आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हाव, लालचीपणा हे मानवी स्वभावाचेच पैलू आहेत. जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्यात हे गुण नाहीत. प्रत्येकात काही चांगले गुण आणि आणि काही अवगुण हे असतातच. त्यापैकीच लालसा हा सुद्धा एक अवगुण आहे.
खरंतर याला अवगुण म्हणणंदेखील तसं योग्य नाही, कारण चांगल्या गोष्टीची लालसा योग्य असते, पण तीच हाव माणसाला रसातळाला घेऊन जाऊ शकते!
या एका गुणामुळे रावाचा रंक आणि रंकाचा राव होणारे आपण सगळ्यांनी पाहिले असतीलच. अशीच एक बोधकथा आज आम्ही तुमच्यासाठी मांडणार आहोत!
सुदर्शनपूर नगरातली ही गोष्ट. पैसा, संपत्ती, समाधान सगळ्याच बाबतीत अगदी कुशल मंगल असलेल्या या नगराचा राजासुद्धा अगदी शिस्तप्रिय आणि सदैव रयतेचा विचार करणारा!
===
हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : कितीही वेळा हरलात, तरी ही कथा तुम्हाला उठून लढण्याचं बळ देईल!
===
या राजाच्या दरबारात एक दिवस अचानक एक गावकरी आला आणि त्याने राजाकडे गयावया करू लागला, की तो अत्यंत गरीब आहे; हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतोय, शिक्षणाचा अभाव असल्याने त्याला कुणी कामावर देखील ठेऊन घ्यायला तयार नाही.
त्यासाठी त्याला राजाने मदत करावी या आशेवर तो राजाच्या दरबारात शिरला, राजाने त्याला विचारलं की तुला काय हवं? तो म्हणाला की थोडीफार कसता येईल अशील जमीन मिळाली तर बरंच होईल!
यावर राजाने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली, राजाने त्याला सांगितलं, की तुला जमीन सूर्यास्तानंतर मिळेल, पण त्यासाठी तुलाही काहीतरी कष्ट घ्यावे लागतील.
पुढे राजाने सांगितलं की “इथून बाहेर पडल्यावर तू जितकी जमीन चालत किंवा धावत पार करशील तेवढी जमीन मी तुझ्या नावावर करून देईन, पण जिथून चालायला तू सुरुवात करशील त्या ठिकाणी तुला सूर्यास्त व्हायच्या आत परतावे लागेल”
आपण चालू तितकी जमीन आपल्या नावावर होणार या कल्पनेनेच तो गावकरी हुरळून गेला आणि तातडीने तो बाहेर पडला आणि चालायला सुरुवात केली, मध्ये मध्ये तो जोरात धावत असे, दमायला झालं की मध्येच त्याची चाल कमी व्हायची, पण त्याने चालणं काही थांबवलं नाही,
या चालण्याच्या आणि जमिनीच्या नादात तो इतका पुढे गेला, की नगराच्या वेशीपासून बराच दूर जाऊन पोचला, सूर्य माथ्यावर आला तेंव्हाच तो वेशीच्या बऱ्याच बाहेर आला होता.
तरी अजून सूर्यास्तापर्यंत वेळ आहे म्हणून तो आणखीन पुढे चालत राहीला आणि आणखीन दूरवर येऊन पोचला. एके ठिकाणी तो थांबला तोवर सूर्यास्त व्हायला सुरुवात झाली होती!
===
हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : प्रवाशांसाठी तिने खोदलेली विहीर आपल्याला जीवनाचा अर्थ सांगते
===
मागे वळून पाहतो तर काय या जमिनीच्या हव्यासापोटी तो माणूस बराच लांब आला होता, दूरदूरवर त्याला त्याचं नगर दिसत नव्हतं. राजाने घातलेली अट त्याला आत्ता लक्षात आली, सूर्यास्तापर्यंत आपण परत नाही गेलो तर जमीन आपल्याला मिळणार नाही या भीतीने तो जिवाच्या आकांताने पुन्हा नगराच्या दिशेने धावू लागला!
कोसो दूर चालत आणि धावत आल्यामुळे आधीसारखा उत्साह त्याच्यात राहीला नव्हता. चालताना त्याला बरीच धाप लागत होती, शिवाय वाटेत आश्रय घ्यायलासुद्धा काहीच पर्याय नव्हता कारण सूर्य मावळायच्या आधी त्याला पुन्हा परतायचे होते.
तो परतीच्या वाटेवर धावत राहीला, अखेर त्याच्या छातीत कळा यायला लागल्या, तो एके ठिकाणी बसला, दुखणं अनावर झालं होतं आणि त्याच जमिनीवर त्याने त्याचा देह ठेवला आणि अखेरचा श्वास घेतला!
राजा इथे वेशीच्या जवळ आपल्या सेनपतींसोबत वाट बघत होता की हा गावकरी आता येईल मग येईल. पण सूर्य मावळायला येत होता म्हणून त्याने त्याच्या २ सेनापतींना त्याचा शोध घेण्यासाठी धाडला!
थोड्या वेळाने सेनापती त्या गावकऱ्याचा मृतदेह घेऊन आले, ते पाहून राजाला खूप वाईट वाटले. या गावकऱ्याच्या मनातली लालसा आणि अधिक जास्तीचा हव्यासच त्याच्या मृत्यूचं कारण ठरला!
त्याला जेवढी जमीन पुरेशी होती तेवढीच त्याला मिळाली असती पण या जास्तीच्या हव्यासापोटी त्याने त्याचा जीव गमावला!
यातून बोध काय मिळतो तर माणूस गरीब असो किंवा श्रीमंत, तो हे जग सोडून जाताना कोणतीच गोष्ट सोबत घेऊन जाणार नाही आणि जमिनीचा कितीही हव्यास बाळगला तरी माणसाला ७ फुट जमीनच पुरेशी असते!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.