Site icon InMarathi

वाढत्या उन्हाळ्यात हिट स्ट्रोकचा त्रास टाळायचा असेल तर बनवा चविष्ट बदाम शेक

dry fruit inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपली संस्कृती आणि आपले सणवार इतके समृद्ध आहे की, ज्या ऋतूत जो सण येतो त्यानुसार त्या सणाचे खाणेपिणे केले जाते. आपल्याला अनेकदा आपल्या घरातील वयस्कर लोकांकडून किंवा डॉक्टरांकडून ऐकायला मिळते की, जसा ऋतू बदलेल तसे आपले खाणे पिणे देखील बदलले पाहिजे.

सध्या मार्च महिन्याची सुरुवात असली तरी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवायला लागला आहे. उन्हाळा सुरु झाला की, आपण नेहमी शरीराला शांत आणि थंड ठेवण्यासाठी वेगवेगळी पेये तयार करून त्यांचा आस्वाद घेतच असतो.

 

 

कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, ताक आदी अनेक पेये आपण उन्हाळा लागली घ्यायला सुरुवात करतो. मात्र कधी कधी तेच ते पिऊन देखील खूप कंटाळा येतो. आपल्याला सतत काहीतरी वेगळे पाहिजे असते.

त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला एक मस्त आणि चविष्ट पेयांची माहिती आणि कृती सांगणार आहोत.

उन्हाळा लागला की अनेकदा आपण बाहेर थंडगार बदाम शेक पीत असतो. आज आम्ही तुमहाला घरच्या घरी बाहेरच्या चवीपेक्षा जास्त चांगल्या बदाम शेकची रेसिपी सांगणार आहोत.

ही रेसिपी सर्वांसाठीच उपयुक्त आहे. कारण यात आपण सर्व साहित्य हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आणि तितकेच रुचकर असे वापरणार आहोत.

 

 

चला तर मग पाहूया बदाम शेकची रेसिपी.

साहित्य :

२०-३० बदाम, साडेतीन कप दूध, ३ टेबलस्पून लो कॅलरी स्वीटनर, १/४ टीस्पून हिरव्या वेलचीची पूड, दीड टीस्पून कस्टर्ड पावडर, एक चिमूट केसर, पाव कप ताजी मलई

कृती 

प्रथम एका नॉनस्टिक पॅनमध्ये २ कप दूध गरम करण्यासाठी ठेवा. यातच लो कॅलरी स्वीटनर (आपण इथे आवडीप्रमाणे साखर देखील वापरू शकतात) टाका. सोबतच हिरव्या वेलचीची पावडर आणि कस्टर्ड पावडर सुद्धा टाकून मिश्रणाला १०-१५ मिनिटांसाठी मंद आचेवर सतत ढवळत ठेवा.

 

 

दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात बदामाची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट उरलेल्या दुधात चांगली एकजीव करा आणि गॅसवरील उकळणाऱ्या दुधाच्या मिश्रणात मिसळा. त्यानंतर ५ मिनिट हे मिश्रण मंद आचेवर उकळा. या मिश्रणात केशर टाका आणि ताजी मलाई टाकून मिसळा.

आता गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्या. नंतर तयार मिश्रण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर सर्व्हिंग ग्लासात काढून वेलची पावडर आणि केशर टाकून सजवा आणि आस्वाद घ्या बदाम शेकचा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version