' रेडिओ अॅक्टिव्ह खेळणी ते मानवी झू…!! या १० विचित्र गोष्टी ऐकून हैराण व्हाल! – InMarathi

रेडिओ अॅक्टिव्ह खेळणी ते मानवी झू…!! या १० विचित्र गोष्टी ऐकून हैराण व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण कुठे पाहुणचारासाठी बाहेर गेलो आणि तिथे आपण कधीच न बघितलेली किंवा अनुभवलेली घटना पाहिली, की सदर घटना जिथे घडली ते सहज बोलून जातात, ‘आमच्याकडे हे असंच असतं’ किंवा ‘आमच्याकडे ही कॉमन गोष्ट आहे’.

सांगायचं तात्पर्य काय, तर आपल्याला विचित्र वाटणारी गोष्ट समोरच्यासाठी अगदी साधारण बाब किंवा रोजची घटना असू शकते. त्यामुळे त्याबद्दल त्यांना विशेष असं काहीच वाटत नसतं.

उदाहरण द्यायचं झालं, तर आरेची वसाहत जवळ असल्याने गोरेगावसारख्या भागात बिबट्या दिसणं हे तिथल्या स्थानिकांसाठी नवीन नाही. तेच जर शहराच्या इतर भागात बिबट्या दिसला की भीतीमय वातावरण निर्माण होतं.

 

leopard inmarathi

 

कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा वाढू लागला तेव्हा चीनमधून पुडी सोडली गेली, की ते वटवाघूळ खाल्ल्याने झालं. सगळं जग चीनला शिव्या घालत असताना चीन मात्र ‘अपने इधर ये सब चलता है’ सांगून कोरोना वाटत फिरत होता. कारण, इतरांना विचित्र वाटणारी गोष्ट काहींना सामान्य वाटत असते.

आज अशाच आपण विचित्र आणि न पटणाऱ्या बाबी बघणार आहोत ज्या एकेकाळी सर्रास वापरात होत्या.

१. कोकेनचा घरघुती उपचारासाठी वापर

विचार करा की तुम्ही तुमच्या घरी उपचारासाठी आजीबाईच्या बटव्यामध्ये नवीन वस्तू म्हणून कोकेन घेऊन आला आहात. पुढे काय होईल.? दुसऱ्या दिवशी अँटी नार्कोटिक्सची तुमच्या घरी आणि तुम्ही त्यांच्या कैदेत!

शतक भरापूर्वी मात्र कोकेन हे पाश्चिमात्य देशांमध्ये घरात ठेवली जाणारी सामान्य गोष्ट होती. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय हे मेडिकल स्टोअरमधून सर्रास विकत घेतले जात असे. कफ आणि दातांच्या उपचारासाठी याचा वापर होत असे.

 

cocaine inmarathi

 

शिवाय लहान मुलांना सिडिटीव्ह म्हणून डॉक्टर स्वतः कोकेन लिहून देत असत. तसेच कोकेनची जाहिरात सुद्धा केली जात असे. आहे की नाही विचित्र?

२. लहान मुलांना पोस्टाने इच्छित स्थळी पाठवणे

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत हे कायद्याने लीगल होतं. शिवाय यासाठी विशेष नियम सुद्धा होते. तेव्हा मुलांना ‘पार्सल’ करायचे फक्त १५ सेंट एवढा खर्च होता. पण स्टँडर्ड पार्सलच्या वजनापेक्षा मुलांचे वजन कमी भरले, तरच या योजनेचा फायदा घेता येत असे.

 

child parcel inmarathi

 

३. लहान मुलांसाठी आऊटडोअर पिंजरा

१९३० च्या दरम्यान लोखंडी तारांचे पिंजरे अनेक युरोपियन आणि अमेरिकन कुटुंबांमध्ये सामान्य गोष्ट होती. मुलांसाठी धोकादायक असलेल्या या पिंजऱ्याचा वापर लहान मुलांना ताजी हवा मिळावी म्हणून घराबाहेर ठेवण्यासाठी होत असे.

शिवाय घरातील व्यक्ती काही कामात असतील, तर लहान मुलं सुरक्षित असावी म्हणून याचा वापर केला जात असे.

 

outdoor cage for kids inmarathi

 

४. संन्याश्याची बाग

श्रीमंत लोकांची काय हौस असेल सांगता येत नाही. त्यांच्या याच शौकीन स्वभावामुळे अनेकदा सामान्य लोकांना त्रास होत असतो.

