आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
एक वर्ष झालं कोरोनानं जगात प्रवेश करुन!!! या वर्षभरात संपूर्ण जगात किड्या मुंग्यांसारखी माणसं मेली. लाॅक डाऊन सुरू झालं. एक एक म्हणता भारतात कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली.
कोरोना.. कोरोनाची भीती.. औषधोपचार उपलब्ध नसणं या गोष्टींनीच बरेचसे लोक मृत्युमुखी पडले.
वास्तविक हे लाॅकडाऊन संभाव्य रुग्ण संख्या लक्षात घेऊन दवाखाने डाॅक्टर, नर्सेस, व्हेंटिलेटर या सर्व कोरोना रुग्णांची सोय व्हावी म्हणून केलं होतं.
लाॅकडाऊनमध्ये मजूरांचे तांडेच्या तांडे विस्थापित होऊन आपल्या गावाकडे परतू लागले. लोकांचे रोजगार गेले. अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर गेलं. कितीतरी जणांचे घराचे आधारस्तंभ गेले. महाराष्ट्रात एकदम २० मजूर रेल्वेखाली सापडून मेले.
जितके बळी कोरोनाने घेतले तेवढेच भीतीने, भुकेने आणि औषधोपचार न मिळाल्याने गेले. एकतर कोरोना हा नवाच आजार, ज्याची लक्षणं वेगळी, लस उपलब्ध नव्हती. आॅक्सिजनचा तुटवडा. अशा विचित्र कारणांनी लोक गेले.
काही लोकांना कोरोना होऊन गेला, पण समजलंही नाही. कारण त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम होती. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी होती त्यांना कोरोनाचा हल्ला झेपला नाही. वेगवेगळे आयुर्वेदिक काढे, पावडर वगैरे वापरुन लोकांनी कोरोनाचा प्रतिकार केला.
कोरोनाचा कहर कमी झाला. आता दुसरी लाट आली आहे. त्यातही महाराष्ट्र बराचसा आघाडीवर आहे. वेळेत औषधं न मिळणं किंवा महागडी औषधे आहेत म्हणून लोकांनी ती घेणंच टाळणं हे मृत्यूदर वाढण्याचं फार भयंकर कारण आहे.
कधी कधी अशा नकारात्मक गोष्टी एखाद्या माणसाला सकारात्मकतेच्या टोकावर घेऊन जातात. त्यातूनच एखादे बाबा आमटे, डाॅ. रविंद्र कोल्हे, गिरीश प्रभुणे तयार होतात.. मानवी जीवनात मोहोर फुलवायचं काम करतात. हे इतकं सहजवारी होतं, की ती माणसं माईल स्टोन बनतात. असेच माणसाच्या आयुष्यात एक झुळूक घेऊन आलेले मेडिसिन बाबा!!!
ही गोष्ट आहे ओंकारनाथ शर्मा यांची. ओंकारनाथ शर्मा हेच ते मेडिसिन बाबा. पूर्वी दिल्लीमधील एका हाॅस्पीटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करणारे ओंकारनाथ शर्मा!!!
हाॅस्पीटलमधली नोकरी म्हणजे रोज वेदनांशी सामना. रोज नवे रुग्ण, रोगांचे नाना प्रकार. परिस्थितीनं आजाराने गांजलेले लोक हे रोजचं जगणं.
वेगवेगळ्या तपासण्या, रोगजर्जर झालेले लोक, हे सगळं बघून कुठंतरी त्यांनाही वाईट वाटायचं. अशा लोकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटायचं. वाटणं आणि हातून घडणं यात खूप अंतर असतं. खूपदा लोकांना कळवळा वाटला तरी परिस्थिती, पैसा या गोष्टी नसतील तर हा कळवळा निरर्थक ठरतो. ओंकारनाथ शर्मा हे पण असेच चारचौघांसारखे!
पण कधीकधी एखादा प्रसंग घडतो आणि आपल्याला माहीत नसलेलं आपलंच एखादं शक्तीस्थळ आपल्याला सापडतं. ओंकारनाथ शर्मा यांच्याबाबत पण अशीच एक घटना घडली.
२००८ साली पूर्व दिल्लीमध्ये बांधकाम चालू असलेला मेट्रोचा एक पूल कोसळला. या दुर्घटनेची बरीच माणसं शिकार ठरली. दोन मजूर मृत्यू पावले आणि बरेच लोक जखमी झाले.
अशा मोठ्या अपघातानंतर बहुतांश वेळा मोठी मोठी हाॅस्पीटल्स रुग्णांनी भरुन जातात. नातेवाईकांचा आक्रोश, औषधोपचारांची लिस्ट, वेगवेगळ्या तपासण्या हे कधी कधी सामान्य माणसाला न झेपणारं असतं.
