' ५० वर्षांनंतरही “आनंद मरा नहीं है!”- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा – InMarathi

५० वर्षांनंतरही “आनंद मरा नहीं है!”- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय सिनेसृष्टीला १०० पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षांमध्ये या इंडस्ट्रीला अनेक अविस्मरणीय चित्रपटांनी समृद्ध केले. असे अनेक सिनेमे आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि त्यांच्या मनात कायमस्वरूपी नाव कोरले. या सिनेमांच्या यादीतील एक महत्वाचे नाव म्हणजे ‘आनंद’ हा सिनेमा.

राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सुमिता सनयाल, रमेश देव, ललिता पवार आदी कलाकारांच्या भूमिकांनी सजलेला हा सिनेमा म्हणजे बॉलिवूडला लाभलेले कोंदण आहे.

आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहे. या गोल्डन जुबलीच्या निमित्ताने जाणून घेऊया या सिनेमाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी.

 

anand inmarathi

 

आपल्या भारतीय प्रेक्षकांसाठी किंबहुना जगातील सर्वच प्रेक्षकांसाठी काही चित्रपट हे मनोरंजांसोबतच ज्ञान, माहिती, शिकवण मिळवण्याचे एक उत्तम साधन आहे. बॉलिवूडचे मोठे सौभाग्य आहे की असे सिनेमे तयार करणारे उत्कृष्ट दिग्दर्शक या क्षेत्राला लाभले. या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे ऋषिकेश मुखर्जी.

ऋषिकेश दा यांनी अनेक अजरामर आणि पठडीबाहेरील सिनेमांनी रसिकांचे मनोरंजन केले. त्यांच्या ‘आनंद’ या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले.

‘आनंद’ हा सिनेमा १२ मार्च १९७१ ला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने त्याकाळी २ कोटी रुपयांचा बिजनेस करत लोकप्रियतेचे आणि कमाईचे शिखर गाठले.

या सिनेमासोबतच सिनेमाची गाणी आणि संवाद देखील तुफान गाजले. पूर्वी चित्रपटाच्या गाण्यांसाठी कॅसेट्स यायच्या, मात्र या सिनेमाच्या संवादांची देखील कॅसेट्स निघाल्या होत्या.

 

anand 2 inmarathi

 

इतके सुंदर आणि अर्थपूर्ण संवाद या सिनेमातून सर्वाना ऐकायला मिळाले. या सिनेमासाठी जेष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुलजार साहेबांनी संवाद लेखन केले होते.

आज हा सिनेमा बघताना आपण ‘आनंद’ या मुख्य भूमिकेसाठी राजेश खन्ना यांच्या व्यतिरिक्त कोणाचीच कल्पना करू शकत नाही. मात्र जेव्हा हा सिनेमा लिहून पूर्ण झाला तेव्हा ऋषिकेश दा यांची पहिली पसंती राजेश खन्ना नव्हते.

त्यांना या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी किशोर कुमार यांना सर्वात आधी विचारणा झाली. मात्र काही कारणास्तव तिथे गोष्टी जमून आल्या नाही. पुढे मेहमूद यांना या भूमिकेसाठी विचारणा झाली, पण इथेही काही सूत जमले नाही.

पुढे हा सिनेमा राज कपूर आणि शशी कपूर यांना सुद्धा ऑफर झाला होता, मात्र इथेही काही झाले नाही. अखेर ऋषिकेश दा यांनी राजेश खन्ना यांना घेऊन हा सिनेमा केला, आणि राजेश खन्ना यांना या सिनेमाने एक नवीन ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली.

 

rajesh khanna inmarathi

हे ही वाचा – बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

या सिनेमात राजेश खन्ना यांनी एका दुःखातही सुख शोधणाऱ्या आणि सतत आनंदी असणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या जीवनातही आनंद देणाऱ्या रुग्णाची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन यांनी बाबू मोशाय म्हणजेच राजेश खन्ना यांच्या डॉक्टरची आणि मित्राची भास्करची भूमिका साकारली होती.

चित्रपटाची कथा, अभिनय, गाणी, संगीत या सर्वांसोबतच या सिनेमाचे संवादही खूप गाजले. आजही अगदी काल ऐकल्यासारखे या सिनेमाचे संवाद सर्वांच्या तोंडात रेंगाळतात. या सिनेमांच्या संवादांनी खऱ्या अर्थाने आयुष्याचा अर्थ समजून सांगितला. त्याकाळी तर प्रत्येकांच्या तोंडी फक्त आणि फक्त या सिनेमाचेच संवाद असायचे.

गुलजार यांच्या लेखणीतून तयार झालेल्या या संवादांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. गुलजार यांनी संवादांसोबतच ‘मैने तेरे लिये’ आणि ‘ना जिया लागेना’ ही दोन गाणी देखील लिहिली होती.

या सिनेमातील काही लोकप्रिय संवाद.

‘बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपरवाले के हाथ है, जहांपनाह उससे न तो आप बदल सकते हैं न मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपरवाले की अंगुलियों में बंधी हैं, कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है.’

 

rajesh khanna anand inmarathi

 

‘बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं.’

‘मौत तो एक पल है…’

‘यह भी तो नहीं कह सकता कि मेरी उम्र तुझे लग जाए !’

‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं’

‘जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया साला मैं ही नहीं.’

‘आज तक तुम बोलते आए और मैं सुनता आया, आज मैं बोलूंगा और तुम सुनोगे.’

हा सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवसापर्यंत अमिताभ यांना कोणी ओळखत नव्हते. यासंदर्भातली माहिती दोन वर्षांपूर्वी खूप व्हायरल झाली होती. अमिताभ हे ‘आनंद’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना कोणीच ओळखले नाही. मात्र संध्याकाळी पुन्हा अमिताभ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले तेव्हा सर्वानी त्यांना बाबू मोशाय म्हणून ओळखले आणि त्यांच्या भोवती लोकांचा गराडा तयार झाला होता. अमिताभ यांनी स्वतः हा किस्सा घडल्याचे सांगितले होते.

 

हा सिनेमा खूपच यशस्वी झाला. या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्यात राष्ट्रीय पुरकरांचा देखील समावेश होता. सोबतच सहा फिल्मफेयर पुरस्कार देखील या सिनेमाने मिळवले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?