Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा : स्वतःसाठी जगताना थोडे दुसऱ्यांसाठी देखील जागा!!!

bodh inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज जग खूप जोरात पळत आहे कोणाला थांबण्यासाठी वेळ नसतो, अगदी आपल्या घरातील व्यक्ती जरी अडचणीत असली तरी सुद्धा आपल्याकडे कधी कधी वेळ नसतो. कारण आज धावपळीच्या जगात जो थांबला तो संपला असे म्हंटले जाते. 

आपल्याकडे आज स्वतःसाठी जगायला वेळ कमी पडतो तिथे दुसऱ्यासाठी कुठून वेळ मिळणार? त्यातून ही अगदीच वेळ मिळाला तरी आपण तो आराम करण्यात नाहीतर इतर शुल्लक कारणांनी तो वेळ फुकट घालवतो .

 

 

स्वतःसाठी जगताना थोडे दुसऱ्यांसाठी देखील जगात चला असेआपल्याकडे अनेकजण म्हणत असतात. ऐकताना सगळेच ऐकतात पण प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे फारच कमी लोक आहेत . आज डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी यांसारखे दिग्गज आज आपल्या समाजात आहेत, याचा आपल्याला अभिमान हवा.

 

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : निरोगी आयुष्य सहज जगता येतं, हे पटवून देणारी गोष्ट!

खरं तर जो इतरांसाठी जगतो त्याला खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो. मनुष्यप्राणी हा जगातील सर्वात जास्त स्वार्थी असतो, असे म्हंटले जाते. अगदीच चुकीचे म्हणणे नाही. प्राणीदेखील त्यांना जितके शक्य होईल तितके निसर्गासाठी करत असतात. 

माणसंच हे असे वागण तर एकीकडे दोन ढगांमध्ये सुद्धा असाच काही काहीसा वाद रंगला होता. झालं असं की आभाळातून एक काळा ढग खाली जमिनीकडे सरकत होता तर एकीकडे पांढर ढग अजून उंचीवर चालला होता.

 

 

जशी दोन ओळखीची माणसे भेटली की गप्पा गोष्टी होतात तसेच ते दोघे सुद्धा भेटले व त्यांच्यात गप्पागोष्टी सुरु झाल्या. दोघे समोरासमोर आल्यावर पहिले पांढऱ्या ढगानेच बोलायला सुरवात केली  “काय रे कुठे चाललास?’ त्यावर काळा ढग म्हणाला ” खाली जमिनीवर खूपच दुष्काळ पडलेला दिसतोय, पाण्याची कमतरता जाणवत असेल लोकांना म्हणून माझ्याकडे जे पाणी आहे  ते खाली पावसाच्या रूपाने पाडतो.

हे ऐकल्यावर पांढरा ढग कुत्सितपणे हसला व त्याला म्हणाला ” अरे वेड्या तुला कळत कस नाही? तुझ्याकडचे पाणी हे तो पर्यंतच तू जिवंत राहणार एकदा पाणी संपले की तुझे अस्तित्व सुद्धा संपणार. जो पर्यंत जिवंत आहेस तो पर्यंत फक्त स्वतःचाच विचार कर. लोक त्यांचे ते बघून घेतील. मी आता थेट स्वर्गात चाललोय तिकडे एक जागा रिकामी आहे”, असे मला कळलंय.

 

 

पांढऱ्या ढगाला घाई इतकी होती कधी एकदा स्वर्गातील जागा पटकावतो आहे असे झाले होते. तर एकीकडे काळा ढग खाली उतरला व त्याने संपूर्ण परिसर क्षणार्धात हिरवागार करून टाकला, जिथे पाण्याची कमतरता होती तिथे पाऊस पडून लोकांना पाण्याची सोय करून दिली. बळीराजाला खुश केले, माणसाप्रमाणे इतर सजीवसृष्टी पाण्यावाचून तहानेने व्याकुळ झालेली होती ती सुद्धा खुश झाली.

पांढरा ढग वरून काळ्या ढंगाची अस्तित्व संपताना बघत होता व आपले आयुष्य  कसे सुखाचे होणार या खुशीतच तो चालला होता. स्वर्गाच्या दरवाज्यापर्यंत तो पोहचला व त्याने स्वर्गाचे दार ठोठावले. एका देवदूताने दार उघडले व तो ढगाला  म्हणाला,

“काय काम आहे ?”, त्यावर लगेच ढग त्याला म्हणाला ‘स्वर्गात एक जागा रिकामी आहे असे मला कळलं आहे, त्यासाठी मी आलो आहे.’

त्यावर तो देवदूत लगेच म्हणाल ‘ ती जागा आत शिल्लक नाही’. एवढे म्हणत तो दारं लावू लागला त्यावर ढग कळवळीने त्याला म्हणाला ‘असे करू नका मला घ्या कृपा करून’, त्यावर देवदूत दरवाजा लावतच म्हणाला ‘ ज्याने संपूर्ण सजीवसृष्टीचा स्वर्ग बनवला अशाच त्या काळ्या ढगाला स्वर्गात आता  जागा आहे आणि हे सर्व देवांनीच ठरवले आहे. त्यामुळे तुला जागा नाही.’ 

 

 

एकूणच गोष्टीतून तात्पर्य हेच की स्वतःसाठी जगताना  इतरांचा ही विचार करा, गरजू लोकांना मदत करा, समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना मदतीच्या हातांची गरज आहे. आणि फक्त गरजवंत आहेत म्हणून मदत करू नका तर ते तुमचे कर्तव्य आहे असे समजून करा. कारण शेवटी आपण सगळे एकाच समाजाचे घटक आहोत आणि आपण प्रत्येकाने सामाजिक भान जपलेच पाहिजे.

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : संपत्ती, समाधानाचं रहस्य सांगणारी गोष्ट!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version