एकीकडे आपलं माणूस मरणाच्या यातना सोसत आहे हे पाहून दडपणारा जीव, दवाखान्याच्या बिलाचा वाढणारा आकडा, तर दुसरीकडे औषधांची यादी हे सारं जमवताना रुग्णांच्या नातलगांना कितीतरी त्रास होत असतो.
मेट्रो पूल कोसळल्यानंतर ही पळापळ, हा आक्रोश ओंकारनाथ शर्मा जवळून पहात होते. अचानक त्यांना लक्षात आलं, हीच ती वेळ आहे, इथंच आपल्याला लोकांसाठी जे करायचं आहे ते आत्ताच सुरु करु.
–
हे ही वाचा – एक्सपायर झालेली औषधं का घेऊ नयेत असा प्रश्न पडत असेल तर हे वाचाच!
–
या मोठ्या अपघातानंतर हाॅस्पीटल प्रशासन जुजबी उपचार करुन रुग्णांना घरी पाठवून मोकळे झाले. पण ते उपचार पुरेसे नव्हते. कारण त्यांना झालेल्या इजेच्या मानाने दिलेले उपचार पुरेसे नव्हते आणि याहून जास्त मोठे उपचार करुन घेण्याची त्या लोकांची ऐपत नव्हती. हे बघून ओंकारनाथ शर्मा हेलावून गेले.
या लोकांसाठी जे करायचं ते आपण सुरू करायचं, ही खूणगाठ मनाशी बांधली आणि त्यांनी आपलं काम सुरू केलं. हाॅस्पीटलमधील त्यांच्या नोकरीची आठ वर्षं अजून बाकी होती.
त्यांनी त्यांच्या कामाचं स्वरुप ठरवलं. केशरी रंगाचा कुर्ता घालून त्यावर त्यांनी लिहिले, ‘गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोबाईल मेडिसिन बँक’!
आपल्या उत्तमनगर येथील भाड्याच्या घरातून सकाळी सहा वाजता बाहेर पडत. आजूबाजूच्या परिसरातील घरातून फिरुन न वापरलेली औषधं गोळ्या गोळा करत. आणि ती औषधं चॅरिटेबल ट्रस्टच्या हाॅस्पीटलमध्ये, खाजगी समाजसेवी संस्था, आणि दवाखाने यांच्याकडे देऊन टाकत.
स्वतः ओंकारनाथ शर्मा हे त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षी एका अपघातात सापडून अपंग झाले होते. तरीही आज ते दिवसाला सहा किलोमीटर अंतर चालतात. कारण दिल्लीसारख्या महानगरात विविध भागात जायचे झाल्यास मेट्रोचे भाडे त्यांना परवडत नाही.
मग ते बसने आपला ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा पास घेऊन कमी भाडेखर्चात प्रवास करतात. अगदी आतल्या भागात जिथं बस पोहोचू शकत नाही तिथं जायचे झाल्यास ते सरळ चालत जातात. लोक त्यांना मेडिसिन बाबा म्हणून ओळखू लागले आहेत.
२०१५ साली त्यांनी सरकारी मान्यता मिळवून डाॅ. सचिन गांधी आणि डॉ. अरुण हुडा यांच्या मदतीने एक ट्रस्ट स्थापन केली. जी ट्रस्ट लोकांमध्ये औषधोपचारांसाठी जागृती निर्माण व्हावी म्हणून काम करते. रुग्णांना जास्तीत जास्त लवकर योग्य ते औषधोपचार मिळवून देण्यासाठी मदत करते. केवळ उपचार करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कुणीही रुग्ण दगावणार नाही याची काळजी ही ट्रस्ट घेते.
या कामासाठी त्यांना देणगीची खूप गरज आहे. झोपडपट्टीतील गरीब लोकांना या औषधांची गरज आहे. कारण पैसा नाही म्हणून हे लोक उपचार करुन घेत नाहीत. हेच होऊ नये म्हणून ओंकारनाथ शर्मा विविध भागात असलेल्या झोपडपट्टीत आपल्या ट्रस्टच्या वतीने काम करतात.
कोणीही गरीब माणूस उपचारावाचून, औषधावाचून जीवनाला मुकू नये या उदात्त हेतूने त्या लोकांसाठी एक सेंटर सुरू करायचा त्यांचा मानस आहे. त्या सेंटरसाठी अंदाजे तीन लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, त्यांना हे सेंटर उभं करायचंच आहे.
आपली परिस्थिती उत्तम असताना कुणीही लोकांसाठी काम करेल. त्यात काहीही विशेष नाही. पण आपली परिस्थिती बेताची असतानाही केवळ ‘समाजाचं देणं’ हा हेतू ठेवून काम करणारे मेडिसिन बाबा हे देवदूताचंच रुप आहेत!!!!
===
हे ही वाचा – दवाखान्याचा खर्च कमी करतात जेनेरिक औषधं! जाणून घ्या त्यांची ‘खरी’ किंमत!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.