Site icon InMarathi

भारतीय भूमीवर अश्मयुगीन काळात परग्रहवासीयांचं अस्तित्व?!

alien stone painting inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणसाची गोष्ट कुठून सुरु झाली असेल? माकडाचं रुपांतर माणसात होण्याची प्रक्रिया ही मानवी उत्क्रांती मानली जाते. यामध्ये जी युगं मानली जातात त्यातील सर्वात जुने म्हणजे अश्मयुग.

या अश्मयुगीन कालखंडात मानव गुहेत रहायचा. शिकार करुन आणायचा. मग अग्नीचा शोध लागला. हळूहळू मानव वस्ती करुन राहू लागला. त्यातूनच विवाहसंस्था कुटुंबसंस्था जन्माला आली हे आपणाला माहीत आहे.

मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृती हा त्या सुधारीत संस्कृतीचा वारसा सांगणारी संस्कृती. इतिहासकार आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी भरपूर संशोधन केलं. सिंधू संस्कृती, मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती यांचा पुरावाच आपल्याला दिला. तिथे चालणारे व्यवहार, व्यवसाय हे सगळं काही नीटपणे आपल्यासमोर मांडलं.

 

 

आजही तो कालखंड आपल्यासाठी एक कोडं आहे. भाषा कशी विकसित झाली असेल? नातीगोती, समारंभ, सण, उत्सव हे कसं ठरवलं असेल त्या काळी गुहेत राहणाऱ्या आदीमानवानं? जगात कितीतरी रहस्यमय ठिकाणं आहेत, ज्यांचा शोध आजवर लागला नाही. असंच मध्यंतरी आणखी एक ठिकाण अचानकपणे समोर आलं.

आजही काही ठिकाणी अशा गुहा आहेत जिथं आदीमानव रहायचा, त्या तशाच आहेत. तिथं काही चित्रं काढलेली आहेत. रंगवलेली पण आहेत. पण त्याचा अर्थ शोधणं किती कठीण आहे!!!! कशी काढली असतील ही चित्रं? काय संकेत असतील त्यांचे?

भारतात छत्तीसगढमध्ये अशी चित्रे काढलेली गुहा सापडली आहे. रायपूर पासून १३० किलोमीटर अंतरावर चंडेली आणि गोटीटोडा या खेड्याजवळ ही गुहा आहे.

===

हे ही वाचा – पृथ्वीवर केले जातात परग्रहवासियांवर प्रयोग? वाचा, नेहमी चर्चा होणाऱ्या अमेरिकेच्या “सिक्रेट”बद्दल

===

 

 

या गुहेत कोरलेली काही चित्रं पाहून संशोधकांनी असा दावा केला आहे, की अश्मयुगाच्या आधीच्या काळात जे लोक गुहेत रहात होते त्यांनी काढलेली चित्रे ही एलियन्सची आहेत. या चित्रात जे एलियन्स दिसतात त्यांना नाक आणि तोंड नाही. त्यांनी हातात शस्त्र पकडलेलं आहे.

संशोधक काय म्हणतात?

UFO अर्थात Unidentified Flying Objects. हे कधीतरी भारताला भेट देऊन गेले आहेत आणि त्यांचीच चित्रं आदीमानवानी काढली आहेत. या चित्रात जो पोषाख परिधान केलेला आहे तो आणि हल्लीच्या काळात ज्या लोकांनी एलियन्स बघितल्याचा दावा करताना सांगितलेला पोशाख यात भरपूर साम्य आहे.

ज्याला आपण स्पेस सूट असं म्हणतो, तोच स्पेस सूट या चित्रात दाखवला आहे. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चित्रात उडत्या तबकड्या आहेत. त्या तबकड्यांवर पंख्यासारखा अँटेना आणि तबकडीला तीन पाय आहेत. हे चित्र तंतोतंत हाॅलीवूड मधील‌ Sci-Fi movie मध्ये जशा तबकड्या दाखवल्या आहेत तसंच आहे.

 

 

हे चित्र साधारणपणे १०,००० वर्षांपूर्वी काढलेलं आहे. तेव्हा तर माणूस इतक्या आदिम अवस्थेत होता, की पायी प्रवास हेच एकमेव प्रवासाचं साधन होतं आणि हवेतून प्रवास ही मानवाच्या कल्पनेच्या पलीकडे असलेली गोष्ट होती.

पुरातत्त्वीय विभागाने संशोधन केले असता त्यांना आढळले की, त्या चित्रांना मानवाने नैसर्गिक रंग दिले होते. इतक्या वर्षांनी सुद्धा ते रंग फिकट झालेले नव्हते. त्यातील काही चित्रांमध्ये एलियन्सनी हातात शस्त्रे घेतलेली सुद्धा दिसतात.

गंमतीशीर गोष्ट म्हणजे, छत्तीसगढमधील चारला या भागात ही गुहेतील चित्रे सापडली आहेत त्या भागातील लोकांमध्ये एक प्रघात आहे तो म्हणजे पूजेचा. रोहेला लोक शेतातील असा भाग वापरतात जो उडत्या तबकड्यांच्या आकाराचा असतो. त्या भागाची हे लोक पूजा करतात.

पुरातत्त्वज्ञ लोकांचा असाही एक कयास आहे, प्राचीन काळी, मानवाने या उडत्या तबकड्या खरोखर तरी पाहिल्या आहेत किंवा कल्पनेने हे चित्र बनवले आहे.

 

 

===

हे ही वाचा – अमेरिकन गुप्तहेरांनुसार – भारतावर UFO (परग्रह वासियांची यानं) येऊन गेलेत

===

लोकांना दिसलेल्या उडत्या तबकड्या

१५ मार्च १९५१ साली दिल्लीमध्ये एका फ्लाईंग क्लबच्या १५ सदस्यांनी एक सिगारच्या आकाराची उडणारी गोष्ट पाहिली. साधारणपणे १०० फूट लांब असलेली ही वस्तू बघता बघता दिसेनाशी झाली.

२०१३ मध्ये चेन्नई येथील मोगाप्पेअर या ठिकाणी तेथील रहिवाशांना अशा UFO दिसल्या होत्या. केशरी रंगाची उजेड असलेल्या ५ UFO त्यांना दिसल्या होत्या. तर अरुणाचल प्रदेश, लडाख इथे राहणाऱ्या लोकांनी खूप वेळा अशा उडत्या तबकड्या पाहिल्या आहेत.

केवळ भारतातच नव्हे तर जगातील कितीतरी भागात अशा उडत्या तबकड्या असलेली चित्रे गुहांमध्ये आदिमानवाने कोरुन काढलेली सापडली आहेत.

अशी जवळपास २५० कोरलेली गुहेतील चित्रे या गोष्टीचा विचार करायला भाग पाडतात, की प्राचीन काळी मानव अशा एलियन्स किंवा परग्रहावरील जीवांशी संपर्क ठेवून होता का?

 

 

या भागात असणारे बरेच लोक असा दावा करतात, की हजारो वर्षांपूर्वी असे परग्रहावरील लोक आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आले आहेत.

जगात कितीतरी गोष्टी असतात. कल्पिताहूनही सत्य खूप वेगळं आणि आश्चर्यकारक असतं. याचा उलगडा झाला तर आपोआप अजूनही बरीच रहस्यं शोधली जातील!!

===

हे ही वाचा – नासाच्या एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version