आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आज जगाचा इतिहास पाहता अनेक दुबळ्या राष्ट्रांवर इतर प्रबळ राष्ट्रकर्त्यांनी आक्रमण करून तिथले प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. परकीय आक्रमणे आपल्याकडे शतकानुशतके सुरु होती. अगदी आपल्या सारख्या भौगोलिक आकाराने मोठ्या असलेल्या प्रदेशावर सुद्धा आक्रमणे झालेली आहेत.
आज आपण पहिले तर आपल्या देशाला लागून असलेल्या देशांमध्ये कित्येक वर्ष गुलामित होते, श्रीलंका तेव्हाची सिलोन डच इंग्रजांच्या अंमलाखाली होती. म्यानमार, कंबोडिया या सारखे आपले सख्खे शेजारी सुद्धा पारतंत्र्यात होतेच.
तिबेट हा देश सुद्धा पहिल्यापासून परकीय आक्रमणांनी पिचलेला आहे. पहिले मंचू, नंतर मंगोल मग गुरखा आणि त्यांनतर चिनी सैन्य.
चिनी सैन्य आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी तिबेटच्या सीमेवर जायचे, तिबेटियन सैन्य त्यांना परतवून लावायचे. पण १९५० साली चीनने सर्व शक्तीपणाला लावून तिबेटवर हल्ला केला. तिबेट वर केलेल्या हल्याने चिनी दहशत चांगलीच पसरली होती. जपान पासून ते श्रीलंकेपर्यंतचे देश सतर्क झाले होते.
चीन तिबेट वाद :
आज सीमावाद, प्रांतवाद नवा नाही. आपले समर्थ वाढवण्यासाठी प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांवर कुरघोडी करतच असतात. चीनच्या या कुरापती फार पूर्वीपासूनच्या आहेत.
चीनचे असे म्हणणे आहे की तिबेट हा प्रदेश १३व्या शतकासापासून चीनचा भाग बनला आहे त्यावर तिबेटचे असे म्हणणे आहे की तिबेट हा पहिल्यापासून एक स्वतंत्र राष्ट्र आहे.
चीनची भूक तिबेट पर्यंतच नाही तर अगदी आपल्या अरुणचलप्रदेश पर्यंत पोहचली आहे त्यांचे असे म्हणणे आहे की अरुणाचल प्रदेश सुद्धा चायनाचाच भाग आहे.
दलाई लामा :
दलाई लमा म्हणजे तिबेटच्या धर्मातील सर्वोच धर्मगुरू, दलाई लामा म्हणजे ज्ञानाचा महासागर असे म्हटले जाते. जगभरातील बौद्ध धर्मीय त्यांना मानतात.
दलाई लामा या धर्मगुरूंची परंपरा १३व्य शतकापासून सुरु आहे. आताचे दलाई हे १४ वे दलाई लमा आहेत, आज त्यांचे वय ८४ आहे. जगाला धैर्य शांती आणि अहिंसेचे संदेश ते आपल्या भाषणातून देत असतात.
–
हे ही वाचा – या महात्म्याने जपानमध्ये बौद्ध पंथाची स्थापना केली आणि व्यवस्थेला खडबडून जागे केले
–
दलाई लामांचे भारतात आगमन :
आपल्या घरावर जर आपत्ती ओढवली तर आपण पहिले घरच सोडून सुरक्षित ठिकाणी पोहचतो, हा मानवी गुणधर्म आहे अगदी प्राणीदेखील हेच करतात.
२०व्य शतकात तिबेटचे स्वातंत्र्य धोक्यात येत होते. ब्रिटिशांनी तिथे आक्रमण करून मॅकमोहन रेषा तयार केली जेणेकरून चीन तिबेट व भारत यामध्ये विभाजन करता येईल, अशी ती सीमारेषा होती.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर मॅकमोहन रेषेचा वाद उफाळून आला, १९५६ साली दलाई लमा यांनी भारतात येऊन चीन विरोधात आपली भुमिका मांडली व चीनला विरोध केला. त्यातच तिबेटियन लोकांनी १०मार्च रोजी चिन विरोधात उठाव केला ज्यात अनेक तिबेटियन सैन्य शहिद झाले.
दलाई लामा याना अशी भीती होती की चीन कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो. म्हणून त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे १७ मार्च १९५९ रोजी आपल्या कुटुंबासकट भारताकडे येण्यास पायी सुरवात केली.
दलाई लामांचा भारतात येण्याचा प्रवास ही चमत्कारिकच मानला जातो. तिबेट पासून तवांग पर्यंत यायला त्यांना १४ दिवस लागले. त्यानंतर हिमालयाच्या कुशीत त्यांना आश्रय मिळाला. आज ते ठिकाण एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते, ते म्हणजे धर्मशाळा.
आज अनेक बौद्ध धर्मीय आवर्जून तिकडे भेट देत असतात, ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची असेल तर ते लोक इकडे येऊन दीक्षा घेतात.
आपली भारत संस्कृती ही अतिथी देवो भव असे सांगते ते अगदीच योग्य आहे. दलाई लमा सारख्या धर्मगुरू आपल्या आश्रयाला आले आणि इथेच स्थायिक झाले.
आज दलाई लामा यांना कॅनडाने सुद्धा नागरिकत्व बहाल केले आहे. तसेच त्यांना जागतिक शांततेचे नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे.
===
हे ही वाचा – बौद्ध भिक्षू होणं वाटतं तेवढं सोपं नाही! भिक्षु होण्यासाठी काय करावं लागतं?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.