' कोरोनाची लस दंडातच का दिली जाते? हे कारण तुम्हाला ठाऊक असायलाच हवं – InMarathi

कोरोनाची लस दंडातच का दिली जाते? हे कारण तुम्हाला ठाऊक असायलाच हवं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘कोरोना’ हे कधी कोणी नाव देखील ऐकले नव्हते. कोण कुठला हा आजार भारतासोबतच संपूर्ण जगात आला काय आणि अचानक संपूर्ण जग थांबले काय! भयावह स्वप्नवतच वाटतंय ना?

 

corona inmarathi

 

कोणत्याच गोष्टीत एवढी ताकद नव्हती की जगाला थांबवू शकेल, मात्र या कोरोना विषाणूने संपूर्ण जग थांबवले आणि २०२० हे वर्ष आपण सर्वानी घराच्या चार भिंतीत कैद होऊन काढले.

मात्र २०२१ आपल्यासाठी एक आशेचा किरण घेऊन आले. जगभरात अनेक मोठ्या कंपन्यांनी, शास्त्रज्ञांनी या विषाणूवर लस शोधण्यासाठी जंग जंग पछाडले, आणि अखेर भारताला यात यश आले.

 

covid vaccine inmarathi

 

नुकतेच आपल्या देशाने कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळण्यासोबतच ही लस काही अपवाद वगळता फायदेशीर देखील ठरत असल्याची माहिती आहे.

लहानपणापासून आपण सर्वानी अनेक आजारांच्या लसी घेतल्या आहेत. असे म्हणतात की, लस कंबरेवर घेतली की, जास्त परिणामकारक ठरते. मात्र आता कोरोना लसीकरणाचे जे काय आपण टीव्हीवर, सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ बघत आहोत यातून एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो की, ही एवढ्या मोठ्या जोराची लस असून, ती दंडावर का देत आहेत?

 

vaccine on man inmarathi

हे ही वाचा – १ मार्चपासून कोरोनाची लस मिळतीय, पण कुणाला आणि कशी? ही माहिती वाचा

तर आज आम्ही या लेखातून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

आपले शरीर हे पेशी आणि नसांचे विशाल जाळे आहे. शरीराला एखाद्या रोगापासून वाचवण्यासाठी किंवा एखाद्या रोगविरोधात लढण्यासाठी पांढऱ्या पेशी खूप महत्वाच्या असतात. हे तर सर्वांनाचं ठाऊक आहे.

मात्र आपल्या शरीरामध्ये लिम्फ सिस्टिम नावाची एक कार्यप्रणाली आहे. जी पेशींमध्ये नको असलेले पदार्थ काढून रक्तामध्ये सोडते. तर रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडणारे सर्व द्रव काढून ते आपल्या शरीराच्या पेशींमधील द्रव पातळी राखण्याचे महत्त्वाचे काम करते. सोबतच आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचा दर्जा वाढवण्याचे काम देखील करते.

 

blood inmarathi

 

आपल्या शरीरात लिम्फ नोडसचे जाळे आहेत. टॉन्सिल्स हे त्याचे एक उदाहरण आहे. टॉन्सिल्स हे तोंडावाटे शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूंना किंवा रोगांना मारण्याचे काम करतात. तसेच आपल्या दंडामध्ये देखील लिम्फ नोडसचे जाळे आहेत. हे जाळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी देखील जाते.

ही लस दंडाच्या स्नायूमध्ये दिल्यानंतर तेथील डेन्ड्रिटिक पेशी लसीमध्ये असणाऱ्या रोगजंतूच्या घटकाला ओळखतात आणि त्याची माहिती थोड्याच वेळात टी आणि बी पेशींना देतात. माहिती मिळाल्यावर लगेच या पेशी अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करतात.

शिवाय दंडाच्या स्नायूमध्ये असणारे काही घटक ज्याला गोल्डीलॉक्स टिश्यू म्हटले जाते ते ही लस हळूहळू शरीराच्या इतर भागात पाठवतात. म्हणूनच लस दिल्यानंतर आपले शरीर लसीवर काही प्रतिक्रिया देते. जसे ताप येणे, डोके दुखणे, अंग दुखणे. मात्र लस दंडावर दिल्याने आणि ती शरीरात हळूहळू पोहचत असल्याने या प्रतिक्रियांची तीव्रता कमी होते.

 

 

corona vaccine inmarathi 5

 

लस जर औषधासारखी सलाईनद्वारे किंवा इंजेक्शनासारखी थेट रक्तवाहिन्यांमध्ये दिली तर ती एकदम रक्तामध्ये जाते आणि रक्तामधील काही प्रोटिन्स आणि इन्झाईम्स लसीच्या घटकावर आक्रमण करून लसीला निष्प्रभ करतात. त्यामुळेच लस ही दंडात देतात.

हे ही वाचा – ज्या लसीमुळे कोरोनाचं संकट दूर होणार, ती लस शरीरात नेमकी काय जादू करते? वाचा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?