Site icon InMarathi

तुम्ही सुदृढ ‘दिसता’ पण या १३ सवयी तुम्हाला आतून पूर्ण पोखरून काढतात!

sonu inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल सर्वचजण फिटनेस गुरु झालेले दिसून येतात. आधीच वर्षभरापासून कोरोनामुळे  सर्व जण घरात अडकलेले होते, आता हळू हळू लोक बाहेर पडू लागलेत. तरी सुद्धा अनेक सिनियर सिटीझन आज ही कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडत नाहीयेत.

गेल्या वर्षभरापासून एकीकडे कोरोनाचे सावट तर जगभरात होतेच तर दुसरीकडे लोकांना फिटनेस बद्दल चिंता होती. त्यामुळे लोकांनी घरातच व्यायाम, योगासने करण्यास सुरवात केली. जिम, उद्याने चालू झाल्यावर लोकांचा साहजिक तिकडे ओढा वाढू लागला.

कोरोना पुन्हा एकदा डोकंवर काढत आहेत, अनेक ठिकाणी निर्बंध लागले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या रुळावर येणाऱ्या आयुष्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा आपला फिटनेस ठेवणे हे गरजेचे आहे.

 

 

अनेकांच्या हातावर आज आपण फिटनेस बँड बघतो ज्यात किती कॅलोरी खर्च केल्या, किती पावले चाललो आहे, या सर्व गोष्टींची माहिती मिळत असते. लोक फिटनेसच्या बाबतीत जसे जागरूक झालेत तसेच ते  गॅजेट वापरून स्मार्ट झालेत.

काही लोक मात्र फिटनेसच्या बाबतीत काही वेळा अतिजागृक असतात मात्र ते लाही चुका सुद्धा करतात. त्यांच्या साठी घटक ठरू शकते कसे ते पाहुयात –

 

१. कमी झोप :

७,८ तास झोप घेणे हे शरीरासाठी  योग्य आहे असे सर्वच जण सांगत असतात. अगदी योग्य आहे ते कारण तुमचे शरीर दिवसभरच्या गडबडीत थकून जाते त्या शरीराला आरामाची गरज असते जो आराम रात्रीच्या झोपेत मिळतो. त्यामुळे किमान ७ ते ८ तास झोप शरीराला आवश्यक आहे.

 

अति झोप आणि कमी झोप यामधला समतोल आपण साधला पाहिजे. अन्यथा हृदयरोग, डोळ्यांचे आजार,मधुमेह,लठ्ठपणा हे आजार उदभवू शकतात.

२. योग्यवेळी पाणी पिणे :

आपला मेंदू आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सिग्नल देत असतो तसाच तो आपल्याला शरीराला आवश्यक पाण्याचा  ही देत असतो.

हे ही वाचा – सावधान – या १० सवयी आयुष्यातील सर्वात धोकादायक लक्षणाचं द्योतक आहेत!

त्यामुळे जेव्हा आपल्याला असा सिग्नल मिळत असतो तेव्हा त्वरित आपण पाणी प्यायले पाहिजे. काही लोक तासनतास काम करताना पाणी पित नाही किंवा त्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे डोळे कोरडे होऊन लाला होणे यासारख्या समस्या उदभवतात.

३. बराच वेळ बसणे :

आजची कामाची पद्धत ही अनेक ऑफिसेस मध्ये बसून असल्याने, अनेकांना मणक्याचे, कंबरचे, मानेचे आजार होताना दिसून येतात. ऑफिसेस मध्ये काम करत असताना दर एक तासानंतर चालून या, मानेचे व्यायाम करा.

 

४. सनस्क्रीनचा वापर न करणे:

उन्हाची झळ आता चांगलीच बसायला लागली आहे. उन्हाचा पारा चांगलाच चढू लागल्याने, त्यापासून आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना न चुकता सनस्क्रीन लावा. सूर्याच्या अतिनील किरणांपासून सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे संरक्षण करते.

आपल्या त्वचेला योग्य असेल असा सनस्क्रीन विकत घ्या आणि तो वापरण्यास सुरु करा.

 

 

५. वॅक्सीन घेणे आवश्यक :

नुकतेच सरकारने ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींना वॅक्सीन देण्याचे ठरविले आहे. एकीकडे कोरोना सारखा साथीचा आजार पुन्हा एकदा हातपाय पसरत आहेच तर दुसरीकडे ऋतुमानानुसार आपल्याकडे अनेक साथीचे आज आजार पसरत असतात. म्हणून वेळोवेळी वॅक्सीन घेणे गरजेचे आहे.