१८ व्या शतकात श्रीमंतांच्या बागेत संन्यासी असणे सामान्य गोष्ट होती. या त्यांच्या ‘वैयक्तिक’ संन्याशाला अंघोळ करायची परवानगी नव्हती, नखं कापण्याची परवानगी नव्हती. शिवाय दाढी आणि केस कापण्याची सुद्धा नाही.

 

garden hermit inmarathi

 

बागेत असलेल्या झोपडी वजा घरात त्याचा निवास असे. घरात कोणी पाहुणे आले की शेठ लोक त्यांना या बागा दाखवून ‘शो ऑफ’ करत असत.

५. औषधोपचाराच्या विचित्र पद्धती

लुईस पाश्चरच्या आधी कोणाला निर्जंतुकीकरण माहीत असेल असं वाटत नाही. एकच ब्लेड आणि सुई सगळ्यांसाठी वापरले जात असत.

 

medical needle inmarathi

 

रक्त वाया घालवणे ही अठराव्या शतकातल्या डॉक्टरांची उपचार पद्धती होती. बोलण्याच्या आजारांवर जीभ कापणे, इलेक्ट्रिक शॉक देणे वगैरे उपाय केले जात.

६. रेडिओ अॅक्टिव्ह खेळणी

५० च्या दशकात अॅटॉमीक रेडिएशन हे सेफ मानले जात असे. एवढे की त्याचा लहान मुलांच्या खेळण्यात वापर होत असे.

 

radio active substance inmarathi

 

एक मिनी लॅबोरेटरी नावाची किट बाजारात येत असे, ज्यामध्ये कमी प्रमाणात युरेनियम आणि पोलोनियम हे रेडिओ अॅक्टिव्ह पदार्थ दिले जात असत.

७. मानवी अभयारण्य

युरोपात मानवी अभयारण्य सर्रास चालवली जात असत. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतांचा पुरावा म्हणजे आशिया आणि आफ्रिकामधील लोक आहेत.

ही विचित्र आणि भयानक अभयारण्ये ६० च्या दशकापर्यंत कार्यरत होती.

 

human zoo inmarathi

 

८. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ‘सहल’

मागेच महाराष्ट्र शासनाने ‘जेल’मध्ये सहलीचे आयोजन करण्याचे ठरवले होते. निर्णय किती योग्य होता हे त्या त्या व्यक्तीच्या विचारांवर सोडून देऊ. पण पूर्वी युरोपात वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सहलीचे आयोजन केले जात असे, हे तुम्हाला माहित आहे का?

लोकांना कळावं, की मानसिक रोगी कसे असतात, असा त्यांचा दृष्टिकोन होता. पण येणाऱ्या पैशांचा प्रवाह पाहता तो मेंटल असायलमच्या मालकांनी वेड्यांच्या विचित्र वागणुकीचे प्रदर्शन भरवून त्या सहलीमध्ये ‘मनोरंजन’ करणं सुरु केलं.

कालांतराने रुग्णांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे या सहली बंद केल्या गेल्या.

 

mental hospital trip inmarathi

 

९. मानवी शरीराच्या अवयवाचा संग्रह

युरोपियन श्रीमंत लोकांचा अजून एक अजब शौक असायचा. त्यांच्या घरात संग्रहालय असायचं, तेही मानवी अवयवांचं! आलेल्या पाहुण्यांना शरीराचे अवयव ते ट्रॉफी जिंकल्यासारखे दाखवायचे.

 

human body part collection skull inmarathi

 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर युरोपियन आणि अमेरिकेन जवान शत्रू सैन्याच्या जवानांची कवटी, हात, हाताची बोट विजयी झाल्याचे चिन्ह म्हणून घेत जात असत.

१०. गर्भधारणेच्या काळात डॉक्टरांच्या परवानगीने धूम्रपान

७० च्या दशकात बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून डॉक्टरच गर्भवती स्त्रियांना सिगारेट ओढण्याचा उपाय सांगत असत. शिवाय नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये विना अटकाव सिगारेट ओढण्याची परवानगी होती.

कालांतराने यामुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेत त्यावर बंदी आणली गेली.

 

pregnant lady smoking inmarathi

 

तर या आहेत काही विचित्र आणि भयानक गोष्टी ज्या आता मूर्खपणाचे लक्षण वाटतील, पण पूर्वी अगदी सर्रासपणे अंमलात आणल्या जात असत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?