आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
१९६५ चे भारत पाकिस्तान मध्ये झालेले भयंकर युद्ध कुठलाच भारतीय विसरू शकत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या युद्धाने दोन्ही राष्ट्रांच्या दशेमध्ये आणि दिशेमध्ये मोठा बदल केला. सर्वसाधारणपणे आपण असे मानतो की हे युद्ध होण्यामागचे कारण काश्मीर विवाद होता.
पण फार थोड्या लोकांना हे माहित आहे की ह्या युद्धाची सुरुवात कच्छच्या कोणाला फारशा माहीत नसलेल्या भागात झालेल्या छोट्या चकमकीतून झाली.
हा संपूर्ण भाग वाळवंटाने व्यापला आहे. ह्या भागात फार कोणाची ये जा नाही. पण चुकून कधी गेलेच तर पोलीस किंवा गुरं चारणारे लोकच जात असत.
बीबीसीच्या एका रिपोर्ट प्रमाणे,
१९६५च्या भारत –पाक मध्ये झालेल्या युद्धाचे कारण दुसरे तिसरे कुठलेही नसून एक रस्ता इतकेच होते.
आश्चर्य वाटते ना? चला तर मग ह्याबद्दल अधिक माहिती करून घेऊ!
भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर कच्छच्या भागामुळे पाकिस्तानचा खूप फायदा झाला होता. कारण पाकिस्तानच्या आठव्या बटालियनचे मुख्यालय ह्याच भागात होते.
ह्याच भागापासून २६ किलोमीटर लांब बादीन नामक एक रेल्वे स्टेशन होते जेथून कराची केवळ ११३ मैल लांब होते.
जेव्हा भारतीय सुरक्षा दलाला कळले की ह्या भागात पाकिस्तान ने १८ मैल लांब एक कच्चा रस्ता तयार केला आहे तिथेच युद्धाची ठिणगी पडली. भारताने पाकिस्तानच्या ह्या गोष्टीला विरोध केला कारण काही ठिकाणी हा रस्ता दीड मैलापर्यंत भारताच्या हद्दीमध्ये येत होता.
भारतासाठी कच्छ हे दुर्गम ठिकाण आहे. तिथे जाण्यासाठी मार्ग खूप दुर्गम आहे. पण पाकिस्तान साठी मात्र कच्छ येथे पोचणे अतिशय सोपे होते. कच्छ पासून सर्वात जवळची ब्रिगेड म्हणजे ३१वी ब्रिगेड अहमदाबाद येथे होती.
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन भुजपासून १८० किलोमीटर लांब होते. भुज हे शहर तसे लहान आहे पण भारत पाक सीमेपासून फक्त ११० मैल लांब आहे.
भारताने पाकिस्तानच्या रस्ता तयार करण्याला विरोध केल्याने पाकिस्तानने काहीच कारण नसताना आक्रमक पवित्र घेतला.
त्यांच्या सेनेच्या ५१व्या ब्रिगेडला म्हणजेच ब्रिगेडप्रमुख कमांडर ब्रिगेडियर अजहरला ह्या भागात जास्त प्रमाणात व आक्रमकपणे गस्त घालण्याचे आदेश होते.
दुसरीकडे भारताने मार्चच्या अखेरीस कंजरकोटपासून अर्ध्या किलोमीटर वर दक्षिण दिशेला सरदार चौकी तयार केली.
हे कळल्यावर पाकिस्तानला हे सहन झाले नाही. पाकिस्तानच्या कमांडर जनरल टिक्का खानने ब्रिगेडियर अजहरला भारताची सरदार चौकी पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश दिले आणि इथूनच युद्ध सुरु झाले.
९ एप्रिल १९६५ रोजी पहाटे २ वाजता पाकिस्तानने सरदार चौकीवर पहिला हल्ला केला. पाक सैन्याला सरदार चौकी, जंगल चौकी व शालीमार चौकी ह्या सर्व चौक्या नष्ट करण्याचे आदेश होते.