अनेक पालक आपल्याला लहान मुलांचे इंजेकशन कोर्से पूर्ण करत नाही तर ते अत्यंत चुकीचे आहे. लहान बाळांचे सगळ्या प्रकारचे लसीकरण झालेच पाहिजे.

 

६. झोपेच्या आधी मोबाइलवर असणे :

आज अनेकांना झोपचे आजार होत आहे. रात्रभर सिनेमी वेबसेरीज बघत बसने यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो आणि तुमचा निंद्रानाश होतो. अनेक डॉकटर जाणकार सांगतात झोपायच्या आधी अर्धा ते एक तास मोबाइलला लांब ठेवा. जेणेकरून तुमची झोप व्यवस्थित होईल.

 

 

७. औषधे योग्यतीच घ्या :

काही जण स्वतःलाच डॉकटर समजून व केमिस्ट वर विश्वास ठेवून गोळ्या घेत असतात. असे करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे शक्य असल्यास घरचे उपाय करा त्याने काही परिणाम होत नसल्यास थेट डॉक्टरांना दाखवा.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधे घेऊ नका त्याचे साईड इफेक्ट्स तुमच्याच शरीरावर होतील. तसेच औषधे घेताना त्याची एक्सपायरी देत बघूनच घ्या.

 

हे ही वाचा – फक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या २१ सवयी!

८. पाणी पिण्याची बाटली न धुणे :

आज प्रत्येकजण घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवतोच, रोजची वापरातील पाण्य्ची बाटली सुद्धा स्वच्छ धुवून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये सूक्ष्मजंतू तयार होणार नाहीत.

विन्हेगर पाण्याच्या बाटलीत टाकून रात्रभर ठेवून द्या, सकाळी स्वच्छ पाण्याने बाटली धुवून टाका.

 

 

९. मानसिक आरोग्य सांभाळा :

आज अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकजण कर्जबाजरी झालेत. अशा परिस्थती खचून न जाता खंबीर रहा. स्वतः ला कायम सकरात्मक ठेवा. वाचन करा, मिळालेल्या वेळेत आपले छंद जोपासा. नैराश्य, नकारात्मक वातावरणापासून स्वतःला लांब ठेवा.

 

१०. व्यसनापासून लांब रहा :

व्यसन करणारे अनेकजण योगा,व्यायाम करून स्वःताला फिट ठेवत असले तरीसुद्धा हे चुकीचे आहे. व्यसनांपासून आपण कायमच दूर राहिले पाहिजे.

 

 

११. ब्रश करण्याच्या वेळा सांभाळा :

बरेचजण रात्रीचे जेवण झाल्या झाल्या ब्रश करायची सवय असते जी अत्यंत चुकीची आहे. जेवण झाल्यावर किमान एक तासाने ब्रश करणे आवश्यक असते. कारण जेवणातील ऍसिडिक पदार्थ आपल्या खाण्यात येत असतात जे आपल्या दातांना उपयोगी असतात. म्हणून जेवणानंतर लगेच ब्रश करू नये.

 

 

१२. इअर बड्स वापरू नका :

अनेकांना इअर बड्स वापरायची सवय असते जे आपल्या कानांसाठी घातक आहे, जेवहा बुडस कानात जातात तेंव्हा आतला मळ आणखीन आत घालवतात ज्यामुळे आपल्या श्रवणशक्ती ला त्रास होऊ शकतो.

 

 

कानांच्या आरोग्यसाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१३. डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला :

काहींना डॉक्टट्रांसमोर बोलण्यास कुचराई करतात. ज्याने आपण आपलेच नुकसान जरून घेत असतो. आपल्या फॅमिली डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद सांधला पाहिजे. अनेकदा महिलांचा हा प्रॉब्लेम असू शकतो पुरुष डॉक्टरनाशी त्या मोकळेपणाने बोलू शकत नाही.

अशावेळी एखादी महिला डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार घ्यावेत.

 

प्रत्येकाच्या हातात आता स्मार्टफोन आल्याने आता सर्वच जण स्मार्ट झाले आहेत. सगळ्यांच्या आयुष्याला सदैव मार्गदर्शन करणारा गुगल गुरु सर्वाना लाभलेला आहे. तरीसुद्धा माणसांकडून चुका होताना दिसून येतात. त्यामुळे वेळीच आपल्या दैनंदिन आयुष्यातील या चुका करणे टाळावेत.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

हे ही वाचा – सकाळी उठल्यानंतरच्या या १० घातक सवयी ठरतील वजनवाढीचं कारण!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version