Site icon InMarathi

गोड गायिका मैथिली संजय राऊतांना भेटली आणि…

sanjay raut maithili thakur inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. त्यांच्या बोलण्यामुळे सध्या ते बऱ्याचदा चर्चेत असतात. अगदी त्यांच्या मातांना दुजोरा देण्यापासून, ते सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी बऱ्याचदा घडत असतात.

विशेषतः सोशल मीडियावर संजय राऊत या नावाचा उल्लेख बऱ्याचदा केलेला आढळतो. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर नजर ठेऊन असणारे ट्रोलर्स त्यांना सोशल मीडियावर टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

यावेळी मात्र त्यांच्या बोलण्यावरून नाही, तर केवळ त्यांच्या उपस्थितीवरून त्यांना टार्गेट केलं जातंय. घडलंय फक्त एवढंच, की गोड गायिका मैथिली ठाकूर हिने संजय राऊतांची भेट घेतली आणि तो फोटो ट्विट केला.

 

 

आता यावर शांत बसतील, तर ते ट्विटरकर कसले? मैथिलीने संजय राऊत यांना भेटावं की नाही, हा तिचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, हे विसरून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला.

यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी…

 

 

संजय राऊत यांची भेट घेणं म्हणजे काही फार मोठी कर्तबगारीची गोष्ट नाही, असे खडे बोलत सुनावलेत की राव! ही मैथिलीची एक चूक आहे असं म्हणताना, अनामिकाजी ‘संजय राऊत नॉटी मॅन आहेत, हे तू विसरलीस का?’ असा प्रश्न करायलाही विसरल्या नाहीत.

एवढंच नाही, तर या भेटीमुळे सुशांत सिंगची सुद्धा आठवण ट्विटरकरांनी काढली आहे. बघा बरं हा ट्विटरवीर काय म्हणतोय?

 

 

बिहारच्या मैथिलीने संजय राऊतांना भेटणं चुकीचं आहे, असं लक्ष्मण आनंद यांनी मत मांडलंय. सुशांत केसमध्ये मोठी भूमिका असलेल्या संजयजींना भेटणं, म्हणजे स्वतःचे subscriber वाढवण्यासाठी केलेला स्टंट असल्याचा आरोप सुद्धा यांनी केलाय.

बॉलीवूडमधील गाणी गाणार नाही, असा निर्णय मागे एकदा याच मैथिलीने जाहीर केला होता, हे तुम्हाला आठवत असेलच. तोदेखील केवळ हाच नाही, तर तोदेखील एक पब्लिसिटी स्टंट होता, असंही एक ट्विटरकर म्हणतोय.

 

 

===

हे ही वाचा – “हिंदू धर्मविरोधी बॉलिवूडसाठी मी गाणी म्हणणार नाही!” : गुणी गायिकेची अशीही कथा..!

===

तिच्याकडे उत्तम टॅलेंट आहे, असं म्हणणाऱ्या या ट्विटरकराचं काय म्हणणं आहे, तेसुद्धा बघा.

 

 

राजकारण आणि बॉलीवूड यांच्यापासून दूर असलेल्या मैथिलीसारख्या उत्तम टॅलेंटची भारताला गरज आहे. म्हणून मैथिलीने या सगळ्यांपासून लांब राहावं आणि आदर आणि चाहत्यांची संख्या कमी होऊ देऊ नये, अशी विनंतीच या चाहत्याने केलेली दिसतेय.

महिला मंडळ कुठल्याही गोष्टीवर चर्चासत्र घडवून आणू शकतं, यात शंकाच नाही. बघा बरं या महिलांची काय चर्चा सुरु आहे, मैथिली आणि संजय यांच्या भेटीवरून!

 

 

प्रसिद्धी हाताळणं मैथिलीला जमत नाहीये, मलाला आणि ग्रेटा सारखीच हिची सुद्धा अवस्था होणार असं भाकीत ज्योती यांनी केलंय. उत्तरादाखल असं काही घडू नये अशीच अपेक्षा असं म्हणणाऱ्या मोनिका, तिची बाजू घेताना दिसतायत. या भेटीचा आग्रह तिला नाकारता आला नसेल, असंही असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे.

