' प्रियजनांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा ‘स्मार्ट’ वापर करणारं हे अॅप ठाऊक आहे का? – InMarathi

प्रियजनांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा ‘स्मार्ट’ वापर करणारं हे अॅप ठाऊक आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘घरातून कामासाठी निघालेलं माणूस घरात येईपर्यंत चैन पडत नाही’ हे वाक्य आपण आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्तींकडून ऐकलं असेल. काही वर्षांपूर्वी ही काळजी अवास्तव वाटायची किंवा गमतीवर घेतली जायची.

बायको जर, ‘नवरा कुठे आहे?’ हे विचारण्याचा प्रयत्न करत असेल, तर काही लोक त्याकडे जबाबदारी म्हणून न बघता ‘वॉच’ म्हणून बघायचे.
त्यात, काही जणांना ‘कुठे जाणार आहे?’ हे कोणालाही सांगायची आवश्यकता वाटत नसते. त्यामुळे अशी मंडळी ‘किती वेळात परत येतील?’ याचा अंदाज येत नसतो.

तुम्ही कितीही मोठे झालात, स्वयंपूर्ण झालात तरीही घरी बसलेल्या व्यक्तींना तुमची काही प्रमाणात काळजी ही असतेच. लहान मुलांना शाळेतून येण्यासाठी, घरातील वयस्कर व्यक्तींना, महिलांना घरी येण्यासाठी उशीर झाला, की घरी असलेल्या व्यक्तीच्या मनाची घालमेल ही कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही.

 

suchitra bandekar priya bapat inmarathi

 

महिला स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत किंवा आपलं महाराष्ट्र राज्य सुरक्षित नाहीये हा मुद्दा इथे अजिबात नाहीये. एका नवीन माहितीद्वारे कोणताही प्रवास करतांना ‘सतर्कता कशी असावी ?’ एवढंच फक्त आम्ही सांगत आहोत.

काही महिला याबाबतीत आधीच सतर्क असतात हे आपल्याला माहीतच आहे. रिक्षा किंवा कॅबमधून प्रवास करतांना त्या आपल्या जवळच्या व्यक्तींना एक तर फोन लावून, आपल्या प्रवासाची माहिती देत असतात किंवा सध्या उपलब्ध असलेल्या ‘लाईव्ह लोकेशन पाठवणे’ या सुविधेचा फायदा घेत असतात. ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’ ही गोष्ट त्यांनी मान्य करून आमलात आणलेली असते.

आपलं माणूस कुठे आहे आणि कसं आहे? हे मोबाईल तंत्रज्ञानाच्या आधारे सहज कळावं यासाठी ‘ट्रूकॉलर’ या मोबाईल अॅप्लिकेशन बनवलेल्या कंपनीने ‘गार्डीयन्स’ नावाचं एक नवीन app जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लाँच केलं आहे.

हे ही वाचा – ट्रूकॉलर’ला तुमचं नाव इतकं परफेक्ट कसं काय माहित होतं? जाणून घ्या..

कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेला फोन, मिसकॉल हा कोणाचा आहे? हे सांगण्यासाठी लोकप्रिय असलेल्या ‘ट्रूकॉलर’ या अप्लिकेशनच्या या नवीन अॅप्लिकेशनचं सध्या स्वागत होत आहे.

 

truecaller inmarathi

 

काय आहे हे ‘गार्डीयन्स’ अॅप्लिकेशन?

स्वीडनच्या ‘ट्रूकॉलर’ या कंपनीने त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांसोबत १५ महिने काम करून भारतीय महिलांची सुरक्षेची गरज लक्षात घेऊन ‘गार्डीयन्स’ची निर्मिती केली आहे.

‘पर्सनल सेफ्टी’ हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘गार्डीयन्स’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने त्यांच्या पत्रकात जाहीर केलं आहे.

त्यासाठी सध्या कित्येक अॅप्लिकेशन बाजारात उपलब्ध आहेत. पण ‘गार्डीयन्स’ या सर्वांपेक्षा वेगळं आहे असा विश्वास ‘ट्रूकॉलर’चे सीइओ अॅलन मामेदी यांनी व्यक्त केला आहे.

 

alan mamedi truecaller ceo inmarathi

 

‘गार्डीयन्स’मध्ये वेगळं काय?

