' एमबीए करून तो बनला चहावाला – आणि पठ्ठ्या कमावतोय वर्षाला कोट्यावधी रुपये! – InMarathi

एमबीए करून तो बनला चहावाला – आणि पठ्ठ्या कमावतोय वर्षाला कोट्यावधी रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चांगले शिक्षण, चांगली नॊकरी, गलेगठ्ठ पगार अशी सर्वांचीच स्वप्न असतात. या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकजणं ताबडतोब मेहनत घेतो. काहींच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होतात. मात्र काही जणं अशी आहेत ज्यांना करायचे एक असते, पण नशीब त्यांना दुसरीकडेच घेऊन जाते. याचंच प्रत्यय आला एका चायवाल्याला.

प्रफुल बिलौरे या तरुणाने त्याला मिळालेल्या एका अपयशातून यशस्वी असा उद्योग सुरु करत सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.

 

chahawala inmarathi

 

Humans Of Bombay सोबत प्रफुलने त्याची यशोगाथा सांगितले आहे. प्रफुलला एम बी ए करायचे होते मात्र तो CAT ची परीक्षा नापास झाला आणि त्याचे एम बी ए करण्याचे स्वप्न भंगले.

नापास झाल्यामुळे प्रफुल खूपच उदास आणि निराश झाला होता. त्याला ब्रेक घेऊन कुठेतरी फिरायला जायचे होते. मात्र मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे मनात आले की लगेच थोडी ना निघता येते? त्याच्या आई, वडिलांनी त्याला बाहेर जाण्यासाठी सपशेल नकार दिला.

प्रफुल २० वर्षाचा असताना त्याने इंटर्नशिप केली होती. तेव्हा त्याला जे पैसे मिळायचे ते तो साठवायचा. ते पिसे घेऊन तो अहमदाबादमध्ये पोहचला.

 

praful inmarathi

हे ही वाचा – जबरदस्त! : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…!

आई, वडिलांची इच्छा होती की, प्रफुलने एम बी ए करावे, म्हणूनच त्याने पुन्हा एम बी ए ला ऍडमिशन घेतले आणि तो सोबतच पार्टटाइम जॉब देखील करू लागला.

यादरम्यान एक दिवस तो चहा पिण्यासाठी एका चहाच्या टपरीवर गेला, आणि त्याला चहाची टपरी काढण्याची कल्पना सुचली. त्याने ही कल्पना लगेचच अंमलात आणली.

लगेचच त्याने चहाची टपरी सुरु केली, आणि त्याच्या नशिबाने कलाटणी घ्यायला सुरुवात केली. तो चहाच्या टपरीवर चहा देत लोकांसोबत मनमोकळ्या गप्पा देखील मारायचा. तो लोकांसोबत राजकारण आणि त्यांच्या जीवनाबद्दल मस्त चर्चा करत. त्याच्या या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे लोकांमध्ये तो खूपच कमी वेळात प्रसिद्ध झाला.

 

chai inmarathi

 

पुढे त्याने एमबीए सोडले आणि पूर्णवेळ चहावाला झाला. त्याने त्याच्या टपरीच्या नाव ‘एमबीए’ चायवाला असे ठेवले आहे.

 

chahawala

 

प्रफुलने हा व्ययसाय फक्त आणि फक्त स्वतःच्या जीवावर सुरु केला. सुरुवातीला त्याला तिच्या परिवाराकडून, नातेवाइकांकडून, मित्रमंडळींकडून एम बी ए करणारा मुलगा चहा विकतो, आम्हाला लाज वाटते तुझी अशा अनेक गोष्टी खूप ऐकाव्या लागल्या. मात्र त्याने हिंमतीने आणि स्वतःवर विश्वास ठेवत त्याचे काम चालू ठेवले.

आज अशी परिस्थिती आहे की, प्रफुल अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर देतो.

 

praful 2 inmarathi

 

कालानुरूप त्याने त्याच्या या टपरीवर अनेक बदल केले, ओपन माईक सिस्टीम सुरु केली तसेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने सर्व सिंगल व्यक्तींना मोफत चहा पाजला. त्याच्या या कल्पना भन्नाट चालल्या आणि चर्चेचा विषय देखील बनल्या.

प्रफुल लग्नांमध्ये देखील त्याच्या चहाचा स्टॉल लावतो. त्याच्या या चहाची फ्रॅन्चायझी मिळवण्यासाठी अनेकजणं धडपड करत आहेत.

प्रफुल नेहमी म्हणतो, ” केवळ डिग्री महत्वाची नाही, तर ज्ञान महत्वाचं आहे. मी चहावाला आहे आणि माझं माझ्या कामावर, चहावर खूप प्रेम आहे’. प्रफुलने चहाचा व्यवसाय सुरू केल्यापासून ४ वर्षात त्याने ३ कोटी रुपये कमावले असून तो कौतुकासही पात्र ठरला आहे.

हे ही वाचा – प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाकडे असायलाच हव्यात या १३ गोष्टी

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?