Site icon InMarathi

असं काय घडलं की अभिनेता वरूण धवनने थेट प्रेक्षकांसमोर हात जोडले?

varun dhawan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कलाकार जितके चित्रपटांसाठी ओळखले जातात तितके त्यांच्या फॅन्ससाठी देखील ते ओळखले जातात. बऱ्याचदा आपण कलाकार आणि त्यांच्या फॅन्सच्या प्रेमाबद्दल अनेक बातम्या वाचत असतो, ऐकत असतो. कधी कधी काही फॅन्स तर कलाकारांच्या डोक्याला तापही ठरतात. मात्र हेच फॅन्स कलाकारांना स्टारडम मिळून देतात.

 

 

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकतरी फॅन किंवा फॅन्सच्या संदर्भातली एखादी घटना अविस्मरणीय असतेच. हेच फॅन्स आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी त्याची एक झलक घेण्यासाठी जंग जंग पछाडतात.

सध्या बॉलिवूडचा हँडसम हिरो असणाऱ्या वरुण धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच जास्त व्हायरल होत आहे.

 

हे ही वाचा – “के तेरा हिरो इधर है!” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार

वरुण अरुणाचल प्रदेशमध्ये त्याच्या आगामी ‘भेडिया’ सिनेमाचे शूटिंग करण्यासाठी पोहचला. इथे आल्यावर त्याच्या फॅन्सने त्याची भेट घेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. त्याचाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

या व्हिडिओमध्ये वरुणची एक झलक दिसण्यासाठी हजारो फॅन्सने त्याच्या गाडीलाच गराडा घातला. हे फॅन्स वरुणच्या नावाने देखील जोरजोरात ओरडतानाही दिसत आहे. वरुणने अनेक प्रकारे फॅन्सला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच शक्य होत नाही असे लक्षात आल्यावर वरुणने थेट त्याच्या गाडीच्या छपरावर चढून फॅन्ससोबत संवाद साधला.

या व्हिडिओमध्ये वरुण गाडीच्या छपरावर चढून फॅन्सला विनंती करत आहे की, अजून सिनेमाचे शूटिंग बाकी आहे. मी सुद्धा अजून इथेच असणार आहे. प्लिज तुम्ही शांत राहा आणि शूटिंग करू द्या. आमचे शूटिंग संपले की मी जाण्याआधी तुम्हा सर्वाना नक्की भेटेन, पण आता शांत राहा आणि आम्हाला शूटिंग करू द्या. मात्र फॅन्स ऐकायला तयारच नव्हते ते मोबाइलचा टॉर्च ऑन करून जोरात ओरडताना दिसत आहेत.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अशा प्रकारची गर्दी होणं, किंवा मोठ्या संख्येने लोक एकत्र येणं ही बाब चिंतेची असल्याने कलाकारांनाच प्रेक्षकांना गर्दी न करण्याचं आवाहान करावं लागत आहे,

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version