आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
संगणकाचा काळ सुरू झाला आणि माणसाची लिहिण्याची सवय कमी झाली. लोक दिवसभरात कित्येक मेसेज टाइप करून पाठवत असतील, पण आता डायरी फार कमी लोक लिहितात.
नवीन वर्ष सुरू झाले की अनेकांचा संकल्प असतो, तो म्हणजे डायरी लिहिणे, पण फार कमी किंवा अगदी बोटांवर मोजता येतील इतके कमी लोक हा संकल्प वर्षाच्या शेवटपर्यत पूर्ण करतात.
पण तुम्हाला डायरी लिहिण्याचे हे भन्नाट दहा फायदे माहीत आहेत का?
जर तुम्ही हे वाचले तर तुम्ही देखील नक्की नियमित डायरी लिहीत राहालं. चला तर मग वाचूया डायरी लिहिण्याचे हे १० भन्नाट फायदे.
१) विचारांना दिशा मिळते
माणूस जेव्हा डायरी लिहिण्यास सुरवात करतो, तेव्हा तो त्यांचे सर्व विचारदेखील त्यात मांडत असतो.
रोज माणसाच्या हातून काही चांगल्या गोष्टी घडत असतात, तर काही वाईट गोष्टी तर काही चुका देखील होतात. तेव्हा या दोन्हीची नोंद डायरीमध्ये केली जाते. जेव्हा संपूर्ण दिवस संपतो, तेव्हा माणूस आपण संपूर्ण दिवस काय केले त्यातून काय शिकलो यांची नोंद करतो.
यातूनच आपण नकळत खूप काही शिकत जातो. तुमच्या विचारांना एक नवीन दिशा मिळते.
२. लिहिण्याची कला अवगत होते
लिहिणे ही देखील एक कला आहे. प्रत्येकाला छान लिहायला जमतं असं नाही. फार कमी लोक असतात ज्यांना उत्तम लिहिता येतं. जर तुम्हाला उत्तम लिखाण शिकायचं असेल तर तुम्ही रोज किमान पानभर लिखाण करायला हवं. मात्र यासाठी अनेकदा स्वतंत्र वेळ काढणं शक्य नसतं.
पण जर तुम्ही रोज डायरी लिहिली तर मात्र तुमचा सरावही होईल आणि लिखाणाची कला नक्कीच अवगत होईल.
यासह तुम्हाला लिहिण्याचा एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल. सरावाने माणूस अधिक सुधारतो. त्यामुळे डायरी लिहीत रहा आणि तुमची लिहिण्याची कला अधिक सक्षम करा.
तुम्हाला लिहिण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, तसंच रोज वेगळा विषय देखील शोधण्याची गरज नाही. दिवसभरात तुम्ही काय केलं, हे लिहून काढा.
–
हे ही वाचा – कोविड नंतर, खचून न जाता, यशस्वी होण्यासाठी या ६ गोष्टी आत्मसात कराव्यात!
–
३. तुमचे ध्येय निश्चित होतं
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक ध्येय असतात, काही स्वप्न असतात, काही विचार केलेले असतात. पण प्रत्येक वेळेस ते तुम्हाला इतरांना सांगता येत नाही. कारण तुम्हाला तुमच्या स्वप्नाविषयी जितकी आत्मीयता असेल तितकी आत्मीयता समोरच्या व्यक्तीला असेल असे नाही, काही लोक तुमची चेष्टा देखील उडवू शकतात.
याउलट जर तुम्ही तुमचे स्वप्न, ध्येय डायरीत लिहिले तर ते तुम्ही अधिक उत्तमरीतीने पूर्ण करू शकता. याबरोबरच दररोज तुम्ही ज्या गोष्टी करत आहात, त्या तुमच्या स्वप्नांच्या दृष्टीने योग्य दिशेकडे जात आहेत का? हे देखील समजते. यातून तुम्हाला आणखी स्पष्ट दृष्टी मिळते.
४. नव्या कल्पनांना लिखित स्वरुप
माणसांच्या डोक्यात दिवसभरात अनेक भन्नाट कल्पना येतं असतात. या कल्पना जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला नक्कीच एक वेगळी दिशा देखील मिळू शकते. पण अनेकदा या कल्पना आपण विसरून जातो.
त्यामुळे जर तुम्ही डायरी लिहीत असाल तर तुमच्या सर्व कल्पना तुम्ही त्यात मांडू शकता. जेव्हा एखादी कल्पना तुमच्या डोक्यात असते, तेव्हा ती अधिक उत्तमपणे तुम्ही ती लिहू शकता.
कधी तुमची एखादी कल्पना तुमच्या आयुष्यासाठी निर्णायक ठरू शकते, हे तुम्ही सांगू शकत नाही.
