Site icon InMarathi

जेव्हा शरद पवारांनी १९९३ मधील १३ वा बॉम्बस्फोट शोधून काढला…!!

sharad pawar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१२ मार्च १९९३, अवघ्या मुंबईला हादरवून सोडणारा काळा दिवस ठरला होता. फिशरमन्स कॉलनी माहीम, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, कथा बाजार, एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू, हॉटेल सी रॉक, सहारा एअरपोर्ट, Mumbai Stock Exchange, मस्जिद-मांडवी कॉर्पोरेशन बँक, पासपोर्ट ऑफिस अशा महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बब्लास्टमुळे, मुंबई हादरली.

 

 

जवळपास २५० ते ३०० लोकांनी या आतंकवादी हल्ल्यात त्यांचे प्राण गमावले. ७०० जण यात जखमी झाले. काही माध्यमांनी तर जखमींचा आकडा जवळपास १४०० असल्याचं सुद्धा म्हटलं होतं.

हा हल्ला मुंबईसाठी फार मोठा धक्का ठरला. हल्ल्याच्या आदल्याच दिवशी सगळ्या पोलीस इन्स्पेक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक मीटिंग घेतली होती.

 

 

या पार्श्वभूमीवर हा हल्ला अधिकच धक्कादायक आणि गंभीर ठरला होता. पण, याहूनही अधिक गंभीर बाब हल्ल्यानंतर घडली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या बॉम्बहल्ल्यांनंतर १३ जागांवर बॉम्बब्लास्ट झाले असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात केवळ १२ ठिकाणी हे बॉम्ब हल्ले झाल्याचं त्यानंतर समोर आलं. 

शरद पवार यांनी खोटं का सांगितलं?

१२ ठिकाणी बॉम्बहल्ले झालेले असताना, प्रत्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री मात्र खोटं का सांगतो, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. याचं कारणही तसंच होतं. मुंबईतील १२ महत्त्वाच्या ठिकाणी झालेले हे हल्ले मुख्यत्वे हिंदूबहुल भागात झाले होते.

हे कळल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. कुठलीही सामाजिक तेढ निर्माण होऊ नये आणि विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं जातंय अशी भावना निर्माण होऊन, समाजात आणखी अशांतता पसरू नये हा त्यांचा उद्देश होता.

===

हे ही वाचा – हे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच!

===

म्हणूनच त्यांनी दूरदर्शनवर १३ ठिकाणी बॉम्ब हल्ले झाल्याचं जाहीर केलं. या १३ व्या बॉम्ब हल्ल्याचं ठिकाण त्यावेळी मस्जिद बंदर असं सांगण्यात आलं होतं. हा मुंबईमधील मुस्लिम लोकवस्ती अधिक असलेला भाग आहे.

 

 

रस्त्यांवर स्कूटर, कार आणि हॉटेलमध्ये सुटकेसचा वापर करून बॉम्ब लावण्यात आले होते. हा मुंबईवर झालेला सर्वाधिक योजनाबद्ध पद्धतीने पार पडलेला हल्ला मानला जातो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version