Site icon InMarathi

‘गृहिणी बनून संसार करेल’ असं हिणवलं गेलं, पण ती आज आहे १२०० कोटींची मालकीण!

devita saraf vu televisions inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही दिवसांपूर्वीच जागतिक महिलादिन साजरा केला गेला. या एक दिवसीय उत्सवाचं उद्दिष्ट नक्की काय आहे, हे किती जणांना ठाऊक आहे? सोशल मीडियावर हे असे काही दिवस असले, की पोस्ट आणि टिप्पण्यांचा पुरंच येतो.

सोशल मीडियावर महिलांना प्रोत्साहन देताना खूप जण दिसतात. मात्र, तेच खऱ्या आयुष्यात, त्या विचारांचे किती पालन आणि समर्थन करतात यावर अजूनही एक मोठं प्रश्नचिन्हच आहे.

आजही महिलांना शिक्षण, ब्युटी पार्लर, शिवणकाम, मेस किंवा खाणावळ आणि गृहिणी ह्या पारंपरिक आणि ठराविक करियरच्या पर्यायांच्याच चौकटीआड ठेवलं जातं. समजत अजूनही ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.

 

 

एक यशस्वी व्यावसायिक, बिजनेस वूमन, CEO या अशा कठीण क्षेत्रांत महिला शिरल्या, की त्यांना त्यांच्या मतांना आजही प्राधान्य आणि महत्त्व दिलं जात नाही. त्या कोणत्याही हुद्द्यावर असल्या तरी, समोरच्याने त्यांचं मत, संकल्पना नुसती ऐकावी यासाठी सुद्धा त्यात खरंच काहीतरी लक्ष देण्यासारखं आहे, हे त्यांना सिद्ध करावं लागतं.

यातूनही काही कर्तृत्ववान महिला आपला मार्ग स्वतः तयार करतायत. सिनेसृष्टी असो की बिझनेस इंडस्ट्री, आज सगळ्या क्षेत्रांत महिलांचा शिरकाव झाला आहे. त्यांचा प्रवास मात्र पुरुषांपेक्षा कितीतरी खडतर असतो. आज आपण याचंच एक उदाहरण पाहणार आहोत.

‘लहरो से डरकर नौका पार नही होती, और कोशिश करने वालों कि कभी हार नही होती’चं एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ‘व्यु टीव्ही (VU tv) च्या’ ceo “देवीता सराफ”!

त्यांनी आपल्या स्वप्नांतून आणि प्रयत्नांतून व्यु टीव्ही या टीव्हीचे उत्पादन करणाऱ्या, मल्टिनॅशनल कंपनीला जन्म देऊन तिचा त्या जगभर विस्तार सुरु केला आहे.

 

 

देवीता सराफ ह्या भारतीय बाजारपेठेतील कम्प्युटर जायंट असलेल्या, झेनिथ कंप्युटर्सह्या कंपनीचे “राजकुमार सराफ” ह्यांच्या सुपुत्री आहेत. इतक्या मोठ्या ख्यातनाम व्यक्तीची मुलगी असूनही देवीताला आपला व्यवसाय सुरु करून त्यात स्थैर्य आणायला बरेच कष्ट घ्यावे लागले.

===

हे ही वाचा – पोळी-भाजीचा डबा विकून महिला कमावतेय लाखो रुपये!! वाचा ही अनोखी कल्पना…

===

देवीता मुंबईतून आपलं शालेय शिक्षण संपादन करत असताना आपल्या वडिलांच्या कंपनीत दर उन्हाळ्यात, प्रत्येक छोट्या मोठ्या बैठकीला स्वतः प्रामुख्याने हजर असत. त्यांच्यातल्या व्यावसायिकाला योग्य वाव मिळावा या हेतूने त्यांचे वडीलही त्यांना आणि त्यांच्या भावाला प्रत्येक मिटिंगमध्ये आपल्या सोबत उपस्थित राहण्याचा आग्रह धरत असत.

पुढे ग्रॅज्युएशनसाठी त्या अमेरिकेला गेल्या. साऊथ कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून त्यांनी बॅचलर इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्राप्त केली.

2003 साली त्या जेव्हा भारतात परतल्या तेव्हा भारताची आणि जागतिक बाजारपेठ किती बदलली आहे याची त्यांना जाणीव झाली. हा तोच काळ आहे जेव्हा भारतात “टेक्निलॉजी बूम” व्हायला सुरुवात झाली होती.

त्यांनी परतल्यावर लगेच भारतीय बाजारपेठेचा अभ्यास केला आणि एक बिझनेस प्लॅन आपल्या वडीलांपुढे ठेवला. देवीताच्या म्हणण्यानुसार, नवीन पिढी ही अंथरूण पाहून पाय पसरणाऱ्यातली नसून, पाय पसरुन आपल्या मापाचं अंथरूण शिवून घेणारी आहे.’

