१९व्या शतकात इतकी भन्नाट फोटोग्राफी अस्तित्वात होती याचा तुम्ही विचारही केला नसेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
फोटो काढणे, फिल्टर लावणे आणि मग अपलोड करणे हा सध्या बहुतांश लोकांचा छंद आहे. कोणत्याही फोटो मधील रंगसंगती बदलणे, प्रकाशयोजना बदलणे, फोटोला फ्रेम बसवणे हे मधल्या काळात अगदीच सहज झालं आहे.
‘फोटोशॉप’ हे तंत्र तयार झालं आणि डिजिटल फोटोमध्ये ‘काहीही’ करणं शक्य आहे हे आपल्या सर्वांना कळलं. एक काळ होता जेव्हा, फोटो म्हणजे कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रमाण मानलं जायचं.
आता कोणत्याही फोटोवर विश्वास ठेवण्याआधी लोक खात्री करून घेतात आणि मगच तो पुढे पाठवतात; निदान जबाबदार व्यक्तींकडून तशी अपेक्षा असते. एक काळ होता जेव्हा फोटो बघून लग्नासाठी पसंती कळवली जायची. कारण, एकदा काढलेल्या फोटोमध्ये काहीच फेरफार करण्याची शक्यता नसायची.
आज मात्र कोणताही फोटो बघितल्यावर ‘फ्रंट कॅमेरा ‘की ‘बॅक कॅमेरा’, ‘फिल्टर केलेला’ की ‘कोणताही फिल्टर न वापरता’ फोटो अपलोड केला? असे प्रश्न आधी विचारले जातात.
===
हे ही वाचा – उत्कृष्ट फोटोजमागची आपल्याला वेड्यात काढणारी ‘बनवाबनवी’!
===
फोटोग्राफी या क्षेत्राने त्याचा शोध लागल्यापासून आजपर्यंत कित्येक स्थित्यंतर बघितली आहेत. कृष्ण-धवल फोटो ते आजचे सेल्फी हा एक खूप मोठा पल्ला या क्षेत्राने सर केला आहे.
‘कोडॅक’ कॅमेराच्या ३६ फोटोंच्या रोलमध्ये सामावून गेलेल्या विसाव्या शतकात फोटोग्राफीच्या क्षेत्राने थोडं स्थैर्य बघितलं असं म्हणता येईल.
पण, त्या आधी म्हणजे १९ व्या शतकात इंग्लंडमध्ये राणी ‘व्हिक्टोरिया’ यांच्या काळात फोटोग्राफीमध्ये खूप प्रयोग करण्यात आले होते.
कोणते होते हे प्रयोग?
तुमच्या फोटोमध्ये तुमचं शीर न दाखवणे किंवा तुमच्याच हातात तुमचं तोंड ठेवलेलं असणे, असे काही विचित्र प्रयोग त्या काळात फोटोंवर केले जायचे. विशेष म्हणजे फोटो असे काढले जावेत अशी लोकांची इच्छा असायची.
एका पूर्ण कुटुंबाचा फोटो असणे आणि त्यामध्ये डोक्यात आणि शरीरात अंतर असणे असे काहीही प्रयोग तेव्हा लोकांना खूप आवडायचे. आजही असे प्रयोग करणारे काही फोटोग्राफर इंग्लंड मध्ये आहेत असं सांगितलं जातं.
‘फोटो एडिटिंग’चे तंत्रज्ञान हाताशी नसतांना देखील त्या काळातील फोटोग्राफर्स लोकांना प्रयोग करण्यापासून कोणीच थांबवू शकले नव्हते ही कमालीची गोष्ट होती.
हे प्रयोग त्या काळात कसे साध्य केले जायचे?
‘पोर्ट्रेट’ फोटोग्राफी करताना १९ व्या शतकात मोजकेच पर्याय असायचे. एक पोर्ट्रेट फोटो तयार करताना फोटोग्राफर्स हे कित्येक जुन्या फोटोंच्या ‘निगेटिव्ह’ म्हणजे रिळावरील चित्रांना एकत्र आणायचे आणि त्यांना कट करून एका फोटो मध्ये पेस्ट करायचे आणि तो फोटो असा करायचे जसा की हे सगळे चित्र हे एकाच वेळी काढण्यात आले आहेत.
हे ऐकायला सोपं वाटतं. पण, काढलेल्या फोटोमध्ये डोकं ठेवायचं नाही आणि त्याच व्यक्तीच्या आधीच्या फोटो मधील काही भाग कट करून नवीन फोटोत लावायचे हे काम सोपं नव्हतं. फोटो परत देतांना कोणालाही असं वाटायचं की, हा त्या व्यक्तीच्या कट करण्यात आलेल्या डोक्याचाच फोटो आहे. एखादं नक्षीकाम केल्यासारखं हे नाजूक काम होतं.