शालीमार चौकीवर तैनात असलेले भारतीय स्पेशल रिजर्व पोलिसांचे जवान ह्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. परंतु सरदार चौकीवर तैनात असलेल्या जवानांनी मात्र पाक सैन्याच्या हल्ल्याला कडवे प्रत्युत्तर दिले.
तब्बल १४ तासांच्या आक्रमणानंतर पाकच्या ब्रिगेडियर अजहरने गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले.
ह्यानंतर पाकिस्तानचे जवान त्यांनी जिथून हल्ला सुरु केला होता तिथे परत निघून गेले व भारतीय जवान सुद्धा दोन मैल मागे विजियोकोट चौकीवर परत आले.
पण पाकिस्तानी सैन्याला ह्याची कल्पनाच नव्हती की भारतीय सैन्य दोन मैल मागे गेले आहे. भारतीय सैन्याला समजले की सरदार चौकीवर कोणीही पाकिस्तानी सैनिक नाही.
मग काय! भारतीय सैन्याने ही संधी सोडली नाही. कुठलाही वेळ न दवडता त्यांनी कुठल्याही हल्ल्याशिवाय सरदार चौकीवर परत नियंत्रण मिळवले.
बीसी चक्रवर्ती ह्यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ इंडो पाक वॉर १९६५ ह्या पुस्तकात लिहिले आहे की,
पाकिस्तानच्या ५१व्या ब्रिगेडच्या कमांडरने हे ऑपरेशन अतिशय अपरिपक्वरित्या हाताळले.
ह्यानंतर युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. दोन्ही देश युद्धासाठी सज्ज होते. फक्त पहिला हल्ला होण्याची वाट बघणे सुरु होते. ही गंभीर परिस्थिती बघून मेजर जनरल डून मुंबईहून कच्छकडे रवाना झाले.
तिकडे पाकिस्तानने सुद्धा 8व्या इंफैंटी डिवीजनला कराचीहून हैदराबादला (पाकिस्तान मधील) बोलावून घेतले.
त्याकाळी ब्रिगेड कमांडर असलेल्या लेफ्टनंट कर्नल सुंदर ह्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व असा सल्ला दिला की,
भारताने कंजरकोट येथे हल्ला केला पाहिजे.
परंतु सरकारने त्यांच्या ह्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर २४ एप्रिल रोजी ब्रिगेडियर इफ्तिखार जुनजुआ ह्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याने तोफा व २ tank भरून रेजिमेंट ह्यांचा वापर करून सेरा बेत वर ताबा मिळवला आणि भारतीय सैन्याला मागे हटावे लागले.
त्यानंतर २ दिवसांनी भारतीय सैन्याला बियर बेत इथली चौकी सुद्धा सोडून द्यावी लागली.
पाकिस्तानने त्यानंतर देश विदेशातल्या पत्रकारांना बोलावून स्वतःच्या सेनेच्या पराक्रमाचे रसभरीत वर्णन केले व भारतीय सैन्याने तिथे टाकून दिलेली शस्त्रास्त्रे व दारुगोळा दाखवले. जगभरात स्वतःच्या विजयाचा सगळीकडे खोटा गवगवा केला.
त्यानंतर ब्रिटनने ह्यामध्ये हस्तक्षेप केला व दोन्ही सेना त्यांच्या आधीच्या मुक्कामी परत गेल्या.
ह्या युद्धात पाक सैन्य भारतीयांवर वरचढ ठरले कारण आपल्या लोकांना कल्पनाच नव्हती की पाकिस्तान युद्धासाठी समोर उभा ठाकेल. त्यांना पाकिस्तानच्या सैन्याची कुवत ठावूक नव्हती. जाणकारांचे असे मत आहे की,
हे युद्ध भारतासाठी अतिशय महत्वाचे ठरले कारण ह्या युद्धामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या सैन्याच्या ताकदीचा व त्यांच्या युद्धाच्या पद्धतीचा अंदाज आला. पाकिस्तानशी युद्धाचा अनुभव आला त्याचा त्यांना पुढील युद्धासाठी उपयोग झाला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.