Site icon InMarathi

जॉन सिना आणि अंडरटेकरचा शो म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या WWE बद्दल आश्चर्यकारक गोष्टी!

wwe-InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

डब्ल्यूडब्ल्यूई माहित नाही असा एकही व्यक्ती या काळात सापडणे कठीण! आपल्याकडे डब्ल्यूडब्ल्यूई प्रसिद्ध होण्यामागचं तसं काही स्पेशल कारण आहे असही नाही. जसं क्रिकेटसाठी आपण कसे वेडे आहोत तसे डब्ल्यूडब्ल्यूई साठी कोणी वेडं असल्याचं दिसत नाही.

पण संपूर्ण जगात जॉन सिना आणि अंडरटेकर या दोन रेसलर्सनी स्वत:च्या प्रसिद्धीसोबत डब्ल्यूडब्ल्यूईला प्रसिद्धी मिळवून दिली, तेव्हाच भारतात देखील या दोन रेसलर्समुळे डब्ल्यूडब्ल्यूईचा चाहता वर्ग निर्माण होऊ लागला.

 

 

पहिलं या दोघांना भारतातील तरुण वर्गावर आपलं गारुड केलं आणि त्यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईने त्यांच्या मागोमाग संपूर्ण भारतावर गारुड केलं. आजच्या नवीन पिढीमधील कोणालाही डब्ल्यूडब्ल्यूई बद्दल विचारा, तुम्हाला जॉन सिना आणि अंडरटेकरच्या पलीकडील उत्तर मिळतील.

एवढे या डब्ल्यूडब्ल्यूईने भारतात पाय पसरले आहेत. चला तर जाणून घेऊया अश्या या जगातील सर्वात प्रसिद्ध एन्टरटेन्मेन्ट शो डब्ल्यूडब्ल्यूई बद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी, ज्या अर्थातच तुम्हाला माहित नसतील.

१९६३ मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आलेल्या WWE World Heavyweight Championship बेल्टचे आजवर ८ वेळा नाव बदलण्यात आले आहे. सर्वप्रथम म्हणजे १९६३-१९७१ या काळात या बेल्टचे नाव होते- WWWF World Heavyweight Championship

 

 

डब्ल्यूडब्ल्यूई सुरु झाल्यापासून आजवर एकूण १२० WWE World Heavyweight Champions डब्ल्यूडब्ल्यूईला लाभले आहेत. RAW आणि SMACKDOWN या दोन शोजमध्ये दोन वेगवेगळे WWE World Champions आहेत. WRESTLEMANIA 2017 मध्ये RAW मध्ये ब्रॉक लेस्नर विजयी झाला तर SMACKDOWN मध्ये रेन्डी ओर्टनने बाजी मारली.

 

 

ब्रुनो सॅममार्टिनो यांच्या नावावर सर्वात जास्त काळ Championship चा बेल्ट स्वत:जवळ ठेवण्याचा विक्रम आहे. त्यांनी २ वेळा Championship बेल्ट जिंकला आणि तो तब्बल ४,०४० दिवस त्यांच्याकडे होता. शेवटी इव्हान कॉलोफ याने त्यांना हरवले. जेव्हा ब्रुनो सॅममार्टिनो हरले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना चक्क अश्रू अनावर झाले होते.

 

Wrestlemania III या इव्हेंटला आजवर सर्वात जास्त लोकांना उपस्थिती लावली होती. २९ मार्च १९८७ रोजी पोन्टीअॅक मिशिगन येथे पार पडलेल्या या इव्हेंटला एकूण ९३,१७३ लोक उपस्थिती होते.

 

 

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की माईक टायसन D-Generation X या गाजलेल्या डब्ल्यूडब्ल्यूई ग्रुपचे मेंबर राहिलेले आहेत.

 

 

गेल्या १० वर्षांतील सर्वात प्रसिद्ध रेसलर सी.एम. पंक याने डब्ल्यूडब्ल्यूईला राम राम केल्यानंतर Marvel Comics and Vertigo Comics (DC Imprint) साठी लेखक म्हणून काम केले आहे. काय? ऐकून दचकलात ना?

 

 

Make-A-Wish Foundation हि संस्था जगातील लोकांच्या इच्छा पूर्ण करते. या संस्थेमार्फत सर्वाधिक लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा मान जॉन सीनाच्या नावावर आहे. त्याने एकट्याने स्वत:च्या खर्चाने लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत.

 

 

सर्वांचा लाडका अंडरटेकर याने कारकीर्दीमध्ये एकूण सहा वेगवेगळी नावे वापरली. WRESTLEMANIA 2017 मध्ये रोमन रींग्ज कडून हरल्यावर त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.

 

 

सगळ्यात आणि शेवटची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूई हे अर्ध खरं आणि अर्ध खोटं आहे. म्हणजे हा संपूर्ण शो स्क्रिप्टेड असतो. अर्थात या शो मध्ये खोट्या खोट्या मॅचेस खेळल्या जातात. कोण हरणार कोण जिंकणार हे आधीच ठरलेलं असतं.

पण तरीही हे रेसलर्स ज्या मुव्ह्ज करतात त्यामध्ये संपूर्ण १००% खऱ्या असतात. त्यासाठी त्यांनी कित्येक वर्षे मेहनत घेतलेली असते.

 

 

अशी आहे हि रांगड्या एन्टरटेनरची दुनिया!!

हे देखील वाचा: (मृत्युनंतरही त्याची चर्चा थांबत नाही! – ख्रिस बेनवॉ ची शोकांतिका)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version