Site icon InMarathi

बच्चनने ही फिल्म नाकारल्यामुळे चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारे सलीम-जावेद वेगळे झाले

salim-javed-bacchan-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनिल कपूरच्या करियरमधले जे मैलाचे दगड असणारे सिनेमे आहेत त्यापैकी मिस्टर इंडिया हा सिनेमा फार महत्वाचा आहे. या सिनेमानं ब्लॉकबस्टर यश मिळवून केवळ अनिलचं करियर सावरलं आणि त्याला स्टारपदावर नेऊन बसवलं असं नाही तर शेखर कपूर या नावालाही वलय प्राप्त झालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या चित्रपटानं मोगॅम्बोसारखं पात्र जन्माला घालून एक इतिहास रचला तर ‘काटे नही कटते’ या गाण्यातल्या निळ्या साडीतल्या ग्लॅमरस श्रीदेवीचा हॉट लूक कल्ट बनला.

 

 

याच चित्रपटानं सतिश कौषिक या गुणी अभिनेत्याला कॅलेण्डरच्या पात्राच्या नावानं ओळख मिळवून दिली तर अन्नू कपूरला मोठ्या पदड्यावरची पहिली मोठी ओळख. सतिष कौशिक आणि कपूर कॅम्प यांचं गुळपीठ याच सेटवरून सुरू झालं आणि पुढे तो कपूर कॅम्पच्या सिनेमांचा दिग्दर्शक बनला.

काटे नहीं कटते या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान निळ्या साडीतल्या श्रीदेवीला बघून बोनी कपूर क्लिन बोल्ड होत पेहेली नजर में तिच्या प्रेमात पडला.

या सिनेमाच्या सेटवर केवळ मिस्टर इंडियाच बनला असं नाही तर अनेकांची लाईफस्टोरी या चित्रीकरणादरम्यान आकार घेत होती. हे सगळं होत असतानाच एक दुर्दैवी घटनाही या चित्रीकरणादरम्यान आकार घेत होती.

मिस्टर इंडियाचं चित्रीकरण संपता संपता इंडस्ट्रीला हादरवून टाकेल अशी ही घटना घडेल असं कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं. नेमकं असं काय घडलं या चित्रीकरणा दरम्यान?

 

 

जी घटना घडली ती चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या होळीला. बच्चनच्या जलसावरची ही होळी केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्यातले रंग बेरंग करून गेली असं नाही तर हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या ॲन्ग्री यंग मॅन फॉर्म्युल्यापासून दूर घेऊन जाणारी आणि आणि इंडस्ट्रीलाही सिध्दहस्त स्क्रिप्टची काही काळ वानवा भासवणारी अशी ही घटना होती एका जोडीचं ब्रेक अप.

हे ब्रेक अप कोणा स्त्री-पुरूष जोडीचं नव्हतं तर सलीम-जावेद या सुप्रसिध्द, लोकप्रिय लेखक जोडीचं होतं.

अमिताभच्या करियरला कळसावर नेणारी सलम-जावेद ही जोडी. यांच्या कारकिर्दीतले सर्वात जास्त हिट सिनेमे त्यांनी अमिताभ सोबत केलेले आहेत आणि अमिताभ हे नाव द अमिताभ बच्चन बनविण्यात सलीम जावेद या जोडीचा फार मोठा हात आहे.

हे ही वाचा

===

या तिकडीला हिट सिनेमाची परफेक्ट रेसपी सापडली होती. लोक अक्षरश: वेडे झाले होते. पडद्यावरचा बदला घेणारा अमिताभ आणि त्याच्या तोंडी असलेले ढांसू डायलॉग यांनी प्रेक्षकांना संमोहित केलेलं होतं.

 

 

सलीम-जावेदचं नाव स्क्रिप्टवर दिसलं की अमिताभ हिरो असणारच. त्याचा होकार येणारच हे जवळपास निश्चित असलेलं समीकरण होतं.

मात्र या समिकरणाला तेव्हा धक्का बसला जेव्हा सलीम जावेद एक फॅंटसी स्क्रिप्ट अमिताभाकडे घेऊन गेले. मोठ्या आत्मविश्र्वासानं त्यांनी स्टोरी ऐकवली. कोणत्याही क्षणी अमिताभ होकार देईल असं वाटत असतानाच अमिताभनं त्याच्या धीरगंभीर आवाजात चक्क नकार दिला.

फिल्म हिट होणार याची दोघांनाही खात्री होती मात्र बच्चननं शांतपणे नकार देत सांगितलं की लोक तिकीट काढून, ब्लॅकनं तिकिट काढून जिवाचा आटापिटा करून येतात ते मला बघायला. जर पडद्यावर मी दिसलोच नाही तर त्यांना ते आवडणार नाही आणि ही फिल्म आपटेल, चालणार नाही.