५. तणावमुक्ती
सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एकाकी होत चालला आहे. जेव्हा माणूस एकटा असतो, तेव्हा तो त्याच्या मनातील गोष्टी इतरांना सांगू शकत नाही. यातूनच ताणतणाव वाढतो. धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण यामुळे माणसाला बोलायला देखील वेळ नाही.
आपण जेव्हा इतरांशी बोलतो, आपल्या मनातील गोष्ट सांगतो तेव्हा आपला ताण काहीसा हलका होतो. पण प्रत्येक वेळेस आपण कोणाजवळ तरी आपल्या मनातील गोष्ट सांगू असे होतं नाही. यासाठी डायरी लिहिणे हा देखील सर्वात उत्तम मार्ग आहे.
डायरी लिहिल्यामुळे माणसाच्या मनातील सर्व वाईट विचार निघून जातात. आपण आपल्या मनातलं कोणाला तरी सांगितलं यातून देखील माणसाचा ताण हलका होतो. कोणाला तरी मनातील गोष्ट सांगून मन हलकं झाल्यासारखं वाटतं.
तुम्हाला जेव्हा जेव्हा तणावग्रस्त वाटेलं, तेव्हा -तेव्हा तुम्ही डायरी लिहायला हवी. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.
–
हे ही वाचा – या ४ सवयींमुळेच बिल गेट्स जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवू शकले
–
६. आत्मचिंतन होतं
जेव्हा आपण डायरी लिहितो, तेव्हा आपण आपल्या डोक्यातील सर्व विचार, मनातील गोंधळ आणि याबरोबरचं आपल्या वागण्याचाही लेखाजोगा मांडतो,
असं म्हणतात की एखादी व्यक्ती जेवढं स्वतःशी खरं बोलू शकतो तेवढं खरं इतर कोणाशी बोलू शकत नाही. त्यामुळे आपण नियमित डायरी लिहिणे गरजेचे आहे. त्यामुळे आत्मचिंतन होते.
या सवयीमुळे आपण आनंदी राहतो. स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो. आत्मचिंतन हा प्रगतीचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
७. स्मरणशक्ती वाढते
जेव्हा तुम्ही डायरी लिहिता, तेव्हा संपूर्ण दिवसांत तुम्ही काय केलं हे आठवता. यामुळे तुमची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती देखील वाढते.
माणूस अधिक अधिक गोष्टी अधिक उत्तमरितीने लक्षात ठेवतो आणि जेव्हा त्या गोष्टी आपण लिहून काढतो तेव्हा त्या अधिक उत्तमरीतीने आपल्या लक्षात राहिलेल्या असतात त्यामुळे डायरी लिहिल्याने अधिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्याची सवय लागते.
८. सर्जनशीलता वाढते
सर्जनशीलता ही फार महत्वाची गोष्ट आहे. कोणतीही कला असो त्यात सर्जनशीलता असावीच लागते.
आता हेच पहा, सर्जनशीलता ही काही जन्मजात नसते, आपल्याला ती स्वतःमध्ये निर्माण करावी लागते. लिहिणे ही देखील सर्जनशीलता आहे.
अनेक लोक खूप सुंदर डायरी लिहितात. आपण अनेक चित्रपटात देखील पाहतो की डायरी किती छान लिहिलेली असते. अनेकांच्या डायरीची पुस्तके देखील प्रकाशित झाली आहे.
सर्जनशीलता ही माणसांमध्ये नेहमी असायलाच हवी, त्यामुळे माणूस अधिक संपन्न होतो.
९ वेळेचं महत्व समजतं
वेळ हा माणसाच्या प्रगतीत फार महत्वाचा मुद्दा आहे. जो माणूस वेळ पाळायला शिकतो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. कारण आपण जेव्हा डायरी लिहितो, तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण कुठे आणि किती वेळ घालविला आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करायला डायरी फार महत्वाची भूमिका निभावते.
डायरीमुळे आपल्याला वेळेचे नियोजन करायला खूप मदत होते.
१०. आत्मविश्वास वाढीस लागतो
आत्मविश्वास ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या चेहऱ्यावरून तुमचा आत्मविश्वास झळकत असतो.
जेव्हा तुम्ही डायरी लिहिता तेव्हा तुम्हाला तुमच्यातील काही चांगल्या गोष्टी देखील लक्षात येतात. “अरे, आपण हे फार चांगलं केलं आहे. किंवा या गोष्टी मी अजून चांगल्या प्रकारे करू शकतो”. हा आत्मविश्वास तुम्हाला डायरीमुळे येतो.
माणसातील आत्मविश्वास जेव्हा वाढतो, तेव्हा त्या जोरावर अशक्य गोष्ट ही शक्य करतो.
डायरीमुळे आपल्यातील चांगल्या गोष्टी आपल्याला समजतात. डायरी लिहा आनंदी रहा. डायरी म्हणजे स्वतःने स्वतःसाठी दिलेला खास वेळ. हा वेळ तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
–
हे ही वाचा – प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाकडे असायलाच हव्यात या १३ गोष्टी
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.