Site icon InMarathi

मदरसात मुस्लिम मुलावर मौलवीने जे केलं तेच तो आज इतर बालकांवर करतोय…

madarsa child abused inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मदरसा म्हणजे काय हे आपण ऐकलेलं असतं. त्याबद्दल आपल्याला ठाऊक असतं. मुस्लिम धर्मियांच्या या शाळेत नक्की काय काय शिकवलं जातं, याविषयी चर्चाही होताना आपण पाहतो.

मदरसे आणि दहशतवाद यांचा एकमेकांशी संबंध जोडल्या गेला असल्याच्या घटना, बातम्या हेसुद्धा आपल्या वाचनात आलेलं असतं. या सगळ्याहूनही भीषण आणि गंभीर काहीतरी असू शकतं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? असा विचार केला नसेल, तर हे नक्कीच वाचायला हवं.

उमेर अर्शद या डॉक्टरने त्याचा एक अनुभव ट्विटरवर शेअर केलाय. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. त्याच्याकडे आलेल्या पेशंटने कथन केलेली मदरश्यांमधील सत्यपरिस्थिती भयानक आहे.

त्याच्यावर लहान असताना झालेले लैंगिक अत्याचार त्याने सहन केले आणि पचवले. पचवले म्हणावं की नाही, हे आता तुम्हीच ठरवा. कारण, त्याच्यावर जो अन्याय झाला, तेच तो इतरांच्या बाबतीत करत आहे. अर्शद याचा हा ट्विटर थ्रेड तेच सांगतोय.

 

 

हे वाचणं त्रासदायक ठरू शकतं असा इशारा पहिल्याच वाक्यात दिलाय, यातच सगळं आलं.

१८ वर्षांच्या आसपास वय असलेल्या ऐन तारुण्यातील एका मुलाची सर्जरी करण्यात येणार होती. मात्र त्याने जे सांगितलं ते ऐकून डॉक्टरला धक्काच बसला. त्याने ही सगळी हकीकत अर्शदला सांगितली आहे.

 

 

हा मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं तपासणीत लक्षात आलं. विचित्र दाढी, डोक्यावर गोल पांढरी टोपी आणि सलवार कमीझ घातलेल्या या तरुणाला याबद्दल कुठलंही आश्चर्य वाटलं नाही.

 

 

त्याला याविषयी कुठलंही गांभीर्य नसल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्याने कुठल्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेऊ नयेत आणि इतरांचा धोका वाढवू नये, हा सल्ला त्याने अजिबातच गांभीर्याने घेतला नाही. यावेळी त्याला त्याच्या बालपणाबद्दल विचारलं गेलं.

 

 

मदरशात असताना मौलानांकडून त्याच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याचं या तरुणाने सांगितलं. अर्थात, त्याने संभाषणात वापरलेला शब्द वेगळाच होता.

===

हे ही वाचा – गोड गायिका मैथिली संजय राऊतांना भेटली आणि ट्विटरवर एकच हलकल्लोळ माजला…!

===

एवढंच नाही, तर त्याच्या लहानपणी त्याच्या बाबतीत जे झालं तेच आता त्याच्यासमोर असणाऱ्या लहान मुलांच्या बाबत घडत आहे असंही त्याने सांगितलं. या मुलांवर तो बलात्कार करत असल्याची कबुली त्याने स्वतःहून दिली आहे, आणि तीसुद्धा विडिओ रेकॉर्डिंग होत असताना.

 

 

एवढी कबुली देऊन तो थांबला नाही, तर मदरसा आणि मशिदींमध्ये ही अत्यंत सामान्य आणि नेहमी घडणारी बाब असल्याचं या तरुणाने अत्यंत थंडपणे सांगितलं.

डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव, राग, आश्चर्य याचा त्या मुलावर काहीही परिणाम झाला नाही.

 

 

त्याने चक्क ही गोष्ट हसण्यावारी नेली. त्याच्या चेहऱ्यावरील भाव हे स्पष्ट करत होते, की डॉक्टरांचा कुठलाही सल्ला ऐकण्यात त्याला रस नाही.

 

 

डॉक्टर अर्शद असं म्हणतात, की यानंतर नेमकं काय घडलं ते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी ते जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. मात्र त्यांचा कयास असा आहे, की या मुलाने घरी जाऊन केवळ घडलेल्या गोष्टीची खिल्ली उडवलेली असणार.

===

हे ही वाचा – मुलींचा लैंगिक “खतना” : ही नृशंस प्रथा सर्रास दुर्लक्षित का राहतेय?

===

एवढंच नाही, तर यानंतर कुठल्या मुलासोबत संबंध ठेवायचे हेसुद्धा त्याने मनात निश्चित केलं असेल. कारण, त्याच्यासाठी हेच जगणं नेहमीच आणि सामान्य आहे. ज्याच्यावर त्याच्या शिक्षकांनीच बलात्कार केला असेल, त्याच्यासाठी ही गोष्ट सामान्य असणं अगदीच साहजिक आहे.

 

 

यावर त्यांना इतर काहीही भाष्य करायचं नाही, हेसुद्धा अर्शद यांनी इथे स्पष्ट केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांना ही गोष्ट सामान्य वाटते, त्यांच्यासाठी काहीच वेगळं नाही. ज्यांच्यासाठी ही गोष्ट चुकीची आहे, ती चुकीची आहे. यातील कुणालाही याबद्दल काहीच वाटणार नाही.

 

 

समाजातील लोकांना याविषयी काहीही वाटत नाही. आपण अधिक चांगल्या दर्जाचे आहोत, एवढंच समाजातील लोकांना माहित असतं. तेच त्यांना आवश्यक वाटतं.

 

 

या लोकांनी इतरांच्या कुठल्याही गोष्टींमध्ये अश्लीलता शोधायचा प्रयत्न करू नये. असं अर्शद म्हणतात. अशा व्यक्तींवर घणाघाती टीका त्यांनी केलेली या ट्विटमधून पाहायला मिळते.

मदरशात या अशाही गोष्टी घडतात, घडू शकतात यावर विश्वास बसणं कठीण असलं, तरी ही परिस्थिती खरी आहे यात शंका नाहीच. या ट्विटर थ्रेडमधून अर्शद यांनी ती आपल्यासमोर मांडली आहे, इतकंच!

===

हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version