आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – प्रणव कांबळे
===
बिहारमध्ये दशरथ मांझीनी आपली पत्नी फगुनियाच्या प्रेमाखातर एक डोंगर पोखरून रस्ता तयार केला. तसाच एक मांझी उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या तुळजापूरजवळच्या “बोरी नदीच्या” खोलीकरणासाठी दिवस-रात्र एक करतोय, पण यामांझीसाठीची फगुनिया म्हणजे तुळजापूर तालुका सुजलम् करणे आहे.
आता या माणसाला तुम्ही ‘मांझी’ म्हणा किंवा ‘आधुनिक भगिरथ’ म्हणा किंवा अगदी सत्यमेव जयतेचा ‘सत्यजित भटकळ’
मांझीने एकट्याने मेहनत डोंगर फोडला, भागिरथाने तपस्याकरून गंगा आणून दिली, तर सत्यजित भटकळ म्हणतात तुम्ही मेहनत करा मी पद्धत सांगतो.
या तिन्ही गोष्टीबरोबर सोबतच पंकज शहाणे म्हणतात “या, चला खोलीकरणाचे काम आपण मिळून करू”
“एकला चलो रे”ने सुरवात करून आता “कंधोसे मिलते है कंधे” याप्रमाणे गेले काही दिवस खोलीकरणाचे अतिशय उत्तम काम सुरू आहे.
एक-एक इंचाच्या बांधासाठी भांडणाऱ्या लोकांच्या शेताजवळून नदी खोलीकरणाचं काम चालू करणं is not a joke.
===
हे ही वाचा – चिमुरडीने घेतलाय पुण्यातील मुठा नदी स्वच्छ करण्याचा वसा, तुम्हीही व्हाल ना सहभागी?
===
॰ हा माणूस पुण्यात असता तर नक्कीच “सार्वजनिक काका” नावाने ओळखला गेला असता.
॰ नदी खोलीकरणाची सुरूवात त्यांच्या मातोश्रीनी दिलेल्या देणगीमधून झाली.
॰ या व्यक्तीची कोणतीही राजकीय आकांक्षा नाही (Very Rare thing nowadays)
॰ खोलीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर Crowd Funding च्या माध्यमातून निधी गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला.
॰ रोजच्या रोज देणगीचा आणि झालेल्या कामाचा हिशोब स्वत: च्या Facebook Timeline वर देत आहेत.
॰ गेले काही दिवस रोज JCB च्या मदतीने खोलीकरणाचे काम सुरू आहे.
॰ एकूण ३२ किलोमीटरच्या खोलीकरणाचे ध्येय घेऊन काम चालू आहे.
॰ उस्मानाबाद जिल्हाच्या माथी असलेला ‘कायम दुष्काळी’ हा शिक्का पुसण्यासाठी हा माणूस रक्ताचा पाणी करतोय.
॰ हा माणूस कामात एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार झाला तर चौकात फटके द्या म्हणून जाहीर करतो.
॰ या माणसाच्या प्रयत्नाला कामाला यश येवो.
पंकज शहाणे यांचे समाजोपयोगी असे अनेक उपक्रम आहेत, पण नदी खोलीकरण हा शेतीसाठीच्या शाश्वत समाधानाचा एक भाग आहे म्हणून मला हे काम जास्त आवडले.
पंकज शहाणे यांना वरील काही मुद्यात एकेरी संबोधिले आहे कारण मला लिहीताना ती शब्द रचना सोपी गेली.
पंकज शहाणे हे माझे मित्र नाहीत अगदी Facebook वर सुध्दा मित्र नाहीत पण ते आता जलमित्र आहेत म्हणून हे सगळं लिहण्याचाघाट..
बाकी तुम्ही त्यांची Facebook Timeline Check करावी.
===
हे ही वाचा – अख्खी नदी प्रदूषणमुक्त करणाऱ्या या “इको बाबा” सारखं प्रत्येकाने व्हायला हवं…पण…!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.