आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सोशल मीडियाचा सुळसुळाट सध्या सगळीकडेच झालाय, प्रत्येक व्यक्ती स्वतःचं आयुष्य सोशल मीडियावर विकतोय. आपण कुठे जातो, काय करतो, कोणासोबत कुठे फिरायला जातो इथपासून सगळा इतिवृत्तांत बरेच लोकं सोशल फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेयर करत असतात.
या सगळ्याचे प्रचंड तोटे आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहेत, आपल्या मोबाइल डेटाची प्रायव्हसी या संदर्भात माहीत असलेले सगळे धोके पत्करून आपण सगळेच सोशल मीडिया अगदी सर्रासपणे वापरतो!
यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग म्हणजे युट्यूब! युट्यूब हे एकमेव मोफत प्लॅटफॉर्म आहे जिथे जगभरातला सगळा कंटेंट विनाशुल्क तुम्हाला बघता येतो ते केवळ एका जीमेल अकाऊंटच्या मदतीने!
आज युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून BYN, आशीष चंचलानी, बिबीकी वाईन्स, कॅरिमिनाती अशा कित्येक तरुणांनी त्यांची करियर घडवली. आज यापैकी कित्येक युट्यूबर यशाच्या उंच शिखरावर विराजमान आहेत.
शिवाय या कंटेंट बरोबरच जगभरातले इतर सिनेमे, गाणी, मुलाखती, प्रसिद्ध न्यूज चॅनल्स, educational videos, असा खजिना तुम्हाला युट्यूबवर अगदी मोफत बघायला उपलब्ध असतो!
याबरोबरच Prank Videos आणि तत्सम आंबट शौकीन व्हीडियोजचासुद्धा युट्यूबवर खूप भडिमार होताना तुम्हाला जाणवला असेल. मुंबई, पुणे, बेंगलोर अशा वेगवेगळ्या मेट्रो सिटीजच्या रस्त्यावर माइक घेऊन तरुण तरुणींना विचित्र प्रश्न विचारणं, त्यांना त्यांच्या लैंगिक गोष्टीविषयी विचारणा करणे असले अनेक व्हीडियोज तुमच्या पाहण्यात आले असतील!
याबरोबरच भर रस्त्यात कुणीतरी एक मुलगा लघवी करतोय आणि मागून येणाऱ्या मुली त्याच्याकडे बघून हसतायत असे विचित्र व्हीडियोसुद्धा सोशल मीडियावर तुम्हाला दिसले असतील!
सध्या या अशा मनोरंजनाच्या नावाखाली चालणारे हे अश्लील चाळे एका वेगळ्याच थराला जाऊन पोचले आहेत.
Youth Against Rape या ट्विटरवरच्या ऑफिशियल अकाऊंट वरून एक व्हीडियो शेयर केला गेला होता. या व्हीडियोमध्ये एक मुलगा एका मुलीवर सर्रासपणे लैंगिक अत्याचार करतोय आणि हा एक prank होता हे तिला थोड्या वेळाने कळते.
Guess what’s the new trend? Sexual abuse in the name of pranks! The easiest way to invade consent and earn money on YouTube, is by starting a prank channel! It’s the most viewed content by Indians! @NCWIndia @rsprasad @PrakashJavdekar @sharmarekha @DCP_CCC_Delhi #CensorPranks pic.twitter.com/55rTgRNf5d
— Youth Against Rape ® (@yaifoundations) March 10, 2021
हे असले आचरट चाळे करण्यात मुलीसुद्धा मागे नाहीत. मुली तर चक्क खुलेपणे मुलीच्याच मागे लागून तिच्याशी लघट करायचा प्रयत्न करतायत हे सगळं एकंदर या व्हीडियो मध्ये दिसून येत आहे!
पण हा सगळं प्रकार आत्ताच सुरू झालाय का तर नाही!
आज तुम्ही युट्यूबवर अशा प्रकारचे व्हीडियो सर्च कराल तर सहज तुम्हाला असे हजारो व्हीडियो आढळून येतील. ज्यात मुलगा मुलीला सार्वजनिक ठिकाणी तिच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावतोय, तिच्याशी शारीरिक संबंध बनवण्याची मागणी करतोय, आणि बऱ्याच वेळानंतर ही एक गमंत होती असं सांगून हे सगळं कॅमेरावर शूट होतंय हे दाखवतोय!
हे सगळं भयानक आहे, हे कुठेतरी थांबायलाच हवं या सगळ्यावर कारवाई करावी हे सगळं ठीक आहे पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की हे सगळे किळसवाणे प्रकार युट्यूबवर सर्रासपणे अपलोड केले जातात, त्याच्याद्वारे ही लोक पैसे कमावतात, आणि हे असले व्हीडियोज लोकं चवीने बघतात!
त्यामुळे हे व्हीडियो शूट करणाऱ्या लोकांवर आणि ते अपलोड करण्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे, तरंच या सगळ्याला कुठेतरी आळा बसेल.
सर्वप्रथम पाश्चात्य देशातल्या काही चॅनल्सनी हा प्रकार सुरू केला, पण आता भारतातल्या छोट्यातल्या छोट्यात शहरातसुद्धा असले आचरट चाळे राजरोसपणे होताना दिसत आहेत!
आज भारतात महिला सुरक्षेचा एवढा गहन प्रश्न आहे, रस्त्यावर होणारी छेडछाड पासून राज्यातले गंभीर बलात्कार हे सगळे प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे असताना सोशल मीडियावर असे व्हीडियो ट्रेंड होत असतील तर आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!
एकीकडे नेटफ्लिक्स, प्राइम सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सिरिजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या तसल्या दृश्यांवर आक्षेप घेणारे आपण युट्यूबवरच्या या अशा कंटेंटकडे का कानाडोळा करतो? याचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे!
===
- सोशल मीडियावरचे शॉर्ट व्हिडीओज आपल्यासमोर भयाण प्रश्नचिन्हं उभे करतायत!
- लाळघोट्या पुरुषांसमोर उभे ठाकण्यासाठी, मुलींना माहीत पाहिजेत या १३ टिप्स! वाचा
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.