' पालकांनो, मुलांच्या आरोग्याशी निगडित या ८ गोष्टी दुर्लक्षिल्यास परिणाम गंभीर होतील! – InMarathi

पालकांनो, मुलांच्या आरोग्याशी निगडित या ८ गोष्टी दुर्लक्षिल्यास परिणाम गंभीर होतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लहान मुलं नेहमीच आजारी पडतात या आजारपणाच्या काळात त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. या काळात लहान मुलांची काळजी घेत असताना किंवा त्यांना औषध देत असताना जर हलगर्जीपणा झाला तर त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.

या काळात लहान मुलांची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी या बद्दलची माहिती आज आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत चला तर मग जाणून घेऊयात….

लहान मुलं नेहमीच आजारी पडतात कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या सर्वांपेक्षा कमी असते. लहान मुलांवर शक्यतो त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपचार केले जातात आणि जसं त्यांचं वय वाढतं तसं त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यांचं आजारी पडण्याचे प्रमाणदेखील कमी होतं.

 

children immu inmarathi

 

लहान मूल आजारी असताना डॉक्टर अनेक प्रकारची औषध त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सुचवतात, या काळात औषधांसोबतच लहान मुलांची काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं असतं, ती काळजी घेताना खाली दिलेल्या गोष्टीं जपल्या तर तुमच्या घरातील लहान मुलांना कधीही अपाय होणार नाही.

१. डॉक्टरांना सर्व माहिती विचारा –

जेव्हा डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देत असतात त्याच वेळी त्यांच्याकडून औषधा संबंधीची सर्व माहिती घ्यायला हवी. उदाहरणार्थ,

औषध कशासाठी आहे?

औषध किती दिवस घ्यायचं आहे?

दिवसातून किती वेळेस औषध घ्यायचं आहे?

औषधाचे काही साईड इफेक्ट आहेत का?

जर चुकून एखादा डोस राहिला तर काय करायला हवं?

औषध घेण्याच्या आधी जेवायचा आहे की औषध घेतल्यानंतर

औषध फ्रिज मध्ये ठेवाण्याची आवश्यकता आहे का?

ही आणि अशा प्रकारची सर्व माहिती तुम्ही डॉक्टरांना औषध घ्यायच्या आधीच विचारून घ्या जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांच्या औषधांच्या बाबतीत काळजी घेऊ शकाल.

 

child doc inmarathi

 

२. औषध देण्यासाठी कुठलाही चमचा वापरू नका –

अनेक वेळेस औषध देत असताना आपण गडबडीत किचन मधला कुठलाही चमचा वापरतो. लहान मुलांना औषध देतात ना कुठलाही चमचा वापरणं चुकीच आहे, त्यावर धुळ असु शकते, हानीकारक जंतू असु शकतात हे सर्व टाळण्यासाठी एक वेगळा चमचा राखून ठेवा.

 

medicine in spoon inmarathi

 

औषध देण्याच्या आधी किमान तो चमचा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि मगच चमच्याने औषध द्या.

३. औषध घेताना खात्री करून घ्या –

केमिस्ट कडून औषध विकत घेतल्यानंतर देखील त्यावरील लेबल वाचून बघा आणि डॉक्टरांनी दिलेली औषध आपण विकत घेतली आहेत ना याची पुनश्च एकदा खात्री करा त्यासोबतच त्या औषधांची एक्सपायरी डेट देखील अवश्य बघा.

 

ch exp inmarathi

 

हे ही वाचा – तुमच्या लहानग्याला पाळणाघरात ठेवताना या महत्वाच्या बाबींचा विचार केलाय का?

अनेक वेळेस गडबडीत आपण वेगळेच औषध घेऊन निघून येतो. औषध द्यायच्या आधि ते औषध हलवण्याची गरज आहे का हे देखील लेबल वरती लिहिलेलं असतं.

४. अँटिबायोटिक साठी सांगितलेला कोर्स पूर्ण करा –

अनेक वेळी डॉक्टरांनी सांगितलेला औषध गोळ्यांचा कोर्स आपण पूर्ण करतच नाही, मुलांना बरं वाटू लागलं की आपण त्यांना औषध गोळ्या देण्याचं थांबवतो.

 

chi anti inmarathi

 

मित्रांनो लक्षात घ्या हे अत्यंत चुकीचं आहे विशेषतः अँटिबायोटिक्स औषध गोळ्यांचा कोर्सच्या बाबतीत असं करणं धोकादायक ठरू. अँटिबायोटिक्स औषधांचा कोर्स तुमच्या डॉक्टरांनी जसा सांगितला आहे तसा पूर्ण करा.

५. डॉक्टरांशी चर्चा करायला टाळाटाळ करू नका –

अनेक वेळी असं घडू शकतं की डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळेवर घेऊन देखील मुलांना फरक पडत नाही, त्यांची प्रकृती सुधारत नाही, अशावेळी प्रकृती सुधारण्याची वाट पाहण्यापेक्षा किंवा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करण्या ऐवजी आपण डॉक्टरांकडे परत जायला हवं.

 

doctor checking child inmarathi

 

त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना द्यायला हवी कदाचित त्यानंतर डॉक्टर तुम्हाला आणखी चांगले उपचार करण्यास सुचवतील त्यामुळे कधीही डॉक्टरांशी चर्चा करायला किंवा त्यांच्याकडे परत जायला टाळाटाळ करू नये.

६. योग्य प्रमाणात औषध द्या –

लहान मुलांना औषध देत असताना डॉक्टरांनी सांगितलेली वेळ आणि डॉक्टरांनी औषधाचा सांगितलेले प्रमाण तंतोतंत पाळला गेलं पाहिजे.

 

childre 1 inmarathi

 

लहान मुलांना योग्य प्रमाणात औषध देण्यासाठी ज्या कुठल्या उपकरणांची तुम्हाला आवश्यकता लागेल त्या उपकरणांची खरेदी करा म्हणजे लहान मुलांना औषध देण्यासाठी ड्राॅपर आवश्यक असतं, ड्राॅपरने औषध दिलं तर त्याची मात्रा व्यवस्थित राहते. काहीजण कंटाळा करत त्याच्याऐवजी चमचा वापरतात तुमच्या या कंटाळ्यामुळे औषधाचे प्रमाण चुकू शकते.

तसेच या सर्व उपकरणांची स्वच्छता आणि त्या संबंधीची काळजी घेण्यात येथील अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्यावर हानिकारक जंतू बसून प्रकृती सुधारण्याऐवजी त्याचे विपरीत परिणाम दिसून येऊ शकतात.

===

हे ही वाचा – मूल जन्माला येताना केले जाणारे हे “९” प्रकार अचंबित करणारे आहेत…!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

==

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?