१. लोकेशनसह इतर महत्त्वाची माहिती होणार शेअर

बऱ्याच वेळेस एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकेशन पाठवलं जातं. तुमची जवळची व्यक्ती तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करते. पण, तोपर्यंत तुमच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली असते किंवा तुम्ही नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर गेलेले असता. तुमच्यापर्यंत कोणाला पोहोचताच येत नाही.

 

mobile location gps inmarathi

 

ही परिस्थिती टाळण्यासाठी ‘गार्डीयन्स’मध्ये तुमच्या लोकेशनसोबतच तुमच्या मोबाईलमध्ये किती टक्के चार्जिंग शिल्लक आहे, तुम्ही जिथे आहात तिथे किती नेटवर्क येत आहे? हा तुमच्या मोबाईलचा डेटा सुद्धा समोरच्या व्यक्तीला पाठवला जाईल. जेणेकरून किती तातडीने पोहोचावं लागेल याचा त्या व्यक्तीला अंदाज येईल.

तुमचं लोकेशन हे तुम्ही निवडलेल्या लोकांना कायम दिसत रहावं ही सुद्धा सोय ‘गार्डीयन’मध्ये करण्यात आली आहे. वयस्कर व्यक्ती ज्यांना ते ‘सध्या कुठे आहेत?’ हे सांगता येत नाही, अशा व्यक्तींसाठी हे फिचर खूप उपयोगी पडेल.

हे ही वाचा – ‘स्मार्टफोनमुळे’ आता लायसन्स व इतर कागदपत्रे स्वतःकडे बाळगायची गरज नाही!

२. ‘गार्डीयन्स’ हे पूर्णपणे फुकट आहे

तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमधून वाचवू शकणारं हे अॅप्लिकेशन वापरण्यासाठी पूर्णपणे फुकट आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जर ‘ट्रुकॉलर’ उपलब्ध असेल, तर तोच युजर आयडी हा ‘गार्डीयन’साठी सुद्धा वापरला जाऊ शकतो.

तुमच्या मोबाईलमध्ये जर ‘ट्रुकॉलर’ नसेल तर तुम्ही ‘गार्डीयन’ हे अॅप डाउनलोड करून त्यात तुमचा फोन नंबर रजिस्टर करून लॉगिन करू शकता.

फोन नंबर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला फोनवर एक OTP पाठवण्यात येईल किंवा कॉल करून सांगितला जाईल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली, की तुमच्या मोबाईलमधील पाहिजे तितक्या लोकांना तुम्ही लोकेशन पाठवू शकता. त्यांनी गार्डीयन डाउनलोड केलेलं नसेल तरीही!

 

guardians truecaller inmarathi

 

३. बॅटरी लाईफवर परिणाम नाही

‘गार्डीयन्स’ हे मोबाईलच्या बॅकग्राउंडला चालत असल्याने तुमच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा जास्त खर्च होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

 

background application inmarathi

 

तुमच्या मोबाईलमधील लोकांपर्यंत तुमचं लोकेशन पाठवता यावं यासाठी तुम्हाला तुमच्या लोकेशन आणि इतर काही गोष्टी वापरण्याची परवानगी अॅपला द्यावी लागेल. ‘इमर्जन्सी’ हे एक बटन ‘गार्डीयन’ मध्ये असेल ज्यामुळे केवळ निकटवर्तीय लोकांनाच तुमचं लोकेशन पाठवलं जाईल.

४. जाहिरात बघावी लागणार नाही

खाजगी माहिती म्हणजे तुमच्या मोबाईलमधील फोटो, विडिओ, चॅट या गोष्टींकडे ‘गार्डीयन्स’चा प्रोग्राम बघणार सुद्धा नाही. ही माहिती ‘ट्रूकॉलर’ला सुद्धा दिली जाणार नाही, ही खात्री ‘गार्डीयन्स’च्या निर्मात्यांनी त्यांच्या ग्राहकांना दिली आहे.

या अॅप्लिकेशनवर कोणतीही जाहिरात दिली जात नाही आणि भविष्यात सुद्धा दिली जाणार नाही असा कंपनीचा दावा आहे.

‘ट्रूकॉलर’ प्रमाणेच ‘गार्डीयन्स’सुद्धा वापरण्यासाठी सहज आणि विना व्यत्यय चालणारं अॅप्लिकेशन आहे असा अभिप्राय सर्व टेक-गुरूंनी दिला आहे. आपल्या निकटवर्तीय लोकांना ‘गार्डीयन्स’ अॅप्लिकेशनबद्दल ही माहिती शेअर करून सांगा आणि काही पालकांना निश्चिंत राहण्यास नक्की मदत करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?