जाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – नितीन माळी
===
दरवर्षी जसजसा एप्रिल-मे जवळ येतो तेव्हा उन्हाळा जरा जास्तीच आहे असं सगळ्यांनाच वाटतं. हिवाळ्यात हवा हवा असणारा सूर्य मात्र उन्हाळ्यात नको नको वाटतो, आमच्या काही फेसबुक मित्रांनी उन्हाळाच रद्द व्हावा अशीही गमतीने मागणी केली होती.
अभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे. मला जाम आकर्षण आहे त्याचं. सर्वांनाच माहित आहे सूर्य आहे म्हणून तर पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे.
या उन्हाची एक गम्मत सांगतो.
आज ह्या क्षणाला जो उन्हाचा चटका लागतोय, जो प्रकाश, उष्णता आपल्याला मिळतेय त्याची उत्पत्ती ही लाखो वर्षांपूर्वी झालेली असते…!
सूर्याच्या मध्य केंद्रभागेत निर्माण होणारी ऊर्जा ‘प्रकाश आणि उष्मा ‘ याच्या रूपाने बाहेर पडते (याला फोटॉन म्हणतात). सूर्य एवढा मोठा आहे की ही ऊर्जा बाहेर पृष्ठभागावर यायला तब्बल 1 लाख 70 हजार एवढे वर्षे लागतात.
सूर्याच्या विशालतेची अजून एक गोष्ट सांगतो –
आपण मानवाने आतापर्यंत ऊर्जेसाठी जो मोठा प्रकल्प बांधलाय त्यातून आपण फक्त 22 हजार 500 मेगावॉट ऊर्जा निर्मिती करू शकतोय.
सूर्याची ऊर्जा किती आहे माहीत आहे का? 38 हजार करोड मेगावॉट. तेही प्रति सेकंदाला सूर्य निर्माण करतो.य म्हणजे सूर्य किती विशाल ऊर्जा निर्माण करतो ते पहा.
आणि सर्वात महत्वाचं – आपल्याला हे सर्व फुकट देतोय सूर्य.
पण हा सूर्य खूप काळ असाचं ऊर्जा देत राहील का? सूर्य काय आहे, कसा आहे? त्याचे आयुष्य किती आहे? हे देखील आपण पाहू.
शास्त्रज्ञ असं सांगतात की सूर्याचा जन्म 4.5 अरब वर्षांपूर्वी झालाय. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम यापासून बनलेला मोठा गोळा आहे. याचे बाह्य आवरण हे हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून बनलेलं आहे.
सूर्याचं मध्यकेंद्रिय (core) तापमान 1 करोड 56 लाख ℃ आहे आणि बाह्य आवरणाचे तापमान 6000℃ आहे .
शास्त्रज्ञ काही वर्षांपूर्वी असं मानत होते की, सूर्य सामान्य इंधना सारखं जळत राहतोय. पण मग त्यांना एक प्रश्न पडायचा की हे असं असेल तर इंधन संपत का नाही? 1920 मध्ये ह्यावर अजून अभ्यास केल्यावर त्यांना कळालं की ही एक Nuclear Fusion प्रोसेस आहे.
या nuclear fusion वर सध्या जोरात काम चालू आहे. हे काम यशस्वी झालं की मानव जातीला कधी न संपणार्या इंधनाचा स्रोत मिळेल. सध्या युरोप, चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि भारत हे संयुक्तिकपणे यावर काम करत आहेत.
(ही तीच प्रोसेस आहे ज्याच्या आधारे हायड्रोजन बॉम्बचं काम चालतं).
सूर्याच्या मध्यभागी हायड्रोजन कण प्रचंड दबावाखाली असतात. या कणांची एकमेकांशी टक्कर होऊन हेलियम जन्माला येते. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 6570 लाख टन हायड्रोजनचं 6530 लाख टन हेलियम मध्ये रूपांतर होतं.
या प्रोसेसमध्ये जवळ पास 40 लाख टन हायड्रोजनचं रूपांतर होतच नाही. त्याचं रूपांतर ऊर्जेत होतं.
हीच ऊर्जा अवकाशात चारीबाजूला पसरली जाते.
संशोधक असं सांगतात की,
ही सूर्याची प्रोसेस अजून 5 अरब वर्ष चालेल. त्यानंतर सुर्यामधील हायड्रोजन समाप्त होईल.
“त्यामुळे कोअर तापमान प्रचंड वाढेल. यामुळे सूर्याचा आकार आहे या पेक्षा 100 पटीने वाढेल (याला red giant म्हणतात) असं झालं तर सूर्य सर्व प्रथम बुध आणि शुक्र या ग्रहांना खाऊन टाकेल आणि मग त्यानंतर आपली पृथ्वीसुद्धा.”
“पण – तो पर्यंत आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीचा विनाश झालेला असेल.”
“तिथून पुढे हजारो वर्षे सूर्यात फक्त हेलियम शिल्लक राहिलेलं असेल. मग ते हेलियम कार्बनमध्ये रूपांतरित होईल, त्यामुळे सूर्याचा आकार अजून वाढेल.”
हे होत असताना त्याच्या बाह्य आवरणाचे तुकडे पडायला सुरुवात होऊन तो शेवटी पृथ्वी एवढा गोळा शिल्लक राहील. आता त्याची ऊर्जा एवढी असेल की ती मोजणे शक्य नसेल. सूर्य फक्त “पांढरा तारा” म्हणून शिल्लक राहिल.
“त्याचे तापमान असेच वाढत राहून पुढे तो जळून जळून कोळश्यासारखा होईल.”
आणि अश्या प्रकारे सूर्याचा अंत होईल.
अर्थात हे लगेच होणार नाही. हे पाहायला आपण जिवंत ही नसू.
आधी म्हटल्या प्रमाणे – हे व्हायला 5 अरब वर्ष लागतील.
सुर्यासारख्या कित्येक ताऱ्यांचा अंत झाला आहे आणि नव्याने जन्म ही झाला आहे. अवकाशात ही आरंभ आणि अंताची क्रिया अशीच अविरतपणे चालू रहाणार आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.