 

 

त्यांनी आपल्या वाडीलांपुढे जो प्लॅन ठेवला होता त्यानुसार त्यांना high technology चा वापर करायचा होता. त्यांना स्वतःची उत्पादनाची रेंज फक्त कम्प्युटरपुरती मर्यादित न ठेवता, घरी लागणारी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की टीव्ही, बलुटुथ स्पीकर, इत्यादी इतकी रुंदावण्याची गरज वाटत होती.

त्यांच्या वडिलांना तो प्रस्ताव काही तितकासा पटला नाही. पण न डगमगता देवीता यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी, आपली LED tv उत्पादनाची कंपनी सुरु केली. स्वतःला कंपनीच्या कामात पूर्णपणे झोकून दिलं होतं.

हा काळ जीनेथ कंपनीसाठी फार काही बरा नव्हता, कारण याच वेळेस देवीता सकट त्यांचे वडील व भाऊ यांना sebi द्वारे नियमांचे उल्लंघन करण्याच्या आरोपात अडकवलं जात होतं.

देवीता यांनी त्यांचं लक्ष पूर्णपणे कंपनीवर लक्ष केंद्रित करून या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्याचा पर्याय निवडला. VU ही कंपनी अमेरिकेत रजिस्टर करून त्यांनी TV पासून आपल्या कंपनीचे काम सुरु केले.

 

 

===

हे ही वाचा – ३ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आयुष्याशी लढणाऱ्या आधुनिक ‘झाशीच्या राणी’ची गोष्ट!

===

सुरुवातीला ‘तुमच्या मालकीण मारवाडी आहेत, एका व्यावसायिकाच्या सुपुत्री आहेत, फक्त मन रमावं म्हणून त्यांनी ही कंपनी सुरु केली आहे. पुढ्या ४-५ वर्षात त्या लग्न करून आपल्या नवऱ्याच्याच घरी जाणार आहेत’ असं इतर डीलर आणि स्पर्धक कंपन्या त्यांच्या कामगारांना सांगत आणि व्यवसायात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत.

देवीताच्या जिद्दीपुढे असले कोणतेच तर्क टिकले नाहीत. प्रति वर्षी ३०-३५ करोडची उलाढाल असलेली कंपनी ६-७ वर्षात ५४० करोडच्या घरात गेली.

इथून पुढे कधीच मागे वळून बघायचं नाही, हे देविताने ठरवलं आणि आज आपल्या कष्टाच्या फळाच्या रुपात तिला जी प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळाली, ती देवीताची संपत्ती १२०० करोड रुपये इतकी आहे.

पारंपरिक व्यवसाय करून जितका खप होत नव्हता, तितका तो “E कॉमर्स” वरून व्यवसाय करून झाला. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, ईबे अशा अनेक ई कॉमर्स कंपन्यांबरोबर करार करून देवीताने तिचा व्यवसाय भारत तसेच अमेरिका, अरब देश अशा एकूण ६० देशांत नेला.

जी माणसं ती केवळ मुलगी आहे आणि मोठ्या उद्योजकाची मुलगी आहे म्हणून आवडीपोटी technology क्षेत्रात उतरली आहे असं म्हणत होती त्यांची मतं त्यांना अजिबात घाबरवू शकली नाहीत.

महिलांना चूल मूल आणि पारंपरिक व्यवसायांपलिकडे जी माणसं बघूच शकत नाही, त्यांनी देविता यांच्या वाटेत भरपूर अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले आहेत.

आज देवीताची कंपनी भारतातील ४ मोठ्या टीव्ही ब्रँड्सपैकी एक आहे. निव्वळ भारतातच तिचे १० लाखाहून अधिक ग्राहक असून ३० हजार लोकांना तिने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या यशाचं श्रेय देवीता आपले वडील “राजकुमार सराफ” यांना देते.

 

 

याच बरोबर FORBES सारख्या नामांकित मासिकाने ३० वर्षा खाली या वयोगटातील, स्वबळावर यशस्वी झालेल्या कर्तबगार तरुण व्यावसायिकांच्या यादीत देवीता सराफ यांचा समावेश केला होता.

जगातील अनेक ख्यातनाम व्यक्तींच्या पंक्तीत बसण्याचा सन्मान देवीताच्या वाट्याला आला आहे. नारीने ठरवलं, की तिला कोणीही हरवू शकत नाही ह्याची देवीता सराफ एक उत्तम उदाहरण आहे.

===

हे ही वाचा – ७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना ‘स्टायलिश’ बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version