===
हे ही वाचा – तुमची सुंदर छबी टिपणाऱ्या कॅमेऱ्याच्या या खास बाबी तुम्हाला ठाऊक आहेत का?
===
फोटो काढण्यासाठी त्याकाळात आलेल्या लोकांच्या मागणी सुदधा अश्या काही असायच्या, “मला असा फोटो पाहिजे आहे जिथे मी माझंच डोकं घेऊन उभा आहे.” यामध्ये फोटोग्राफीपेक्षा जास्त काम हे फोटो काढल्यानंतरच असायचं.
सर्वात पहिल्यांदा फोटो एडिटिंग कोणी केलं?
स्वीडनचे फोटोग्राफर ‘ऑस्कर रिजलँडर’ यांनी १८५६ मध्ये फोटो एडिट करण्याचा प्रयोग सर्वप्रथम केला होता. त्यांचं काम हे अल्पावधीतच इंग्लंडमध्ये लोकप्रिय झालं होतं. कारण, हा प्रयोग करणारे ऑस्कर हे जगातील पहिले फोटोग्राफर होते.
ऑस्कर रिजलँडर यांच्या फोटोला बघून व्हिक्टोरिया काळातील कित्येक फोटोग्राफरने या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं शिक्षण घेतलं होतं आणि मग तो एक ट्रेंड झाला होता.
कमीत कमी टूल्सचा वापर करून डोकं नसलेले फोटो लोकांसमोर आणणे हे तेव्हा खूपच कौतुकास्पद मानलं जायचं.
अर्थात, तेव्हा आजच्या इतके फोटो क्लिक केले नाही जायचे. पण, तरीही एका फोटो मागे लागणारी मेहनत ही कित्येक पटीने जास्त होती आणि सर्जनशीलतेमध्ये त्या काळातील फोटोग्राफर हे काळाच्या पुढे होते हे मान्य करावं लागेल.
एका ग्रुप फोटोमध्ये सर्व जणांनी आपल्या हातात घेतलेलं डोकं बघितल्यावर कोणीही हे मान्य करेल.
एक प्रश्न पडणं मात्र साहजिक आहे की, डोकं नसलेले फोटोच का तयार केले जायचे?
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकांमध्ये मरणाबद्दल एक वेगळीच उत्सुकता होती. ते फार भावनिक होते असं नाही. ‘जगण्यापेक्षा मरण चांगलं’ अशी एक भावना त्याकाळी लोकांमध्ये होती. याचं कारण म्हणजे आजच्या सारखी औषध त्यावेळी सहज उपलब्ध व्हायचे नाहीत.
आजारी पडला की मृत्यू झाला ही तेव्हा अगदीच सामान्य गोष्ट होती. लोक का मरत आहेत? हे लक्षात यायचं नाही. पण, लोक रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने मरायचे. मृत्यच्या भीतीपेक्षा मृत्यूचं कुतुहल लोकांमध्ये जास्त होतं.
मृत्यूबद्दल असलेलं कुतूहल हे लोकांमध्ये “आपण मेल्यानंतर कसे दिसू?” असे प्रश्न निर्माण करायचे आणि म्हणून ते व्हिक्टोरिया फोटोग्राफर्सला इतकं काम त्यावेळी मिळत होतं.
मृत लोकांचे फोटो काढू देण्यासाठी लोक जास्तीचे पैसे मागू लागले होते. कोणताही फोटोग्राफर हा तेव्हा सतत मेलेल्या व्यक्तींच्या आजूबाजूलाच नेहमी काम करायचा.
ऑस्कर रिजलँडर यांना त्यांच्या फोटोग्राफी क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘फादर ऑफ आर्ट फोटोग्राफी’ या नावाने जगात ओळखलं जातं. त्यांनी शिकवलेल्या पद्धती या व्हिक्टोरीया राणीच्या काळातील ‘इरा ट्रिक फोटोग्राफी’ला सुरुवात झाली होती.
त्यानंतरच, आकाशात उडणारे व्यक्ती, दोन व्यक्तींच्या फोटो मधील एका व्यक्तीला कमी ठळकपणे दाखवणे हा प्रकार तेव्हा सुरू झाला होता.
आपल्या घरी, मित्रांसोबत फोटो काढतांना आपण कित्येक वेळेस चुकून एखाद्या व्यक्तीला फोटोतून कट करत असतो. त्या काळातील लोक हे करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजायचे हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल.
काही दिवसांनी चेहरा नसलेला फोटो काढण्यासाठी एखादं अप्लिकेशन तयार झालं तर या लेखाची आठवण तुम्हाला नक्कीच येईल.
===
हे ही वाचा – ह्या १० फोटोग्राफी हॅक्स तुम्हाला परफेक्ट शॉट क्रिएट करायला शिकवतील!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.