Site icon InMarathi

कुलभूषण जाधव: भारतीय गुप्तहेर की पाकिस्तानी षडयंत्राचं निष्पाप सावज?

kulbhushan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

११ एप्रिल २०१७ या दिवशी अचानक बातमी आली की पाकिस्तानने ज्यांना भारताचे गुप्तहेर म्हणून पकडून ठेवलं आहे, त्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही बातमी भारतात येऊन धडकताच कुलभूषण जाधव हे नाव वर्षभराने पुन्हा एकदा चर्चेत आले.

नंदू चव्हाणांना भारत सरकारने सुखरूप भारतात आणले, मग निष्पाप कुलभूषण जाधवांना पुन्हा भारतात आणण्यासाठी सरकार कुठे कमी पडत आहे? पाकिस्तानला या प्रकरणामध्ये आपण धडा का शिकवत नाही?

अश्याप्रकारच्या प्रश्नांनी संपूर्ण भारतीय मिडिया विश्व ढवळून निघालं.

 

wionews.com

कुलभूषण जाधव हे महाराष्ट्राचे सुपुत्र होत. त्यांचा जन्म १६ एप्रिल १९७० रोजी झाला. १९८७ साली त्यांनी National Defence Academy मध्ये प्रवेश घेतला. १९९१ साली भारतीय नौदलाच्या engineering branch मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

२४ मार्च २०१६ रोजी माझी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान आर्मीने जासूसीच्या संशयाखाली बलुचिस्तान मधून अटक केली.

indiatoday.intoday.in

पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार

कुलभूषण जाधव यांनी कबुल केले आहे की २०१३ सालापासून RAW या भारतीय गुप्तहेर संघटनेचे एजंट म्हणून ते कराची आणि बलुचिस्तानमध्ये गुप्तहेरी करत होते. आणि ते भरतीय नौदलात कार्यरत आहेत.

 

indianexpress.com

व्हिडियो मध्ये कुलभूषण जाधव असे सांगत आहेत की –

भारतीय संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची गुप्तहेर म्हणून भारताने भरती करून घेतली. त्यानंतर त्यांनी इराण मध्ये एक व्यवसाय उघडला, ज्या निमित्ताने त्यांना पाकिस्तानमध्ये सहज प्रवेश मिळू लागला.

याचाच फायदा घेत २०१३ पासून ते भारतीय गुप्तहेर म्हणून वावरू लागले. अखेर ३ मार्च रोजी इराण मधून पाकिस्तानमध्ये प्रवेश करताना त्यांना पाकिस्तान आर्मीने अटक केली.

 

newindianexpress.com

कुलभूषण जाधव हे २००२ सालीच भारतीय नौदलातून निवृत्त झाले असून त्यानंतर त्यांचा आणि सरकारचा काहीही संबंध आला नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

 

indiatoday.intoday.in (तरुणपणीचे कुलभूषण जाधव)

भारत सरकारने कुलभूषण जाधव एक भारतीय नागरिक असून ते गुप्तहेर असल्याचे खोटे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत अश्या आशयाची अनेक पत्रे पाकिस्तानला पाठवली, पण त्याबदल्यात पाकिस्तानने कोणताही ठोस प्रतिसाद दिलेला नाही.

त्यांच्या सुटकेसाठी सरकारतर्फे अनेक प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात येते. परंतु पाकिस्तानने भारताची कोणतीही विनंती गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर अशी आहे ही कुलभूषण जाधव यांची कहाणी!

 

quint.com

ज्या प्रमाणे नराधम कसाबला भारत सरकारने त्यांची बाजू मांडण्याची मुभा देत निपक्ष न्यायनिवाडा केला, त्याप्रमाणे कुलभूषण जाधव यांना आपली बाजू मांडू न देता फाशी देणे म्हणजे कोणताही पुरावा हातात नसताना त्यांची हत्या करण्यासारखे आहे अश्या कठोर शब्दांत भारत सरकारने पाकिस्तानला सुनावले आहे.

मध्यंतरी कुलभूषण जाधव यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली स्वत: पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण मंत्री सरताज अजीझ यांनी पाकिस्तान सिनेटमध्ये दिली होती.

परंतु त्यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पलटी खाल्ली होती.

 

hindustantimes.com

पाकिस्तानच्या या अश्या वागण्यामुळे भारतावर सूड उगवण्यासाठी कुलभूषण जाधवांना पाकिस्तान अडकवू पाहत आहे हे स्पष्ट होते.

त्यांना अडकवण्याचा हा डाव लक्षात घेता भारताने या खटल्याची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर व्हावी यासाठी प्रयत्न केले. आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे.

न्यायालय काय निकाल देते यावर येत्या काळातील भारत पाकिस्तान संबंध आणि कुलभूषण जाधव यांचे भवितव्य अवलंबून आहे, त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची मानली जात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version