Site icon InMarathi

राम गोपाल वर्मांनी जेव्हा अभिजित राजेंचा आवाज चोरला होता…!!

girish oak ram gopal varma inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मनोरंजन सृष्टी आणि ‘चोरी’ हे एक खास समीकरण आहे. अगदी सिनेमाच्या पोस्टरपासून ते गाण्यांपर्यंत, किंवा संकल्पनेपासून ते कथेपर्यंत  अनेक गोष्टी ‘ढापल्याच्या’ गोष्टी आपण अनेकदा ऐकलेल्या, वाचलेल्या असतील.

कधी हॉलिवूड सिनेमाची बॉलीवूडने केलेली चोरी, कधी बॉलीवूडची मराठी इंडस्ट्रीने, तर कधी मराठीची बॉलीवूडने केलेली चोरी अशा बातम्यांचा आता चघळून चोथा झालाय. तरीही नवीन एखादा किस्सा ऐकायला मिळाला, तर तो आपण अगदी आवडीने ऐकतो.

मात्र, तुम्ही कधी आवाजाच्या चोरीबद्दल ऐकलं आहे का मंडळी? हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, यांनी एकदा चक्क आवाजाची चोरी केली आहे.

सध्या एका मराठी वाहिनीवरील मालिकेत ‘अभिजित राजे’ हे पात्र साकारणारे अभिनेते गिरीश ओक यांच्या बाबतीत ही घटना घडली होती.

 

 

राम गोपाल वर्मा यांनी गिरीश ओक यांची परवानगी न घेता त्यांचा आवाज एका चित्रपटाच्या प्रोमोमध्ये वापरला होता. हा चित्रपट नेमका कुठला आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, तेच आता जाणून घेऊया.

ही घटना आहे २०१३ मधली. त्यावेळी राम गोपाल वर्मा यांचा सत्या २ हा सिनेमा रिलीज होणार होता. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्या या सिनेमाचा सिक्वेल म्हणून हा सिनेमा तयार करायचं त्यांनी ठरवलं होतं. या सिनेमात गिरीश ओक यांनी काम केलेलं नाही, मात्र सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आणि त्यात त्यांचा आवाज ऐकायला मिळाला.

 

 

हे नेमकं घडलं कसं?

सत्या २ ची निर्मिती करण्याचा निर्णय वर्मा यांनी घेतला, त्यावेळी अनेक कलाकारांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. त्यांच्यापैकीच डॉ. गिरीश ओक हे एक होते. यावेळी त्यांच्याकडून काही संवाद म्हणून घेण्यात आले होते.

डॉ. गिरीश ओक यांची अशी अपेक्षा होती, की त्यांना या सिनेमात काम करण्याची संधी मिळू शकेल. त्यासंदर्भात फोन येण्याची अपेक्षा ते करता होते. मात्र घडलं भलतंच… त्यांना फोन तर आला, मात्र तो एका ओळखीच्या व्यक्तीचा! सत्या २ च्या प्रोमोमध्ये त्यांचा आवाज ऐकला आणि प्रोमो खूप छान वाटतोय असं कौतुक त्या फोनमध्ये करण्यात आलं.

हे ऐकून गिरीशजींना धक्काच बसला. कारण, त्यांचा आवाज केवळ ऑडिशनसाठी घेण्यात आला होता. रेकॉर्डिंगचा वापर प्रोमोमध्ये करण्यात येईल, असं ना काहीही ठरलं होतं, ना अशाप्रकारे कुठलंही बोलणं झालं होतं.

यासंदर्भात त्यांनी वर्मा यांच्या ऑफिसमध्ये संपर्क केला. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही.

===

हे ही वाचा – सिनेमाची परिभाषा बदलणारे राम गोपाल वर्मा हे सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये का मागे पडले?

===

 

 

पुढे काय घडलं?

डॉ. गिरीश ओक यांना ही गोष्ट अजिबातच आवडली नाही. अशाप्रकारे आवाजाचा वापर करणं ही गोष्ट योग्य नसल्याचं आणि कायदेशीररित्या चुकीची असल्याचं त्यांना एका वकील मित्राकडून समजलं. म्हणूनच याविरोधात भाष्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, अर्थातच सिंटा  या संस्थेत त्यांनी रीतसर तक्रार नोंदवली. याविषयी तक्रार केल्यानंतर रामा गोपाल वर्मा यांच्याकडून काही ना काही घडेल, अशी अपेक्षा गिरीश ओक यांनी केली होती. मात्र असं काहीही घडलं नाही.

सिंटाकडून सुद्धा या प्रकरणाची योग्यप्रकारे दखल घेतली जात नसल्याचं गिरीश ओक यांच्या लक्षात आलं. जे घडलं, त्याविषयी स्वतःहून बोलणं आणि त्याबद्दल माफी मागितलं जाणं इतकी माफक अपेक्षा त्यांनी केली होती.

अखेर त्यांनी शिवसेनेच्या चित्रपट सेनेची मदत घेण्याचं ठरवलं. चित्रपट सेनेचे तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सुद्धा वर्मा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही यश आलं नाही, म्हणून चित्रपट सेनेचे काही सदस्य आणि गिरीश ओक यांच्यासह वर्मांच्या ऑफिसकडे धाव घेतली.

 

 

त्यांना न भेटता ऑफिसमधून निघून जाण्याची चूक वर्मा यांना भोवली. महाराष्ट्रात त्यांचं चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असं त्यांना बजावण्यात आल्यानंतर त्यांनी गिरीश ओक यांना मोबदला म्हणून पैसे देऊ केले. मात्र, लेखी माफीनामा देण्याची मागणी करण्यात आली. तीदेखील मान्य करून अखेर वर्मांनी माघार घेतली.

एका मोठया आणि नावाजलेल्या मराठी कलाकाराशी असं चुकीच्या पद्धतीने वागणं योग्य नव्हतं, हे अखेर त्यांना मान्य करावं लागलं.

===

हे ही वाचा – “अग्गं बाई सासूबाई” वर टीका करणाऱ्या पोस्टवर ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक भडकले!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version