Site icon InMarathi

आमिरच्या ‘परफेक्शनची’ खिल्ली उडवणारे हे ५ चित्रपट खुद्द आमिरही विसरणार नाही!

aamir khan featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला सोशलमीडियावर उधाण आलं होतं, सगळ्यांनीच त्यांच्या त्या खासगी निर्णयाची बातमी केली आणि लव्ह जिहादपासून लग्नबाह्य संबंधांपर्यंत कनेक्शन जोडलं गेलं.

पण आज आपण आमिरच्या एका वेगळ्याच गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत!

आमीर खान बॉलिवूडचा सर्वात हुशार खान म्हणून ओळखला जातो. तो त्याच्या चित्रपटाबाबतीत अगदी लहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सर्व परफेक्ट आहे की नाही याची पूर्ण खात्री करून घेतो. कधी काही गोष्टी त्याला पाहिजे तशा नसतील तर तो तसे करून घेतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आमीर सिनेमांसाठी स्वतःवरही प्रचंड मेहनत घेतो. कोणतीही भूमिका खरी वाटावी यासाठी तो स्वतः नेहमी प्रयत्नशील असतो. त्याच्या या सर्व प्रयत्नांसाठी तो सर्वांच्या कौतुकास नेहमीच पात्र असतो. आमीरने दंगल सिनेमात एका सीनसाठी स्वतःचे वजन कमी केले होते. या सिनेमातील त्याचे फॅट टू फिट असे कॅप्शन देऊन अनेक फोटो व्हायरल झाले होते.

 

 

आज आमिर हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात मोठा आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या करियरमध्ये अनेक सिनेमे केले. आमीरने १९८८ साली कायमत से कयामत तक या सिनेमातून धमाकेदार एन्ट्री केली.

आज मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरने त्याच्या सुरुवातीच्या काळात काही असे सिनेमे केले जे आता जर कोणी पाहिले तर त्यांना आमिरच्या परफेक्शनिस्ट या उपाधीवर प्रश्न निर्माण होतील.

खुद्द आमिर देखील या चित्रपटांबद्दल आता बोलत नसेल आणि ते सिनेमे स्वतःही नि इतरांनाही पाहू देत नसेल. तर पाहूया आमिरची असेच काही फ्लॉप सिनेमे.

 

तुम मेरे हो :

१९९० साली आलेला ताहीर हुसेन यांचा हा सिनेमा बघणं म्हणजे डोळ्यांवर अत्याचार करण्याचा प्रकार आहे.

 

 

आमिर खान आणि जुही चावला यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमात आमिरने एका गारुड्याची भूमिका साकारली आहे. तर जुहीने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.

हे ही वाचा – या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!

मेला :

आमिर खान, ट्विंकल खन्ना, फैजल खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या हा सिनेमा धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. याच धर्मेश दर्शन यांनी मेला या चित्रपटाआधी ‘राजा हिंदुस्थानी’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला होता. मेला हा सिनेमा सुपर फ्लॉप झाला होता.

या सिनेमात आमिर आणि त्याचा भाऊ फैजल खान यांनी सोबत काम केले होते.

 

 

ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला सांगितले होते, की जर ‘मेला’ फ्लॉप झाला तर ती अभिनय सोडेल आणि अक्षयसोबत लग्न करेल. प्रत्यक्षात झाले देखील असेच. याच सिनेमानंतर अक्षय आणि ट्विंकल यांनी लग्न केले. हा सिनेमा फ्लॉप तर झाला, मात्र आज टीव्हीवर हा सिनेमा लागला की, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.

अव्वल नंबर :

देव आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९९० साली प्रदर्शित झाला होता. आमिर खान देव आनंद यांचा खूप मोठा फॅन होता. जेव्हा हा सिनेमा देव आनंद यांनी केला तेव्हा ते ६७ वर्षांचे होते.

 

 

देव आनंद या सिनेमाची स्क्रिप्ट आमिरकडे घेऊन गेले, तेव्हा आमिरने स्क्रिप्ट न वाचता या सिनेमाला होकार दिला. या सिनेमाची क्रिकेटवर आधारित आहे. आमिर खान आणि आदित्य पांचोली या दोघांमध्ये दुश्मनी असते आणि शेवटच्या सामन्याला क्रिकेट स्टेडियम उडवण्याची धमकी मिळते. अशी एकंदरीत सिनेमाची कथा आहे.

या चित्रपटात देव आनंद यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे.

दौलत की जंग :

१९९२ साली आलेला हा सिनेमा १९६९ साली आलेल्या ‘मैकेना गोल्ड’ या हॉलिवूडपटाचा रिमेक होता. नावावरूनच या सिनेमाची कथा आपल्या लक्षात येत असेल. जूही चावला आणि आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा टिपिकल बॉलिवूड चित्रपट आहे. या सिनेमात परेश रावल, कादर खान, दिलीप ताहिल, टीकू तलसानिया आदी अनेक दिग्गज कलाकार दिसले होते.

 

 

आमिर आणि जुही हे दोघे प्रेमासाठी घर सोडून जातात आणि गुंडांमध्ये अडकतात अशी या सिनेमाची कथा आहे.

आतंक ही आतंक :

दिग्दर्शक शंकर यांचा हा सिनेमा बऱ्यापैकी अमेरिकन सिनेमा ‘गॉडफादर’ वरून प्रेरित होता. या सिनेमात देखील जुही आणि आमिर यांची जोडी असलेला हा सिनेमा तीन वर्ष लटकला. जेव्हा सिनेमा शूट होऊन पूर्ण झाला तेव्हा डबिंगच्या वेळेस ओम पुरी आणि कबीर बेदी हे डबिंगला आले नाहीत.

 

 

अनेक संकटे पार करून जेव्हा हा सिनेमा तयार झाला आणि प्रदर्शित तेव्हा तेव्हा जोरदार आपटला.

हे ही वाचा – एका शब्दामुळे अर्थाचा अनर्थ झाल्याने बॉलिवूडची ही ६ गाणी सापडली वादाच्या भोवऱ्यात

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version