi

 

जखमी, जायबंदी झालेल्या योध्यानांही ब्रिटिशांनी निर्दयीपणे फासावर लटकवलं. महाल ओस पडले, किल्ल्यांची भकास भगदाडं भयाण वाटू लागली. या मार्‍यासमोर मात्र कुंवर बाबूसिंहाचा ठाव राहिला नाही.

===

हे ही वाचा या लढवय्याच्या साहसापुढे नतमस्तक होत अकबर म्हणाला “शत्रु असावा तर असा”….

===

त्यांना इथे पराजयाला तोंड द्यावं लागलं. मात्र या अपयशानं खचून न जाता उलट आणखीच त्वेषानं ते ब्रिटिशांवर चालून गेले.

१८५७ च्या सप्टेंबरला ते रीवाकडे निघाले. याठिकाणी त्यांची नानासाहेब पेशव्यांशी भेट झाली. नानसाहेबांशी सल्लामसलत करून ते पुढच्या मोहिमेवर निघाले.

 

nana fadnvis chat inmarathi

 

बांद्याहून कालपीला पोहोचत असतानाच तात्यांना ब्रिटिशांनी मात दिली आणि बाबू कुंवर सिंह कालपिला न जाता लखनौला आले.

कुंवरसिंह आणि त्यांचे रामगढचे बहादूर शिपाई यांच्या पलटणीनं बांदा, रीवा, आजमगढ, बनारस, बलिया, गाजीपूर आणि गोरखपूरमधे विजयपताका फडकावली होती. मात्र हा विजय अल्पकालिन ठरला कारण इंग्रजानी लखनौ काबिज करत आजमगढावर पुन्हा ताबा मिळविला.

आजमगढ नंतर ते गाजीपूरच्या मन्नोहर गावात पोहोचले. तिथून नदीपार करून २२ एप्रिलला जगदीशपूरला आले. याची खबर कोणा देशद्रोह्यानं ब्रिटिशांपर्यंत पोहोचवली.

कुंवरसिंह बिहारला परतत असताना गंगा पार करत होते आणि इंग्रजांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गोळिबार केला. त्यातल्याच एका गोळीनं त्यांचा वेध घेतला.

जीवावरचं हातावर बेतलं. गोळिचं विष झपाट्यानं पसरत होतं. मागचा पुढचा विचार न करता हातातली तलवार त्यांनी या दुसर्‍या हातावर सप्पकन चालवून तो हात गंगार्पण केला.

आपल्या साथीदारांसोबत ते ब्रिटिशांना चकवून जंगलात निघून गेले. इंग्रज फौजेला हरवून २३ एप्रिल १८५७ ला ते जगदीशपूरला पोहोचले तेव्हा ते गंभीररित्या जायबंदी झालेले होते.

 

babu 2 inmarathi

 

त्यांच्यावर उपचार सुरू झाले आणि त्यांना आरामाचा सल्ला दिला गेला मात्र स्वातंत्र्याच्या विचारानं भारलेल्या कुंवरसिंहाना क्षणाची विश्रांती घेणंही मान्य नव्हतं.

तशाही अवस्थेत त्यांनी त्यांच्या आयुश्यातलं अखेरचं युध्द पुकारलं आणि ब्रिटिशांच्या कब्जातून जगदीशपूर सोडवलं.

मनात धगधगती आग असली तरीही शरीरातली आग विझत चालली होती, वैद्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र तीनच दिवसांनी म्हणजे २६ एप्रिल १८५७ या थोर योध्याला वीरमरण आलं.

===

हे ही वाचा इंग्रजांसमोर कधीही शस्त्र न टाकणारा एक ‘पराक्रमी’ योद्धा : यशवंतराव होळकर

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?