आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका! भारताच्या मध्ययुगीन इतिहासातली सगळ्यात मोठी घटना. आग्र्याला महाराज आले, भर दरबारात त्यांनी औरंजेबाला त्याची जागा दाखवली हे सगळ्यांनी पाहिले आणि ऐकले होते. पण कैदेत टाकल्यानंतर ते गायब कसे झाले हे कोणाला कळलेच नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
खुद्द औरंगजेबाच्या गुप्तहेर खात्याने या प्रकरणात आपले हात टेकवले होते. या घटनेनंतर मुघल गोटात महाराजांना जादूटोणा येतो, काळी विद्या येते, जिच्या मदतीने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवं तेव्हा ये-जा करू शकतात अशी वावडी उठली. महाराज आग्र्यावरून महाराष्ट्रात कसे आले, हा इतिहास सर्वश्रुत आहे.
अशीच काहीशी घटना जपानमध्ये घडली. एक व्यक्ती टोकियो विमानतळावर अवतरीत झाली. पण त्याच्यावर संशय आल्यामुळे त्याला एका हॉटेलच्या खोलीत बंदिस्त केले गेले. त्या खोलीच्या बाहेर दोन सुरक्षा अधिकारी सुद्धा तैनात केले गेले. जेव्हा त्याच्या चौकशीसाठी अधिकारी गेले तेव्हा ती व्यक्ती हॉटेलच्या त्या खोलीत नव्हती.
एवढेच नव्हे तर त्याने स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी त्या व्यक्तीने आणलेली कागदपत्रे सुद्धा विमानतळ आगमनच्या खोलीतून गायब झालेली होती.
ती व्यक्ती आली ते सर्वांनी पाहिले. पण ती व्यक्ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही. कुठे गेली यापेक्षा ती व्यक्ती नक्की आली होती का यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. याच घटनेबाबत आज विस्ताराने बघूया.
जुलै १९५४ चा दिवस, जपानची राजधानी टोकियोमधील हेनेडा विमानतळ, रोजच्यासारखी वर्दळ आणि गडबड विमानतळावर सुरू होती.
तेवढ्यात एक युरोपियन विमान विमानतळावर लँड झाले. विमानातील यात्री विमानामधून उतरून चेक आऊटच्या दिशेने निघाले. अधिकारी प्रत्येक प्रवाशांचे पासपोर्ट चेक करून त्यांना आत सोडत होते.
पासपोर्ट चेक करताना अधिकाऱ्यांना असा प्रवासी भेटला, ज्याचा पासपोर्ट बघून ते हैराण झाले. त्या प्रवाशाच्या पासपोर्टवर देशाच्या रकान्यात ‘टॉरेड’ लिहिलं होतं. अनेक वर्षे चेक आऊटमध्ये काम करणारे ते अधिकारी हे नाव बघून हैराण झाले. कारण यापूर्वी त्यांनी या देशाबद्दल कधीच ऐकले नव्हते.
संशयास्पद वाटल्याने सदर अधिकाऱ्याने याची माहिती सुरक्षा विभागाला दिली. सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी एका खोलीत नेले आणि सर्वप्रथम त्यांचं जपानमध्ये येण्याचे कारण विचारले. आपण व्यावसायिक असल्याचे आणि व्यवसायाच्या निमित्ताने जपानमध्ये आल्याचे त्याने सांगितले.
===
हे ही वाचा – सावधान! हे गूढ जंगल तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायला भाग पाडेल
===
सुरक्षा रक्षकांनी सदर रहस्यमयी व्यक्तीच्या पासपोर्टची पुन्हा तपासणी केली. सुरक्षा रक्षकांनी सुद्धा या देशाबद्दल ऐकले नसल्याने ते सुद्धा आश्चर्यचकित झाले.
अधिकाऱ्यांनी त्याबद्दल विचारल्यानंतर, त्या पासपोर्टवर त्याची ही पहिली यात्रा नसल्याचे त्याने सांगितले. यापूर्वी तो युरोप आणि आशियाच्या बऱ्याच देशांमध्ये प्रवास करून आला होता आणि विशेष म्हणजे त्या देशांच्या इमिग्रेशनचे स्टॅम्प त्याच्या पासपोर्टवर होते.
