हे ६ कलाकार देखील झालेत सोशल मिडियामधून ऑफलाईन
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
टीका करणे हे आपल्याकडे लोकं कशा पद्धतीने घेतील सांगू शकत नाही, काहींना त्यांच्यावर केलेली टीका सहन होत नसते तर काही मनावर न घेता हसत खेळत ती टीका स्वीकारतात सुद्धा, अलीकडे सोशल मीडिया हे असे माध्यम झाले हे जिथे एखादी गोष्ट गरज नसताना सुद्धा इतकी डोक्यावर घेतली जाते तर एकीकडे गोष्ट पोस्ट केल्यास त्यावर प्रचंड ट्रोलिंग होते.
अशाच ट्रोलिंगला कंटाळून काही बॉलीवूड मधील व आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडिया वरून संन्यास घेतला आहे.
काहींनी ट्रोलिंग होते म्हणून सोडले तर काहींना सोशल मीडियाचा कंटाळा आला, म्हणून वापरणे सोडून दिले.
गेल्या दशकात आपलीकडे सोशल मीडिया वापरणे मोठ्या प्रमाणात वाढले होते, ऑर्कुटचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जात होता
फेसबुक आल्यापासून तर जगभरातील लोक एकमेकांशी जोडली गेली, त्याच बरोबरीने स्मार्टफोन आपल्या बाजारात हळूहळू आपली व्याप्ती वाढवत होता त्यामुळे एकूणच सोशल मीडिया वापरणे तेव्हपासूनच हळूहळू चालू झाले होते.
आजकाल शुल्लक गोष्टी सोशल करणारे आपण, लगेचच ट्रोलिंगचे बळी पडतो. तिथे सेलिब्रिटी कसे मागे राहणार?
मुळात आपल्याकडे सेलिब्रिटी हा विषय तर सर्वांचा लाडका आहे त्यात ही त्यांचे वैयक्तिक आयुष्य हा सुद्धा चर्चेचा विषय बनतो. सेलिब्रिटी कोणते कपडे घालतात, ते कोणासोबत फिरतात, या सारख्या गोष्टीवर लोक लक्ष ठेवून असतात. आणि त्यातलाच एखाद्या गोष्टीवरून ते ट्रोल होत असतात.
नुकताच आमिर खानचा वाढदिवस होऊन गेला, प्रत्येकजण आपल्या वाढदिवसाला संकल्प करत असतो तसा Mr.perfectionist ने सोशल मीडिया वरून संन्यास घेणार असा संकल्प केला आहे. याआधी सुद्धा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडिया सोडले आहे.
सोनाक्षी सिन्हा :
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आधीच कौन बनेगा करोडपती मध्ये न आलेल्या उत्तरामुळे ती टीकेची धनी बनली होती. सोशल मीडिया सोडण्याचे कारण तिने असे सांगितले की, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक वातावरण निर्मिती होत आहे त्यामुळे आपण सोशल मीडियाला कायमचा टाटा करत आहोत.
View this post on Instagram
नेहा कक्कर :
रियालिटी शो मधून सतत अश्रू गळणारी अशी तिची खिल्ली उडवली जाते, अशा या गायकीने सुद्धा काही दिवसांसाठी सोशल मीडिया पासून लांब राहणेच पसंत केले आहे.
आयुष्मान खुराना :
वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा करणार हा गुणी अभिनेता सुद्धा आता सोशल मेडिया पासून लांब गेला आहे. सोशल मीडिया का सोडले? या बाबतीत त्याने सोशल मीडियावरच पोस्ट शेअर करत स्पष्ट केले. तो असं म्हणाल की ‘माणुसकी व्यक्त करण्यासाठी २८० शब्द कमीच आहेत पण तेच नकारत्मकता, खोट्या बातम्या पसरवण्यासाठी पुरेसे आहेत’.
View this post on Instagram
शशांक खैतान :
एकीकडे जसे हिरो हिरोईन सोशल मीडिया सोडत आहेत, तर एकीकडे अनेक दिग्दर्शक देखील सोशल मीडिया सोडत आहेत. धडक फेम शशांक खैतान याने सोशल मीडियावरील वाढत्या नकारत्मकतेमुळे सोशल मीडिया सोडत आहे असे एका पोस्ट द्वारे शेअर केले.
View this post on Instagram
साकिब सलीम :
चित्रपटात काम करून आता ऑनलाईन प्लँटफॉर्मवर दिसणारा साकिब सलीमने देखील सोशल मीडियाला राम राम केला आहे.
त्याचे असे म्हणणे आहे की सोशल मीडिया वर वाढती तिरस्कार प्रवृत्ती, एकमेकाना सतत दोष देणे, शिवीगाळ या कारणामुळे त्याने सोशल मीडिया वापरणे सोडून दिले आहे
सुबोध भावे :
बायोपिक किंग म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळख असलेला अभिनेता सुबोध भावे, सोशल मीडियावर सतत बायोपिक करत असल्याने होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून शेवटी त्याने सोशल मीडिया पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे सोशल मीडियावरून सन्यास घेणारे सेलिब्रिटी आहेत तर दुसरीकडे करण जोहर, सोनम कपूर या सेलिब्रेटींचे फ़ॉल्लोर्स सुशांत सिंग प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.
सोशल मीडिया सोडणारे जसे सेलिब्रिटी आहेत तसे ट्रोलिंग हुन सुद्धा आपली मत ठामपणे मांडणारे सेलिब्रिटी सुद्धा आहेत.
अशा या सोशल मीडियाच्या जगातून कायमच अलिप्त राहिलेले सुद्धा सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी स्वतःठरवूनच सोशल मीडियापासून लांब राहिले आहेत.
पूर्वी चाहते सेलिब्रिटींची एक झलक बघण्यासाठी तासनतास वाट बघायचे, आज सोशल मीडियावरून सेलिब्रेटी काय करतात, हे घरबसल्या समजते.
शेवटी सोशल मीडियावर आपण कितपत सक्रिय असावं? आपली समजत काय ओळख आहे? लोक आपल्याकडे कोणत्या पद्धतीने बघतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्या सगळ्याच गोष्टी सोशल करायच्या की ठरविक गोष्टीच सोशल करायच्या हे ज्याचे त्याने ठरवावे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.