सलीम जावेदनं बच्चनची खूप समजूत घातली की बच्चन कमी वेळ दिसणार असला तरीही त्याचा आवाज घुमणार होता आणि बच्चनच्या दिसण्याइतकेच लोक त्याच्या आवाजावरही फिदा आहेत.

मात्र हा बच्चनचा निसरडा उतरणीचा काळ चालू असल्यानं बच्चनला ही रिस्क घेणं नको वाटत होतं. त्याच्या नकारावर तो ठाम होता. या नकारात सलीम जावेद जोडी फ़ुटण्याची बिजं रोवली गेली.

या नकारानं दोघेही दुखावले गेले असले तरीही जावेद अख्तर यांचा अहंकार थोडा जास्त दुखावला गेला होता. तेथून बाहेर पडल्या पडल्या त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे अमिताभसोबत काम करणं थांबवूया.

हे ही वाचा

===

 

 

सलीम यांना वाटत होतं, की अशा एखाद्या घटनेमुळे इतका मोठा निर्णय घेणं धोक्याचं ठरेल. वरवर दोघांनी यावर चर्चा टाळली तरीही बच्चनचा नकार हे कारण दोघांच्या मतभेदांना खत घालणारंच ठरलं.

यानंतर जलसावरच्या होळी सेलिब्रेशनमधे जावेद यांनी अमिताभला सांगितलं, की सलीमना अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही. या तिघांतले गैरसमज यानंतर वाढतच गेले.

अमिताभला सलीम-जावेद या नावांच्या कुबड्यांची गरज उरली नव्हती आणि सलीम जावेद यांना आपण स्वतंत्रपणेही यशस्वी चित्रपट देऊ शकतो याची जाणीव झालेली होती.

जावेद यांच्या घरी झालेल्या अशाच एका रूटिन स्टोरी सेशननंतर जावेद यांनी सलीमना शांतपणे सांगितलं की माझ्यामते आता आपण स्वतंत्र व्हायला हवंय. हे ऐकून सलीमना धक्काच बसला.

===

हे ही वाचा बॉलिवूडच्या या १० जोड्यांनी एक काळ गाजवलाय, पण का वेगळ्या झाल्यात या जोड्या?

===

मात्र त्यांनी काहीही रिॲक्शन न देता, तू हे म्हणतोयस तर काही विचार करूनच म्हणत असशील, माझा तुझ्यावर विश्र्वास आहे असं सांगून कायमचा निरोप घेतला.

पुढे निर्माता बोनी कपूरनं अनिललाच घेऊन हा चित्रपट पूर्ण केला आणि या चित्रपटानं इतिहास रचला. पडद्यावर गोष्ट बघताना अमिताभला किंचित हळहळ वाटली तरीही तो अमिताभच्या पठडीतला सिनेमा नव्हता यावर तो ठाम होता.

अनिलला या चित्रपटात घेतलं तरीही तो या चित्रपटाची दुसरी नव्हे तर तिसरी निवड होता. कारण अमिताभनंतर सलीम जावेद राजेश खन्नाकडेही हे स्क्रिप्ट घेऊन गेले होते. त्यानंही हा त्याच्या टाईपचा चित्रपट नसल्याचं सांगून नकार दिला.

 

 

त्यानंतर मग सुपरस्टारडमवर हक्क दाखवायला संघर्ष करत असलेल्या अनिलला बोनीनं ही भूमिका दिली. अनिलनं या संधीचा पुरेपूर फायदा उचलत मिस्टर इंडिया या पात्रावर अनिल कपूर या नावाची मोहोर उमटवली.

आज हा सिनेमा बघताना सेकंदभरासाठीही  वाटत नाही की हे पात्र अमिताभला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं गेलं आहे. अनिल कपूरसाठीच ही भूमिका लिहिली गेली आहे इतका तो या भूमिकेशी समरस झालेला दिसतो.

 

 

हिंदी चित्रपटसृष्टीतली हिच गंमत आहे. कोणीतरी एखादा चित्रपट नाकारतं आणि तो चित्रपट पुढे ज्यानं स्विकारला त्याच्या हीटलिस्टमध्ये भर पडते आणि ज्यानं नाकारला त्याला कायमची हळहळ देऊन जाते.

मिस्टर इंडियाच्याबाबतीत मात्र एक लोकप्रिय जोडी या चित्रपटामुळे कायमची दुरावल्याची हळहळ जास्त आहे.

===

हे ही वाचा अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेला हा विद्यार्थी बनला ‘झक्कास’ अभिनेता!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version