===

हे ही वाचा – आणि ट्विटरकरांनी पॉर्नस्टार मिया खलिफाला तोंडावर पाडलं…!

===

तिच्या आणि संजयजींच्या भेटीवर अनिरुद्ध जोशी यांनी मारलेली कोपरखळी, म्हणजे एक भन्नाट विनोद आहे का हो मंडळी?

 

 

यांच्या भेटीला फक्त विरोधच होतोय असं नाही, काही मंडळींनी तिची बाजू सुद्धा घेतली आहे. नक्की काय म्हणणं आहे, वाचा.

 

 

या भेटीचा परिणाम म्हणून, तिच्या एका चाहत्याने तिला unfollow करण्याचा निर्णय बोलून दाखवला. तिला अनफॉलो करणं न करणं, हा जरी त्याचा वैयक्तिक मुद्दा असला, तरी तिने राजकारण्यांना भेटणं अथवा न भेटणं हासुद्धा तिचा वैयक्तिक निर्णय आहे, असं अविनाश यांचं म्हणणं असल्याचे दिसतंय.

तिचा सत्कार करण्यासाठी तिला बोलावलं असू शकतं आणि तिने राजकीय क्षेत्रातील मंडळींना भेटण्यात चूक काय असा सवाल त्यांनी केलाय.

ट्विटरकरांनी फक्त सुशांतच नाही, तर कंगना राणावतची सुद्धा आठवण काढली आहे. तिचा अप्रत्यक्ष उल्लेख या ट्विटमध्ये पाहायला मिळतोय.

 

 

स्त्रीचा उल्लेख हरामखोर असा करणाऱ्या व्यक्तीला भेटणं, हे लज्जास्पद असल्याचं इथे सोना म्हणतायत.

संजयजी नेमके कुणाला, का आणि कधी हरामखोर म्हणाले होते, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. असो, तो आत्ताचा विषय नाही. मैथिलीची आणखी एक चाहती नेमकं काय म्हणतेय, ते बघूया.

 

 

अनफॉलो करण्याची इच्छा तर होतेय, पण तू खूप टॅलेंटेड आहेस म्हणून करत नाही. असा शब्दांमध्ये टीका आणि प्रेम या दोन्ही गोष्टी अगदी सहजरित्या मांडलेल्या दिसतायत.

तिला अनफॉलो करणाऱ्या आणखी एका चाहत्याला सुद्धा ती चुकीची वाटली, पण नेमकी कुठल्या कारणासाठी; बघा बरं…

 

 

तिने ‘नॉटी संजय राऊत’ यांना भेटणं ही तिची मोठी चूक नाही, तर तो फोटो सोशल मीडियावर अपलोड करणं ही आहे. असं म्हणतेय ही चाहती. पुढे तिने तुलना सुद्धा एका राजकारण्याशीच केली, म्हणजे शेवटी मैथिलीवर राजकारणाचा शिक्का बसणार का, हे आता येणार काळच ठरवेल.

मैथिलीने हा फोटो अपलोड करण्याची चूक करून सोशल मीडियावरील मंडळींना भरपूर खाद्य पुरवलं आहे, हे मात्र खरं आहे; असं म्हणता येईल.

या भेटीबद्दल राकेश वर्मा काय म्हणतायत, हेसुद्धा बघा. संजय राऊत यांना भेटणं ही अभिमानाची बाब आहे की नाही, हे मैथिलीने ठरवावं असं त्यांचं म्हणणं असल्याचं दिसून येतंय.

 

 

तुझ्यासाठी अभिमानाची बाब असली, तरी तुझ्या चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब नाही. हे कृत्य करून तू तुझ्या चाहत्यांना दुखावलं आहेस, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.

एकूणच काय, तर बॉलीवूडमध्ये कधीही गाणी गाणार नाही, असं मत मांडणाऱ्या मैथिलीने राजकारणी मंडळींपासून सुद्धा दूर राहायला हवं, असा सूर तिच्या चाहत्यांनी ट्विटरवर लावलेला दिसतोय.

सुरेल गळ्याच्या मैथिलीने इतर सूर सुद्धा योग्यप्रकारे जाणून घ्यावेत आणि अखंडितपणे तिची कला सादर करत राहावी अशी अपेक्षा करूया.

===

हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version