Site icon InMarathi

त्याचं अभिनयाचं स्वप्न पूर्ण झालं असतं, तर एका चांगल्या गायकाला आपण मुकलो असतो

mohit chauhan guitar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मोहित चौहान बॉलिवूडच्या मोठ्या आणि प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. मोहितने अनेक सुंदर आणि लोकप्रिय गाणी हिंदी सिनेसृष्टीला दिली. आज मोहीत त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

११ मार्च १९५५ साली हिमाचल प्रदेशच्या सिरमौल जिल्ह्यात झाला. मोहितने त्याच्या गाण्यांनी आणि आवाजाने संपूर्ण जगभरात त्याचे फॅन्स तयार केले.

 

 

तसे पाहिले, तर हे पूर्ण सत्य नाही. कारण मोहीतला एक अभिनेता व्हायचे होते. एका मुलाखतीदरम्यान मोहितने सांगितले होते, की त्याला अभिनयात करियर करायचे होते. त्याला स्वतःला रंगभूमीवर अभिनय करताना बघायचे होते. तो योगायोगाने गायक आणि संगीतकार झाला.

मोहितने या मुलाखतीमध्ये म्हटले होते, की “मी रंगभूमीवर खूप काम केले. शिवाय मी काही काळ ‘एनएसडी’चा हिस्सा देखील होतो. माझ्या आयुष्यातील बराच काळ मी नाटकांमध्ये काम केले. मला ‘एफटीआईआई’मध्ये प्रवेश घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने अभिनय शिकायचा होता. मात्र जेव्हा मी तिथे चौकशी केली तेव्हा तिथे कोणताच अभिनयाचा कोर्स उपलब्ध नव्हता.”

 

 

मोहितने दिल्लीमध्ये त्याचा सिल्क रूट नावाचा एक बँड तयार केला होता. १९९६ साली या बँडचा पहिला ‘बुंद’ नावाचा अल्बम प्रदर्शित झाला. या अल्बममधील ‘डुबा डुबा’ नावाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले. त्यानंतर २००५ साली त्याने ‘पती पत्नी और वो’ सिनेमातील ‘गुंछा’ हे गाणे त्याने गायले.

२००६ हे साल मात्र त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्याचे नशीब बदलवणारे होते. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रंग दे बसंती’ सिनेमात त्याने ‘खून चला’ हे गाणे गायले होते. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे प्रचंड हिट झाले आणि मोहीतला एक नवीन ओळख मिळाली.

ए.आर.रहमान यांनी त्याला हे गाणे गाण्याची संधी दिली आणि त्याचे नशीब पालटले. त्यानंतर रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ या सिनेमातदेखील त्याने अनेक गाणी गायली.

 

 

‘रॉकस्टार’ सिनेमातील ‘जो भी मैं’ या गाण्यासाठी त्याला फिल्मफेयरचे सर्वोत्कृष्ट गायकाचे पारितोषिक देखील मिळाले. मोहितने त्याच्या करियरमध्ये बहुतकरून रोमँटिक गाण्यांना त्याचा आवाज दिला आहे.

अशा चुकून घडलेल्या, पण उत्तम गाणाऱ्या, अप्रतिम गायकाचा आज वाढदिवस… मोहित चौहानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

 

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version