आशा पारेखने स्पर्श केला आणि शत्रुघ्न सिन्हा ओरडले – “डेटॉल ला, डेटॉल!”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलीवूड आणि सिनेमा म्हटलं की जसा पडद्यावर ड्रामा आहे, तसाच तो पडद्यामागे सुद्धा असायला हवा असा अलिखित नियमच असावा. सिनेविश्वात जसं लॉबिंग चालतं, तशीच अनेक कोल्ड वॉर्स सुद्धा सुरु असतात, हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असेल.
कोल्ड वॉर असो किंवा अगदी थेट एकमेकांशी कट्टर शत्रुत्व, पडद्यावर हिरो-हिरॉइन म्हणून वावरणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकेमकांसाठी किती मोठे व्हिलन असतील ते सांगता येत नाही.
एकमेकांशी फारसं पटत नाही, म्हणून तोंडं न पाहणं, एकत्र काम न करणं या गोष्टी तर अगदी सर्रास घडतात. मग ते ब्रेकअप झालेले शाहीद-करिना असोत, किंवा एकमेकांसोबत काम न करणारी खान मंडळी! कलाकारांनी थेट किंवा आडून आडून घेतलेलं वैर काही नवीन नाही.
असंच एक गाजलेलं वैर म्हणजे शत्रुघ्न सिन्हा आणि आशा पारेख यांचं! शत्रुघ्न सिन्हा म्हणजे अगदीच परखड मत व्यक्त करणारी व्यक्ती; इतकी परखड की प्रसंगी फार फटकळ सुद्धा वाटावी.
शत्रुघ्न यांचा प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा म्हणजे साजन. अशा पारेख हे नाव त्यावेळी मातब्बर मंडळींपैकी एक होतं. आशाजी साजनमध्ये शत्रुघ्न यांच्या सहकलाकार होत्या, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आशाजी आणि शत्रुघ्न यांचं या सेटवर काहीतरी बिनसलं.
हा वाद इतका मोठा ठरला, की आशा पारेख यांनी पुन्हा कधीही शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत काम न करण्याचं निश्चित केलं होतं.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – यशाच्या शिखरावर असूनही काळाच्या दुष्टचक्रासमोर ह्या दुर्दैवी कलाकारांचा निभाव लागला नाही!
===
त्यानंतर तब्बल चार वर्षं आशा पारेख आणि शत्रुघ्न सिन्हा ही नावं पुन्हा एकत्र दिसली नाहीत. मात्र नंतर अशी परिस्थिती उद्भवली की इच्छा नसूनही त्या दोघांना एकत्र काम करणं भाग पडलं.
दिग्दर्शक सुलतान अहमद यांनी त्यांच्या हिरा सिनेमात, शत्रुघ्न सिन्हा यांना व्हिलन म्हणून घ्यायचं ठरवलं होतं. सुनील दत्त आणि आशा पारेख या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. अहमद यांची आर्थिक चणचण असल्यामुळे, या दोघांनाही एकत्र काम करण्यावाचून पर्याय नव्हता.
या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळीच ही घटना घडली. ‘आज नाचूं ऐसे के आग लग जाए’ या गाण्यात शत्रुघ्न सिन्हा यांच्या हाताला आशा पारेख हात लावतात असा एक प्रसंग होता.
या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालं, आणि ते झाल्या झाल्या शत्रुघ्न सिन्हा सेटवर ओरडले, ‘डेटॉल ला डेटॉल’…!!
आशा पारेख यांच्यावर असलेला राग शत्रुघ्न सिन्हा याने अशाप्रकारे व्यक्त केला. अर्थात, तारुण्यात या अशा चुका होत असतात असंच त्यांचं त्याविषयी मत असल्याचं त्यानंतर त्यांच्या वागण्यातून दिसून आलं आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.