तरी सुद्धा सुरक्षा अधिकारी मानायला तयार नव्हते, की त्या नावाचा कोणता देश या पृथ्वीवर आहे. शेवटी हा टॉरेड देश नक्की कुठे आहे हे माहीत करून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या समोर जगाचा नकाशा आणला गेला आणि त्याचा देश दाखवायला सांगितला.
त्यावर त्या प्रवाशाने ‘अंडोरा’ नामक देशावर बोट ठेवले. हे बघून तर अधिकारी अजूनच हैराण झाले. त्यांना कळेना, की ही व्यक्ती अंडोरा देशाला आपला काल्पनिक देश का सांगत आहे. पण त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे पाहून तो खरे बोलत आहे असे वाटत होते.
शेवटी याचा योग्य पडताळा म्हणून सुरक्षा अधिकाऱ्यांनी हा ज्या आस्थापनेला व्यवसायानिमित्त भेटायला आलेला तिथेच चौकशी करायचे ठरवले.
प्रवाशांकडून सदर आस्थापनेबद्दल माहिती घेऊन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सदर आस्थापनेला त्या व्यक्तीबाबत विचारणा केली. तसेच ती प्रवाशी व्यक्ती ज्या हॉटेलमध्ये थांबणार होती तिथे सुद्धा चौकशी केली. आणि हॉटेल आणि आस्थापन दोघांनी त्या व्यक्तीला ओळखण्यास नकार दिला.
दोन्ही ठिकाणाहून त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षक या निष्कर्षावर आले, की सदर व्यक्ती चलाख गुन्हेगार असून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत आहे. जपानमध्ये काही चुकीचे कृत्य करण्याच्या हेतूने तो आला असावा असा अंदाज बांधण्यात आला.
सुरक्षा कर्मींनी त्याचे सारे सामान जप्त केले आणि पोलिसांच्या मदतीने त्याला एका हॉटेलच्या खोलीमध्ये बंद करून ठेवले. दुसऱ्या दिवशी सगळी गरजेची असलेली प्रक्रिया पूर्ण करून पोलीस त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घ्यायला निघाले. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला गेला तेव्हा पोलिसांचे डोळे पांढरे झाले.
ज्या व्यक्तीला काल त्यांनी त्या खोलीत बंद केले होते ती व्यक्ती त्या खोलीत नव्हतीच.!
त्या खोलीच्या बाहेर पोलीस तैनात होते. त्या खोलीच्या खिडक्या आधीच सील करून ठेवल्या गेल्या होत्या. शिवाय ती खोली हॉटेलच्या १५ व्या माळ्यावर होती. त्यामुळे त्या व्यक्तीची पळून जाण्याचा शक्यता ही शून्य होती.
हा धक्का काय कमी होता, तेवढ्यात त्यांना दुसरा धक्का बसला. त्या व्यक्तीची जप्त केलेली सगळी कागदपत्रे ही एयरपोर्टच्या लॉकरमधून गायब होती. आता तर एयरपोर्टचे अधिकारी, तिथले सुरक्षा कर्मीं आणि पोलीस सगळे हैराण. नक्की हे झालेच कसे?
यानंतर मात्र जगभरात चर्चेला पेव फुटले. कोणी म्हणे ती व्यक्ती कोणा दुसऱ्या जगातील होती. कोणी म्हणत त्या व्यक्तीकडे टाईम ट्रॅव्हलिंगचे स्किल्स होते. तर कोणी म्हणत त्याच्याकडे टाईम मशीन सारखे काही असावे ज्यामुळे त्याला हे शक्य झाले. वगैरे वगैरे…
आता यामागे नेमके काय आहे ते कोणीच सांगू शकत नाही. किंवा याबाबत कोणालाच काही माहीत नाही असे आपण गृहीत धरूया.
या रहस्यमयी घटनेवर ‘डायरेक्टरी ऑफ पॉसीबीलिटीज’ नावाचे पुस्तक सुद्धा लिहिले गेले आहे.
===
हे ही वाचा – जपानवर दोनदा आलं आकाशातून संकट – ज्यातून हा एकटाच पठ्ठ्या बचावला!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.