Site icon InMarathi

एका पोस्टवरून कट्टर मुस्लिमवादी गटाने केला ८० हिंदू घरांवर हल्ला….

hindu feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात एका गटाने मंदिरावर हल्ला करून मंदिर उद्धवस्त केले होते, तसेच अनेक हिंदू मुलींना बाटवण्याचे प्रकार तर सर्रास घडून येत असतात. अल्पसंख्यांक हिंदू असलेल्या राष्ट्रांमध्ये हे प्रकार चालूच असतात.

अशीच एक घटना आपल्या सख्ख्या शेजारी असलेल्या बांग्लादेशमध्ये घडली आहे. बांगलादेश हा प्रामुख्याने मुस्लिम समाज असलेला देश मानलेला जातो.

भारत, नेपाळ यानंतर सर्वात जास्त हिंदूंची संख्या असलेल्या देशांमध्ये बांग्लादेश ची गणना होते. २०१५ च्या जनगणनेनुसार बांग्लादेश मध्ये  १७ लाख इतक्या प्रमाणवर हिंदू समाजाची संख्या आहे. प्रामुख्याने बंगाली भाषा बोलली जात असल्याने अनेक हिंदूबंगाली लोक तिकडे वास्तव्य करत आहेत. 

बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणारे हल्ले नवीन नाही, नुकत्याच एका कट्टर मुस्लिमवाडी गटाने एका गावातच थेट हल्ला करून प्रचंड नुकसान केले.

हे ही वाचा – साल १९२१ : चलाखीने लपवला गेलेला हिंदूंचा नृशंस नरसंहार…

नक्की काय प्रकरण?

बांग्लादेशमधील हिफाजात ए इस्लाम या कट्टरवादी गटाच्या हजरो समर्थकांनी प्रामुख्याने हिंदू वस्ती असलेल्या गावावर हल्ला केला. ७० ते ८० घराची नासधूस करून घरे उध्वस्त केलीच त्यावर कहर म्हणजे लूटमार देखील केली. हा हल्ला बुधवारी रात्री करण्यात आला.

 

 

 

हल्ला का केला?

सोशल मीडिया हे माध्यम जितके प्रभावी आहे तितकेच ते अशा घटना घडल्यास डोकेदुखी ठरते. बंगबंधू शेखमुजबीर रहमान यांचा पुतळा गावात बसवायचा असा प्रस्ताव कट्टरपंथी गटाचे सचिव मौलाना मुफ्ती मामूनुल यांनी आपल्या भाषणातून मांडला.

आज आपल्याकडे  देशाचे मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री यांच्या भाषणावरून त्यांची अनेकदा खिल्ली सोशल मीडियावर उडवली जाते. इकडे  मौलानांच्या याच प्रस्तावावर एका तरुणाने फेसबुक वर निषेध नोंदवला व टीका सुद्धा केली.

 

 

मौलांनांवर केलेल्या टीकेमुळे भडकलेल्या कार्यकर्त्यानी  शल्ला जिल्ह्यातील नौगाव गावात सशस्त्र हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणवर नुकसान करून लुटमारी देखील केली. गावातील लोकांना आधीच शंका आली असल्याने त्यांनी आधीच गाव सोडलेले. त्यामुळे जीवितहानी झाली नसून वित्तहानी नक्कीच झाली आहे.

===

हे ही वाचा – “हिंदू धर्मविरोधी बॉलिवूडसाठी मी गाणी म्हणणार नाही!” : गुणी गायिकेची अशीही कथा..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version